मारिओपोलमधल्या मॅटर्निटी हॉस्पिटलवर हवाई हल्ला, हवाई क्षेत्र बंद करण्याची झेलेन्स्कींची पुन्हा मागणी
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
आर्जवं करणारा राष्ट्राध्यक्ष मी होऊ इच्छित नाही- झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, व्होल्दोमीर झेलेन्स्की रशियाच्या सातत्यपूर्ण आक्रमणासमोर युक्रेनने गुडघे टेकलेले नाहीत पण राष्ट्राध्यक्ष व्होल्दमीर झेलेन्स्की यांच्या नव्या मुलाखतीने वेगळे संकेत दिले आहेत.
अमेरिकेतील टीव्ही चॅनेल एबीसीला दिलेल्या मुलाखतीत झेलेन्स्की यांनी अनेक मुद्यांवर विस्तृतपणे भूमिका मांडली.
नेटो सदस्यत्वासाठी प्रयत्नशील नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नेटो संघटनेतील सहभाग हे रशिया-युक्रेन युद्ध पेटण्याचं कारण होतं. नेटो शेजारी देशांपर्यंत पोहोचावं असं रशियाला अजिबात वाटत नाही.
रशियाशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. नेटो आम्हाला संघटनेत सामील करण्यासाठी तयार नसल्याचं स्पष्ट झालं. शरणागती पत्करून एखाद्या गोष्टीसाठी आर्जव करणारा मी राष्ट्राध्यक्ष होऊ इच्छित नाही असं झेलेन्स्की यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Slovak Interior Ministry
फोटो कॅप्शन, युक्रेनमधून स्थलांतर करणाऱ्यांमध्ये हजारो लहान मुलांचा समावेश आहे. रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या 2 दशलक्ष नागरिकांनी स्थलांतर केलं आहे, यामध्ये 800,000 लहान मुलांचा समावेश आहे असं 'सेव्ह द चिल्ड्रन' संस्थेनं म्हटलं आहे.
यापैकी असंख्य लहान मुलं एकेकटी देशाबाहेर पडत आहेत. आपल्य मुलांना वाचवण्यासाठी आईवडील शर्थीचे प्रयत्न करत आहेत. शेजारी तसंच मित्रमैत्रिणींबरोबर ते लहान मुलांना पाठवत आहेत.
ब्रेकिंग, राजधानी कीव्हमध्ये बॉम्बहल्ले
युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आसपासच्या भागांमध्ये जोरदार बॉम्बहल्ले होत असल्याचं वृत्त आहे.
कीव्हमधील पत्रकारांनी यासंदर्भात बातम्या दिल्या आहेत. हल्ल्यामुळे शहरात सायरनचा आवाज निनादू लागला आहे.
युक्रेनमध्ये सकाळचे सहा वाजले आहेत
अणूहल्ल्याचे अधिकार कुणाकडे असतात?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
सुमीतून नागरिकांच्या सुटकेची मोहीम पूर्ण

फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, सुमीतील स्थिती रशियाच्या जोरदार हल्ल्यांचं लक्ष्य ठरलेल्या सुमी शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम पूर्ण झाल्याचं युक्रेनने सांगितलं.
5000 माणसं आणि 1000 खाजगी गाड्या सुरक्षित आहेत असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयातील डेप्युटी हेड कायरलो टायमोशेन्को यांनी सांगितलं.
टेलिग्राममध्ये शेअर केलेल्या व्हीडिओत नागरिक रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून अन्यत्र जात असल्याचं दिसत आहे. मात्र यासंदर्भात अधिक तपशील दिला नाही. या व्हीडिओची स्वतंत्रपणे सत्यासत्यता पडताळणी करता आलेली नाही.
रशिया-युक्रेनच्या अगदी जवळ सुमी हे शहर आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात सोमवारी 22 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.
असं झालं तर युद्ध आणखी भडकेल का?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
रशियाचे हवाई हल्ले रोखण्यासाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नो फ्लाय झोनची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदींमुळे रशियानं 6 तास युद्ध थांबवलं या महाराष्ट्र भाजपच्या दाव्यात किती तथ्य?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
खारकिव्ह शहरातील भारतीयांना बाहेर काढण्यासंदर्भात काही बनावट बातम्या आणि राजकीय वक्तव्यं समोर आली आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांना खारकीव्हमधून बाहेर पडता यावं, यासाठी रशियाने त्या भागात सहा ते आठ तासांसाठी युद्ध थांबवलं होतं, असा दावा करणाऱ्या अनेक बनावट बातम्या आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट गेल्या आठवड्यात सर्वत्र पसरले होते.
या खोट्या बातम्या किमान आठ प्रमुख राष्ट्रीय वृत्तमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं. यापैकी कोणत्याही माध्यमाने आपल्या वार्तांकनात दुरुस्ती अथवा खुलासा केलेला नाही. अशा खोट्या बातम्या अजूनही त्या माध्यमांच्या संकेतस्थळांवर आणि फेसबुक, ट्विटर व यु-ट्यूब इत्यादी समाजमाध्यम मंचांवर उपलब्ध आहेत. यातील काही मंचांचे तर एक कोटींहून अधिक फॉलोअर आहेत.
अशाच एक खोटा दावा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केला होता. किमान सहा प्रमुख भाजप नेत्यांनी स्वतःच्या 'व्हेरिफाइड' ट्विटर खात्यांवरून हाच दावा शेअर केला. या नेतेमंडळींचे लाखो फॉलोअर आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- हा महाराष्ट्र भाजपचा दावा किती खरा?
युक्रेनमध्ये 'Z' अक्षराची दहशत
तेलाची टंचाई भेडसावू देणार नाही पण तेल कंपन्यांनाही अस्तित्व राखायचं आहे- पेट्रोलियम मंत्री

फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेल कंपन्या किंमत ठरवतील असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं.
तेलाची टंचाई होणार नाही आणि जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले.
तेलाच्या किंमती आणि निवडणुका यांचा काही संबंध नाही. तेल कंपन्यांनाही जिवंत राहायचं आहे.
देशात तेलाची टंचाई होऊ देणार नाही, देशाला जेवढी आवश्यकता असेल तेवढं खनिज तेल पुरवलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
खनिज तेलाच्या किंमती गगनाला भि़डणार?

फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या प्रमुखांशी चर्चेचा प्रयत्न विफळ ठरला आहे.
युक्रेनसाठी जगभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी आणि खनिज तेलाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका अरब देशांशी चर्चा करत आहे.
अमेरिकेने रशियातून येणाऱ्या खनिज तेलावर बंदी घातल्यानंतर तेलाच्या किंमतीत अभूतपूर्व वाढ होऊ शकते.
12 लाख लोक युक्रेनमधून पोलंडमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून पोलंडमध्ये 12 लाख लोकांनी आसरा घेतल्याचं पोलिश गार्ड एजन्सीने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
- सोमवारी 7 मार्चच्या एका दिवसात 1,41,500 लोकांनी सीमा ओलांडल्याचं पोलिश बॉर्डर गार्ड एजन्सीने ट्विटरवर लिहिलंय. रविवारी 6 मार्चला 1,42,300 जणांनी युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केला होता.
- युक्रेनमधून येणाऱ्या लोकांपैकी 90% युक्रेनियन नागरिक आहेत. यात बहुतेक महिला आणि मुलं आहे. यापैकी 40% जण पोलंडमधून इतर देशांमध्ये गेल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.
- पोलंडमध्ये आधीपासूनच साधारण 10 ते 20 लाख युक्रेनियन नागरिक आहेत. आणि म्हणून युक्रेनसोडून अनेकजण आता त्यांच्या कुटुंबियांकडे किंवा मित्रमंडळींकडे रहायला आले आहेत.
- अनेक पोलिश नागरिकांनी आपल्या घरांमध्ये युक्रेनच्या निर्वासितांना आसरा दिलाय. आणि असं करणाऱ्या पोलिश नागरिकांना आर्थिक मदत देण्यात यावी का, यावर पोलंडच्या संसदेत चर्चाही होणार आहे.
- यासोबतच युक्रेनियन नागरिकांना पोलंडमध्ये 18 महिने राहण्याचे आणि काम करण्याचे अधिकार आणि मोफत आरोग्यसेवा आणि शालेय शिक्षण द्यायचं का यावरही चर्चा होणार आहे.
आतापर्यंत काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार,युक्रेन-रशिया युद्धाला सुरुवात झाल्यापासून आपण बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर या युद्धाच्या सर्व घडामोडी जाणून घेत आहोत. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. बीबीसी मराठीचे पराग फाटक आणि ओंकार करंबेळकर आजच्या घडामोडी या लाइव्ह पेजच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहेत.
कालपर्यंत काय घडलं?
- क्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार भारतीयांना परत आणल्याचा दावा भारत सरकारने केलाय. युक्रेनच्या सुमे शहरात अडकलेल्या सगळ्यात भारतीयांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
- युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे. निर्वासिताचं हे प्रमाण आणि समस्या दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घटना असल्याचं युनायटेड नेशन्सचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्राँडी यांनी म्हटलं होतं.
- रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 1,207 नागरिक ठार झाल्याचं वा जखमी झाल्याचं युनायटेड नेशन्सने त्यांच्या आकडेवारीत म्हटलंय. युक्रेनमध्ये आतापर्यंत 406 लोक मारले गेले आहेत. तर 801 नागरिक जखमी झाले आहेत. पण हा आकडा "अधिक मोठा असण्याची शक्यता असल्याचं" युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार उच्चायुक्त लिझ थ्रोसेल यांनी म्हटलंय.
- पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.
- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं चित्र 'द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे. झेलेन्स्की युक्रेनचा झेंडा हातात घेऊन, युद्धभूमीवर ठामपणे उभे असल्याचे या चित्रातून दाखवण्यात आलं आहे. झेलेन्स्कींनी लष्कराचे कपडे परिधान केल्याचे या चित्रात दाखवण्यात आलंय.
- जागतिक बँकेनं युक्रेनसाठी 700 मिलियन डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिलीय.
- इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) चे अधिकारी चेर्नोबिलला भेट देण्याची शक्यता आहे.
- ऑस्ट्रेलियातील ऊर्जा कंपनीनं रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतलाय.
- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्चं तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केलं आहे.
कालच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- युक्रेनमधील लोकांची देशाबाहेर पडण्यासाठी धडपड
