कोरोना व्हायरस विरुद्ध मुंबई पोलीस दलाने कसा लढा दिला?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस विरुद्ध मुंबई पोलीस दलाने कसा लढा दिला?
Published

महाराष्ट्रात दर 24 तासाला जवळपास 100-150 पोलिसांना कोरोनाची लागण होतेय. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 ऑक्टोबरपर्यंत राज्यात एकूण 24,386 पोलिसांना कोरोनाची लागण झालीय. तर 257 पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना आरोग्य संकटात आपल्य़ा जीवावर उदार होऊन पोलीस काम करत आहेत. किंबहुना आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. पण आजही त्यांना पुरेशा सोयी सुविधा नाहीत. अतिरिक्त काम, कामाचे वाढीव तास, आरोग्य विमा वेळेवर न मिळणं, कोरोनाची लागण झाल्यावर बेड उपलब्ध न होणं अशा अनेक समस्यांना तोंड देत पोलीस काम करत आहेत.

पाहा दीपाली जगताप यांचा रिपोर्ट

कॅमेरा- शाहीद शेख

एडिटिंग - राहुल रणसुभे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)