पुतिन यांनी आण्विक दलाला दिला ‘स्पेशल अलर्ट’

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

  1. पुतिन यांना जीनिअस म्हणणाऱ्या ट्रंप यांनी आता दिली झेलन्स्की यांना शाबासकी

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. युक्रेनमधील लोकांसाठी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    याआधी रशियाने युक्रेनमध्ये सैन्य पाठवायला सुरुवात केली होती तेव्हा पुतिन यांच्या आदेशाला ट्रंप यांनी जीनिअस म्हटलं होतं. अमेरिकेने दक्षिणेकडच्या सीमेवर रक्षणासाठी पीसकीपिंग तुकडीचा वापर करू शकते असंही ट्रंप म्हणाले होते.

    ट्रंप यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलन्स्की यांना शाबासकी दिली आहे. ते निधड्या छातीचे नेते आहेत असं ट्रंप म्हणाले.

    ट्रंप यांनी पुतिन यांचं कौतुक करणाऱ्या आपल्या आधीच्या वक्तव्याचं समर्थन केलं. पुतिन स्मार्ट असून, त्यांनी जगभरातील नेते आणि नेटोवर मात केली आहे. पुतिन स्मार्ट आहेत हा प्रश्न नसून आमचे नेते मूर्ख आहेत हा आहे.

    याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ट्रंप यांच्या पुतिन यांना जीनिअस म्हणण्याची खिल्ली उडवली होती.

  2. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हजवळच्या तेल डेपोला आग

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, तेल डेपोला लागलेली आग

    युक्रेनची राजधानी कीव्ह शहरातील वासिलकीव्ह याठिकाणच्या तेल डेपोला रशियाच्या हल्ल्यात आग लागली आहे. या परिसरातून धोकादायक विषारी वायू बाहेर पडत आहेत.

    नागरिकांनी घराच्या खिडक्या बंद करून घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. सोशल मीडियावर या आगीचे अनेक व्हीडिओ आणि फोटो शेअर करण्यात येत आहेत. आगीमुळे धुराचे लोट उठत असल्याचं यातून दिसत आहे.

    संयुक्त राष्ट्रांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे 240 नागरिक जखमी झाले आहेत, 64 जणांचा मृत्यू झाला आहे.

  3. एलॉन मस्क यांनी युक्रेनला दिलं स्टारलिंक इंटरनेट

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, एलॉन मस्क

    स्पेस एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात दिला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे या देशात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. मस्क यांनी स्टारलिंक सॅटलाईट ब्रॉडबँड युक्रेनमध्ये कार्यान्वित केलं आहे.

    युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी एलॉन मस्क यांना ट्वीटरवर टॅग करून स्टारलिंक सॅटेलाईट सर्व्हिस देण्याचं आवाहन केलं होतं.

    त्यांनी लिहिलं होतं की, एलॉन मस्क- तुम्ही मंगळावर माणसाला नेण्याच्या प्रयत्नात आहात.रशिया युक्रेनवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही अंतराळात रॉकेट यशस्वीपणे उतरवता. इथे रशियाची क्षेपणास्त्रं युक्रेनचा वेध घेत आहेत. अशा परिस्थितीत युक्रेनला स्टारलिंक स्टेशन देण्याची विनंती करत आहोत.

    या ट्वीटला उत्तर देताना स्टारलिंक सेवा कार्यान्वित केल्याचं ट्वीट मस्क यांनी केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

  4. युक्रेनमधून लाखो नागरिक अन्य देशात जायच्या तयारीत

    युक्रेन, रशिया

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनचे नागरिक अन्य देशात जात आहेत.

    रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे जीवाच्या धास्तीने दीड लाखाहून अधिक युक्रेनच्या नागरिकांनी देश सोडण्याची आहे. रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये फिरताना दिसत आहेत. क्षेपणास्त्रं दागली जात आहेत. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी लोक देश सोडून जाताना दिसत आहेत.

    युक्रेनवरील हल्ल्यामुळे निर्वासितांचा प्रश्न उभा राहू शकतो असं युक्रेन सरकारला वाटतं. 50 लाख निर्वासित होऊ शकतात.

    युक्रेनवरील हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे. अनेक शहरांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. हल्ल्यांमुळे रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. शेकडो नागरिकांना वीजपाण्याविना राहावं लागत आहे.

  5. जर्मनी युक्रेनला शस्त्रास्त्रांची मदत करणार

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, जर्मनीने धोरणात बदल करत युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवणार असल्याचं जाहीर केलं.

    रशियाने युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनवरील आक्रमण तीव्र केलं आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलन्स्की यांना विविध देशांचा पाठिंबा मिळत आहे.

    जर्मनीने धोरणात बदल केला असून, युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार आहे. जर्मनीचे चान्सलर ओलाफ शल्ट्स यांनी याला दुजोरा दिला.

    जर्मनी 1000 अँटी टँक हत्यारं आणि 5 जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रं युक्रेनला देणार आहे.

    जर्मनी, यूक्रेन पर रूस के हमले की निंदा कर चुका है और इसी क्रम में उसने संघर्ष या युद्ध क्षेत्रों में हथियारों को निर्यात करने पर प्रतिबंध वाली अपनी पुरानी नीति में परिवर्तन किए हैं.

    जर्मनीने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. युद्ध किंवा संघर्षावेळी शस्त्रास्त्रांची निर्यातबंदीच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय जर्मनीने घेतला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

    जर्मनीचे वाहतूक मंत्र्यांनी हवाई क्षेत्रात रशियाच्या विमानांना बंदी घालत असल्याचं जाहीर केलं. याआधी इस्टोनिया, पोलंड, बुल्गारिया आणि चेक रिपब्लिक यांनी रशियाच्या विमानांवर बंदी घातली आहे.

  6. रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं?

    रशिया युक्रेन संघर्ष

    नमस्कार,

    रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये सातत्याने नवीन गोष्टी घडत आहेत. या संदर्भातल्या ताज्या अपडेट्स तुम्हाला या पेजवर पाहायला मिळतील.

    • युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 219 जणांना घेऊन भारताचं पहिलं विमान मुंबईत दाखल झालं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचं विमानतळावर जाऊन स्वागत केलं.
    • युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करून, युक्रेनमधील स्थितीची माहिती दिली. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली.
    • युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रशियाचे सैनिक पोहोचले आहेत. काल रात्रभर कीव्ह शहरात धुमश्चक्री सुरू होती. यात युक्रेनच्या 198 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनेच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.
    • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला शरणागती पत्करण्यास सांगितलं. त्यांनी झेलेन्स्की आणि त्यांच्या सरकारवर ड्रग्ज व्यसनी आणि निओ-नाझींची टोळी असल्याचा आरोपही केला.
    • अमेरिका, युके, कॅनडा आणि युरोपीयन महासंघानं प्रथमच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांच्या विरोधात थेट कारवाई केली आहे.
    • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा युक्रेन सोडून जाण्याचा प्रस्ताव फेटाळला असल्याचं अमेरिकेतील काही माध्यमांनी म्हटलं आहे.
    • युक्रेनच्या सैन्याला रशियन सैन्यासमोर हत्यारं टाकण्यास सांगण्यात आल्याची अफवा असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
    • रशियाने हल्ला केल्यानंतर आतापर्यंत त्यांचे 3,500 सैनिक ठार केल्याचा दावा युक्रेनच्या लष्कराने केला.
    • 26 फेब्रुवारी रोजी काय काय घडले हे पाहण्यासाठी बीबीसी मराठीच्या पेजला भेट द्या
  7. युक्रेनवासी देशाच्या रक्षणासाठी सज्ज- ओक्साना मार्करोव्हा

    रशिया, युक्रेन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, युक्रेनच्या अमेरिकेतील राजदूत

    "रशियाचा हल्ला अतिशय भीषण आहे पण संपूर्ण युक्रेन देशाच्या संरक्षणासाठी मजबूतपणे लढत आहे", असं अमेरिकेत युक्रेनच्या राजदूत ओक्साना मार्करोवा यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

    सीएनएनशी बोलताना मार्करोवा म्हणाल्या, "दोन रात्रींप्रमाणेच या रात्रीतही लढा देण्यासाठी युक्रेनवासीय खंबीरपणे सज्ज होते. देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही तय्यार आहोत".

    "कीव्ह शहराच्या पश्चिम भागात रशियाने हल्ला केल्याचं वृत्त आहे. रशियाच्या लष्कराने सामान्य नागरिकांच्या घरांनाही लक्ष्य केलं आहे. हे अतिशय भयंकर आहे. पण युक्रेनचा प्रत्येक नागरिक घराचं रक्षण करण्यासाठी सज्ज आहे", असं त्यांनी सांगितलं.