कोरोना चीन: वुहानमधील लोकांमध्ये प्रशासनाविषयी राग, अजूनही दाबले जातायत सामान्यांचे आवाज

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना चीन: वुहानमधील लोकांमध्ये प्रशासनाविषयी राग, अजूनही दाबले जातायत सामान्यांचे आवाज
Published

चीनची राजधानी बीजिंगमध्ये काही भागात लॉकडाऊनचे निर्बंध पुन्हा लावण्यात आले आहेत. कारण, तिथे नव्याने काही कोव्हिड-19 रुग्ण आढळले.

चीनने कोरोना व्हायरसचा उद्रेक नीट हाताळला का याविषयी पुन्हा एकदा प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. वुहान या शहरात मागच्या डिसेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक सगळ्यात आधी सुरू झाला. एकट्या वुहान शहरात कोव्हिडने 4000 लोकांचा बळी घेतला तर 50000 लोकांना संसर्ग झाला. आता या शहरात पहिल्यासारखे लॉकडाऊनचे निर्बंध नाहीत. पण, तरीही लोकांवर एकप्रकारचं दडपण आहे. आणि त्यांचा आवाजही प्रशासनाकडून दाबला जात आहे. याविषयी थेट वुहानमधून बीबीसी प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)