ब्युबोनिक प्लेग: कोरोना व्हायरस नंतर प्लेगचा चीनमध्ये प्रादुर्भाव

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस नंतर ब्युबॉनिक प्लेग रोगाचा चीनमध्ये प्रादुर्भाव
Published

जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग एकदाचा कधी कमी होतो, अशी धाकधूक लागलेली असतानाच चीनमधून आणखी एक धोक्याची सूचना येत आहे.

चीनमधल्या इनर मंगोलिया या स्वायत्त प्रदेशात ब्युबॉनिक प्लेगचे (गाठीचा रोग किंवा प्लेग) रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

बायानूर शहरात शनिवारी एक रुग्ण आढळला, तेव्हा त्याला प्लेग झाल्याचा संशय होता. हा रुग्ण एक गुराखी असून त्याला उरद मिडर बॅनर भागातील एका रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारा प्लेग हा आजार तसा तर जीवघेणा ठरू शकतो, पण सामान्यरीत्या उपलब्ध औषधांनी त्यावर उपचार करता येतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)