झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा

रशिया-युक्रेन युद्ध सुरूच असून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. या युद्धाबाबत सर्व अपडेट्स तुम्ही या लाईव्ह पेजमध्ये वाचू शकता.

लाईव्ह कव्हरेज

तुषार कुलकर्णी

  1. लढाऊ विमानं न देण्याचा अर्थ तुम्हालाही वाटतं की आम्ही मरून जावं- झेलेन्स्की

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, व्होल्दोमीर झेलेन्स्की

    विनितस्या शहरातील विमानतळ पूर्णत:उद्धव्स्त झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी व्हीडिओच्या माध्यमातून जगभरातल्या नेत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

    "युक्रेनच्या नागरिकांना वाचवणं हे तुमच्या सगळ्यांचंही कर्तव्य आहे. तुम्ही हे केलं नाहीत आणि आमच्या सुरक्षेसाठी लढाऊ विमानं पुरवली नाहीत तर त्याचा एकच अर्थ होतो तो म्हणजे- आम्ही हळूहळू मरून जावं असं तुम्हाला वाटतं", असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

    युक्रेनवर नो फ्लाय झोन घोषित करण्याचा प्रस्ताव नेटो देश फेटाळून लावत आहेत. नो फ्लाय झोन घोषित झाला तर युक्रेनच्या भूमीवर उडणाऱ्या रशियाच्या कोणत्याही विमानाला नेटोला रोखावं लागेल. आवश्यकता पडल्यास त्यांना रशियाच्या विमानांचा पाडावही करावा लागेल. यामुळे नेटो आणि रशिया यांच्यात थेट संघर्ष सुरू होईल असं नेटो देशांना वाटतं.

  2. रशिया- युक्रेन दरम्यान आतापर्यंत काय काय घडलं?

    युक्रेन, रशिया
    फोटो कॅप्शन, इरर्पिन शहरातून नागरिक बाहेर पडत असताना
    • युक्रेनमधल्या मारियुपोल शहरातून नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. युद्धविरामाबाबत नव्याने घोषणा करण्यात आली होती.
    • युक्रेन सोडून जाणाऱ्यांची संख्या 15 लाखांच्या पल्याड गेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्वासितांच्या एजन्सीने हा दावा केला आहे.
    • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांच्या विनंतीनंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली.
    • युक्रेनची राजधानी कीव्हजवळच्या इरर्पिन शहरात आई आणि दोन मुलांचा मृत्यू झाला.
    • रशियाने ठेवलेल्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर लष्करी कारवाई थांबणार नाही असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.
    • जागतिक अणूऊर्जा संघटनेनं युक्रेन-रशिया युद्धामुळे अणूभट्या आणि त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
    • कोणताही देश युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन लागू करत असेल त्या देशाला युक्रेन युद्धात सामील असल्याचं मानलं जाईल.
    • सशस्त्र सैन्याबद्दल 'खोटी' माहिती पसरवल्यास तुरुंगवासाची तरतूद असणारा नवा कायदा रशियाच्या संसदेत - डूमामध्ये मंजूर करण्यात आला.
  3. रशिया-युक्रेन युद्धाचा बारावा दिवस

    गुड मॉर्निंग. रशिया-युक्रेन युद्ध सुरूच असून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. मी पराग. युद्धाबाबत सर्व अपडेट्स तुम्ही या लाईव्ह पेजमध्ये वाचू आणि पाहू शकाल.

    काल दिवसभरात युद्धभूमीवर काय काय घडलं हे तुम्ही इथे वाचू शकता