एमडीएच मसाले व्यापारी महाशय धरमपाल गुलाटी यांचं निधन
मसाला किंग या नावाने प्रसिद्ध असलेले MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे 98 व्या वर्षी निधन झाले. अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या पारंपरिक व्यवसायाला सुरुवात करत त्यांनी MDH मसाला कंपनीचे नाव सर्वदूर पोहचवले होते.
त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाशयान दि हट्टी (MDH) हे त्यांचं नाव. पंजाबी लोक दुकानाला हट्टी म्हणतात. म्हणून ते एमडीएच म्हणून ओळखले जात असत.
त्यांच्या मसाल्यांच्या ब्रँडचही नाव एमडीएचच. हा ब्रँड भारतापुरताच मर्यादित राहिला नव्हता तर विदेशातही या ब्रॅंडचा प्रसार झाला होता.
ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)