फक्त 1500 रुपयांसाठी रात्री चौकीदारीचं काम करणारी महिला

व्हीडिओ कॅप्शन, महिना फक्त 1500 रुपयांसाठी रात्री चौकीदारीचं काम करणारी महिला
Published

पंजाबमध्ये 13 हजार 500 गावांत रात्रीचे चौकीदार नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये कुलदिप कौर या पहिल्या महिला चौकीदार आहेत.

गेल्या 15 वर्षांपासून त्या बांगिवाल गावात रात्रीचा पहारा देत आहेत. चौकीदार म्हणून काम करणं सोप नव्हतं असं त्या सांगतात. चौकीदाराचं काम करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पण सरकारी अधिकाऱ्यांनी याविषयी शंका व्यक्त केली होती. या कामासाठी त्यांना महिन्याला केवळ 1500 रुपये मिळतात. घरात 6 मुलं आहेत आणि एवढ्या पैशात भागत नाही. म्हणून दिवसा त्या मजुरी करायला जातात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)