झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा
रशिया-युक्रेन युद्ध सुरूच असून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. या युद्धाबाबत सर्व अपडेट्स तुम्ही या लाईव्ह पेजमध्ये वाचू शकता.
लाईव्ह कव्हरेज
तुषार कुलकर्णी
रशिया आणि युक्रेनचे परराष्ट्र मंत्री गुरुवारी भेटणार
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लाव्हरोव आणि दिमित्रो कुलेबा हे टर्कीमध्ये गुरुवारी भेटणार आहेत.
आधी रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची दोन सत्रं झाली आहेत. पण त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नसल्याचे दिसले.
युक्रेनमघधील युद्धग्रस्त भागात असलेल्या लोकांना बाहेर जाता यावे यासाठी रशियाने मानवी कॉरिडोर उघडण्याचा प्रस्ताव युक्रेनला दिला आहे.
हा प्रस्ताव युक्रेन स्वीकारण्याची शक्यता धुसर आहे. हा प्रस्ताव अनैतिक असल्याचे मत युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दिले आहे.
ते म्हणाले, रशियाचा प्रस्ताव अनैतिक आहे कारण या प्रस्तावात म्हटले आहे की जे युद्धग्रस्त भागात अडकले त्यांना रशिया किंवा बेलारूसला घेऊन जाता येईल. पुढे ते म्हणाले की ही दुर्दैवी गोष्ट आहे, लोकांच्या दुःखाचा वापर टीव्हीववर फोटो टाकण्यासाठी केला जात आहे.

रशियाला थेट भिडणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की
सध्या युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्याबद्दल जागतिक माध्यमं चर्चा करत आहेत. तुम्हाला ठाऊक आहे का, राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की हे कॉमेडिअन होते.
2019 मध्ये सत्तेत आल्यापासून युक्रेनचं नेतृत्व करणारे झेलेन्स्की रशियाने हल्ला केल्यानंतर आता कीव्हच्या रस्त्यांवर युक्रेनी नागरिकांना रशियाविरुद्ध देशाचं रक्षण करण्यासाठी आवाहन करताना दिसतायत.
आपण पाहणार आहोत कॉमेडियनपासून रशियाला अंगावर घेणाऱ्या या नेत्याचा प्रवास.
झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. आज मोदी यांनी पुतिन यांच्याशी 50 मिनिटे संवाद साधला. याआधी मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी देखील चर्चा केली होती.
सध्या चालू असलेल्या युद्धविषयक घडामोडींविषयी पुतिन यांच्याशी मोदींनी चर्चा केली असल्याचे एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेन बाहेर पडेपर्यंत मराठी मुलांची उपासमार; केला गोळीबार, बर्फवृष्टीचा सामना
युक्रेनमध्ये अडकलेले मराठी मुलं आता मायदेशी परतत आहेत. पण युक्रेनमधून बाहेर पडण्याआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जेवण, पाणी वेळेवर मिळालं नाही. रस्त्यावर बर्फवृष्टी होत असताना दिवसरात्र प्रवास करावा लागला.
त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
युक्रेन म्हणाले, 'रशियाने दिलेला कॉरिडोरचा प्रस्ताव अनैतिक'

युक्रेनमघधील युद्धग्रस्त भागात असलेल्या लोकांना बाहेर जाता यावे यासाठी रशियाने मानवी कॉरिडोर उघडण्याचा प्रस्ताव युक्रेनला दिला आहे.
हा प्रस्ताव युक्रेन स्वीकारण्याची शक्यता धुसर आहे. हा प्रस्ताव अनैतिक असल्याचे मत युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दिले आहे.
ते म्हणाले, रशियाचा प्रस्ताव अनैतिक आहे कारण या प्रस्तावात म्हटले आहे की जे युद्धग्रस्त भागात अडकले त्यांना रशिया किंवा बेलारूसला घेऊन जाता येईल. पुढे ते म्हणाले की ही दुर्दैवी गोष्ट आहे, लोकांच्या दुःखाचा वापर टीव्हीववर फोटो टाकण्यासाठी केला जात आहे.
याआधी रशियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटले होते की कीव्ह आणि खारकीव्ह येथून मानवी कॉरिडोर बनवण्यात येईल. पुढे त्यांनी हे देखील स्पष्ट केले होते की कीव्हचा कॉरिडोर बेलारूसला जाईल आणि खारकीव्हचा कॉरिडोर रशियाला जाईल.
युक्रेनने जोरदार संघर्षानंतर रशियाकडून घेतलं हे शहर ताब्यात

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, युक्रेन-रशिया युक्रेनच्या सुरक्षेसंदर्भातील अधिकाऱ्यांनी चुहुइव शहर रशियाच्या ताब्यातून परत मिळवल्याचा दावा केला आहे.
युक्रेनच्या चीफ ऑफ जनरल स्टाफ यांनी सांगितलं की कीव्ह शहरासाठीच्या सुरक्षा यंत्रणांनी चुहुइव शहर ताब्यात घेतलं.
या लढाईत मॉस्कोच्या लष्करी तुकडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या शहरासाठीच्या संघर्षात रशियाच्या महत्त्वाच्या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. चुहुइव्ह शहराची लोकसंख्या साधारण 31 हजार आहे. बीबीसीने या दाव्याच्या सत्यासत्यता पडताळू शकलेलं नाही. युक्रेनमधील दुसरं सगळ्यात मोठं शहर असलेल्या खारकीव्ह शहरापासून चुहुइव्ह 23 मैलांवर आहे. गेल्या आठवडाभरापासून या ठिकाणी रशियाचं सैन्य जोरदार गोळीबार करत आहे.
सुमीमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी नरेंद्र मोदींची झेलेन्स्कींशी चर्चा
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
युक्रेनमधील सुमीममध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सहकार्य करा, अशी मागणी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली.
एएनआयने भारत सरकारच्या सूत्रांच्या माध्यमातून सांगितलं की, दोन्ही नेत्यांनी युक्रेनमध्ये बदलेल्या स्थितीबाबत चर्चा केली.
चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचं कौतुक केलं.
भारतीयंना युद्धक्षेत्रातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत करत असल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचे मोदींनी आभारही मानले.
पीटीआयनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झेलेन्स्कींशी सुमीममध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सहकार्य मागितलं.
'सुपरमार्केटमधून सामान आणतो म्हणाला, त्यानंतर नवीनचा फोन आला नाही'
युक्रेनमध्ये रॉकेट हल्ल्यात नवीन या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय या धक्क्यातून सावरत आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली त्याआधी शेखरप्पा यांना नवीनचा फोन आला होता.
तो त्याची आई आणि भावाशी बोलला होता. सुपरमार्केटमधून सामान आणतो म्हणाला. त्यानंतर नवीनचा फोन आला नाही. त्यानंतर थेट भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून फोन आला आणि त्यांना दुर्दैवी बातमी कळली.
व्हीडिओ कॅप्शन, 'सुपरमार्केटमधून सामान आणतो म्हणाला, त्यानंतर नवीनचा फोन आला नाही.' ब्रेकिंग, नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हल्ले थांबवण्यास रशिया तयार

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमध्ये वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या सर्वसामान्य लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया हल्ला रोखेल, अशी माहिती रशियाच्या सरकारी माध्यमाने दिलीय.
कीव्ह, खारकीव्ह यांसारख्या शहरांमध्येही हल्ले रोखण्यासाठी तयार आहोत, असं रशियानं म्हटलंय.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार, “ही मर्यादित शस्त्रसंधी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता लागू होईल आणि राजधानी कीव्ह, खारकीव्ह, मारियुपोल आणि सूमी यांसारख्या भीषण संघर्ष सुरू असलेल्या शहरातून नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी रस्ते सुरक्षित बनवले जातील.”
या सर्व शहरांमध्ये सध्या रशियाकडून बॉम्बहल्ले आणि गोळीबार सुरू आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाच्या या दाव्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
गेल्या दोन दिवसांमध्ये मारियुपोलमधील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी दोनवेळा प्रयत्न केले गेले. मात्र, दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “मारियुपोलमधून नागरिकांना बाहेर काढण्यात अडथळे आले, कारण रशियाकडून संघर्षविरामासाठी निश्चित वेळेतही हल्ले सुरूच होते.”
रशिया-युक्रेन युद्धाच्या वार्तांकनावर कार्टूनच्या माध्यमातून तिरकस भाष्य

युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार?

फोटो स्रोत, Getty Images
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा नकारात्मक परिणाम जगातील बऱ्याच घटकांवर झाला आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर ही याचा परिणाम झाला आहे.
खास करून युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? या प्रश्नाची टांगती तलवार आहे.
18 हजार विद्यार्थी युद्धामुळे युक्रेन सोडून भारतात परतलेत. कोणाचं दुसरं वर्ष सुरू होत तर कोणी चौथ्या वर्षांत शिकत होतं.
आता फक्त प्रश्न उरतो तो राहिलेलं शिक्षण पूर्ण कसं करायचं? त्यांना भारतात शिक्षण पूर्ण करायची संधी मिळेल का? की या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती निवळेपर्यंत वाट बघावी?
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा.
रशियन फौजांनी युक्रेनमध्ये कोणत्या भागांवर ताबा मिळवला आहे?

रशियन फौजांनी युक्रेनमध्ये कोणत्या भागांवर ताबा मिळवला आहे?
रशियन फौजांनी युक्रेनमध्ये कोणत्या भागांवर ताबा मिळवला आहे? कोणत्या दिशेने रशिया पुढं सरकत आहे? नकाशाच्या माध्यमातून जाणून घेऊया-

ते रशियन दिसतात, ऊर्दू बोलतात आणि बॉलिवूड त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे
'बॉम्ब हल्ल्याचा आवाज नाही, असा एक मिनिटही जात नाहीये'

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनच्या रशियावरील हल्ल्याचा आज बारावा दिवस आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह शहराच्या विविध बाजूंनी जोरदार बॉम्बहल्ले होत आहेत.
कीव्हवर पूर्णपणे ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. बूचा, होस्तोमेल, इरपिन या शहरांमध्ये युक्रेन आणि रशियाच्या फौजांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे.
स्थानिकांच्या मते एकही मिनिट असं जात नाही की हल्ल्याचा आवाज आसमंतात घुमत नाही. इरपिन शहरातून बाहेर पडत असताना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब ज्या पुलावरून जात होतं त्यावरच रशियाचं मोर्टार जाऊन आदळलं.
रशिया आता सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे असं युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी सांगितलं. रशिया रुग्णालयं आणि शाळांवरही हल्ले करत आहे असं युक्रेनचं म्हणणं आहे.
युक्रेनच्या लष्कराने कडवा प्रतिकार केल्याने रशियाने नागरिकांविरुद्ध अनेक मोहीमा हाती घेतल्या आहेत असं उपपंतप्रधान ओल्हा स्टेफनीशिना यांनी सांगितलं.
युक्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या रशियन आजीला पोलिसांनी पकडलं तेव्हा काय घडलं?
युक्रेनमधल्या अंडरग्राउंड बंकरमधून भारतीय विद्यार्थिनीनं सांगितले तिचे हाल
कॅनडामधील सीबीसी वृत्तवाहिनीच्या पत्रकार नताशा फतेह यांनी युक्रेनमध्ये अंडरग्राऊंड बंकरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी बातचित केली. हे विद्यार्थी वाईट स्थितीत असून, त्यांच्या अडचणी सांगत होते.त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, "अन्न-पाण्याविना हे विद्यार्थी अंडरग्राऊंड बंकरमध्ये लपलेले आहेत. जीव वाचवण्यासाठी काय करावं, हेच समजत नाही."
महताब रजा या विद्यार्थ्यांपैकी एक आहे. रजाने सीबीसीच्या नताशा यांच्याशी बोलताना सांगितलं की, "मॅम, आम्ही खूप वाईट अवस्थेत आहोत. दहा दिवसांपासून आम्ही सर्वजण अंडरग्राऊंड बंकरमध्ये लपलो आहे. दिवसागणिक स्थिती बिकट होत जातेय. आम्ही हतबल आहोत. काहीच करण्याच्या स्थितीत नाही आहोत. कसंतरी करून भारतात परत जायचं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला माहीत नाही की, परत कधी जाऊ. युक्रेन आणि भारत सरकारकडून आम्हाला एखादी माहिती मिळेल आणि वाट पाहत आहोत."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नताशा म्हणाल्या की, असं वाटतंय तुम्ही एखाद्या गुहेत आहात. तुम्ही नक्की कुठे आहात? यावर महताब रजाने सांगितलं की, "आम्ही युक्रेनच्या सुमी शहरात आहोत. इथं 800 ते 900 भारतीय विद्यार्थी अडकलो आहोत. आम्ही सीमेपर्यंतही जाऊ शकत नाही, कारण तिथवर जाण्यासाठी रस्ता नाहीय. रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त करण्यात आलंय. कुणीही टॅक्सी ड्रायव्हर तयार नाहीय. बस नाहीत. खारकीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागलीय. इथं ना वीज आहे, ना पाणी. दोन दिवसांपूर्वीच इथं मोठा स्फोट झाला होता आणि तेव्हापासून पाणी संकट सुरू झालं. पाणी नसल्यानं ब्रशही करू शकत नाही आणि शौचालयातही जाऊ शकत नाहीय."
"आम्ही अधून-मधून रशियात जातो आणि तिथून कसंतरी आमच्या कुटुंबीयांशी बोलतो. आम्ही कुटुंबीयांना सुद्धा खरं सांगू शकत नाही, कारण ते काळजी करतील. आम्ही ज्या वेदना सहन करतोय, त्यांचा विचारही करू शकत नाही. हे मानवतेसाठी योग्य नाही. आम्हाला लढायचं नाहीय. आम्हाला शांतता हवीय. युद्ध थांबावं, असं आम्हा भारतीयांना वाटतं," हे सांगत असताना महताब रडू लागला.
भारत सरकारनं रशिया आणि युक्रेनच्या सरकारनं शुक्रवारी सुमीमध्ये युद्धविरामासाठी आग्रह केला होता, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं. 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला होता, तेव्हा सुमी शहरात 800 विद्यार्थी तिथं फसले होते.
तेलाच्या किंमती कडाडल्या

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, पेट्रोल 2008 नंतर तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक बाजारात इराणचं तेल उपलब्ध व्हायला झालेला उशीर आणि अमेरिका तसंच युरोपियन युनियनकडून रशियाकडून मिळणाऱ्या तेलावर बंदीमुळे खनिज तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.
इराणबरोबर 2015 मध्ये झालेल्या अणूकराराची कलमं लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अनिश्चितता वाढली आहे. युक्रेनवर हल्ला केल्यामुळे लागू करण्यात आलेल्या बंदीमुळे इराणबरोबरच्या संबंधांवर परिणाम व्हायला नको असं रशियाने म्हटलं आहे.
चीननेही नव्या अटी ठेवल्या आहेत. अमेरिका आणि युरोपातील सहकारी देश रशियातून येणाऱ्या खनिज तेलावर बंदी घालण्याच्या विचारात आहेत.
ब्रेंट क्रूडची किंमत 7 मार्चला 129.78 डॉलर प्रति बॅरल एवढी झाली होती. युएस टेक्सस इंटरमीडियट क्रूडची किंमत 10.83 टक्क्यांनी वाढून 126.51 डॉलर प्रतिबॅरल झाली होती. 2008 मध्ये ब्रेंट 139.13 डॉलर प्रति बॅरल झाली होती.
युद्धात मी माझ्या बायकोला गमावलंय, आता काय करू?
रशिया युक्रेन संघर्षात स्थानिक नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. झिटोमीर शहरात ओलेग रुबेक यांचं घर बेचिराख झालं आहे. ओलेग यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.
व्हीडिओ कॅप्शन, रशिया युक्रेन संघर्ष : युद्धात मी माझ्या बायकोला गमावलंय, आता काय करू?
