कोरोना व्हायरस: लहान मुलांना लागण होते का? ते कोरोना पसरवू शकतात का? #सोपीगोष्ट 97
खरं तर जगभरात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण कमी आहे. पण त्यांना लागणच होत नाही असंही नाहीये.
म्हणूनच 65 वर्षांवरील लोकांप्रमाणेच 15 वर्षांखालील लहान मुलांनीही सध्या घराबाहेर न पडण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्यात. मग प्रश्न निर्माण होतो तो लहान मुलांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका किती असतो?
त्यांच्यातही प्रौढांसारखीच लक्षणं दिसतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याचा धोका आहे का? या आणि अशा काही प्रश्नांबद्दल आज आपण बोलणार आहोत. पाहूया आजची सोपी गोष्ट लहान मुलांना कोरोनाचा किती धोका असतो याबद्दल.
संशोधन आणि निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)