इराक आणि सीरिया या देशांमध्ये ISISने असं पुकारलंय युद्ध
Published
कोरोना व्हायरसमुळे एकीकडे जग थांबल्यासारखं झालं असताना दुसरीकडे सीरिया आणि इराकमध्ये युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. इस्लामिक स्टेटने इथे पुन्हा डोकं वर काढलं आहे.
आयएस च्या लोकांनी पूर्वीप्रमाणेच स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांच्या हत्या करायला सुरुवात केली आहे. इथले लोक त्यामुळे भीतीच्या वातावरणात जगत आहेत. कुर्दीश फौजा आणि अमेरिकन, फ्रेंच, ब्रिटीश लढाऊ विमानं आयएसशी युद्धभूमीवर लढत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)