रशियन सैन्य राजधानी कीव्हमध्ये शिरण्याच्या टप्प्यावर - झेलेन्स्की
रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले. राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रं हल्ले झाल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
लाईव्ह कव्हरेज
क्रायमियावर पुतिन यांनी असा ताबा घेतला होता...
फोटो स्रोत, Getty Images
अधिकृतरित्या पाहिलं तर क्रायमिया रिपब्लिक हा युक्रेनचा भाग आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडीली काळ्या आणि अझोव्ह (Azov) समुद्रामधल्या द्वीपकल्पावर (Penninsula) क्रायमिया आहे.
पूर्वेला असणारी कर्चची सामुद्रधुनी (Kerch Strait) क्रायमियाला रशियापासून वेगळं करते. 2014च्या सुरुवातीला शीतयुद्धानंतर पश्चिम आणि पूर्वेतल्या अस्वस्थतेचं केंद्र हे क्रायमिया होतं.
राजधानी कीव्हमध्ये हिंसक आंदोलनं झाल्यानंतर रशियाचं पाठबळ असलेले युक्रेनचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच यांना सत्ता सोडावी लागली होती. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- क्रायमियाचा इतिहास
पुण्याचे विद्यार्थी म्हणतायत युक्रेनमध्ये बॉम्बच्या आवाजाने भीती वाढत चालली आहे...
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये कसं वातावरण आहे?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
व्लादिमीर पुतीन यांच्यावर टॅक्सी चालवण्याची वेळ आली होती, कारण...
युक्रेनसोबत बातचीत करण्यास रशिया तयार, घातली ही अट
फोटो स्रोत, Getty Images
बेलारूसची राजधानी मिन्स्क याठिकाणी युक्रेनसोबत चर्चा करण्यास आपण तयार आहे, असं क्रेमलिन (रशियन संसद) प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं आहे.
रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने (RAI) दिलेल्या माहितीनुसार, ही बातचीत युक्रेनला न्यूट्रल स्टेटस घोषित करण्याबाबत असेल. तसंच त्यांना आपलं सैन्यही कमी करावं लागेल, अशी अट रशियाने घातली आहे.
युक्रेनने नेटोमध्ये सहभागी होऊ नये, अशी रशियाची इच्छा आहे. युक्रेन संघर्षादरम्यान अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांसोबत रशियाची चर्चा होत होती. तेव्हासुद्धा त्यांची प्रमुख मागणी हीच होती.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तत्पूर्वी, युक्रेनचं सैन्य जोपर्यंत शस्त्र खाली ठेवत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा केली जाऊ शकत नाही, असंही रशियाचे परराष्ट्र मंत्री म्हटलं होतं.
मिन्स्कचं काय महत्त्व?
बेलारुसची राजधानी मिन्स्क याठिकाणी ही चर्चा करण्यात यावी, असं क्रेमलिन प्रवक्त्यांनी म्हटलं. हे ठिकाण रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या संबंधांसाठी महत्त्वाचं आहे.
पूर्व युक्रेनमध्ये रशियन समर्थक बंडखोर आणि युक्रेनच्या सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर 2014 मध्ये मिन्स्क-1 आणि 2015 मध्ये मिन्स्क-2 करार झाला होता. फेब्रुवारी 2015 मध्ये बेलारुसची राजधानी मिन्स्क येथे रशिया, युक्रेन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या उपस्थितीत हा करार झाला होता.
याअंतर्गत परिसरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियन समर्थक बंडखोरांनी कब्जा केलेल्या भागात योग्य ती पाऊले उचलण्याचं ठरलं होतं.पण रशियाने केलेला हल्ला म्हणजे मिन्स्क कराराचं उल्लंघन असल्याचं सांगितलं जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त
रशिया-युक्रेन यांच्यामधील संघर्ष वाढत आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.या विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे सहकार्य नक्कीच मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
आपली मुले विदेशात अडकली आहेत या भीतीने पालकांमध्ये अस्वस्थता असणे स्वाभाविक आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही आणण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. यासाठी देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्कात आहोत, असं सुळे यांनी म्हटलं.
कोरोना संक्रमण काळात परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यावेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी वेळोवेळी त्यांचे आभारही मानले आहेत. यावेळीदेखील अशाच प्रकारचे सहकार्य त्यांच्याकडून लाभेल, असं त्या म्हणाल्या.
रशिया युक्रेन युद्धाचा भारतीयांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल?
रोमानिया, हंगेरीच्या मार्गे भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न
फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासानं नवीन मार्गदर्शक पत्रक जारी केलंय. भारतीयांना सुरक्षित आणि सतर्क राहण्याचं आवाहन या पत्रकातून करण्यात आलंय.
रोमानिया आणि हंगेरीच्या मार्गे युक्रेनमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार आणि दूतावास प्रयत्न करत असल्याची माहितीही देण्यात आलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
या पत्रकात दोन चेक पॉईंट्सची नावंही देण्यात आली आहेत.
या पत्रकातून सल्ला देण्यात आलाय की, परराष्ट्र मंत्रालयाच्या पथकांशी समन्वयानंतर बॉर्डर चेक पॉईंट्सजवळ राहणारे भारतीय नागरिक, विशेषत: विद्यार्थ्यांनी जावं.
मार्गदर्शक पत्रकात म्हटलंय की, विद्यार्थ्यांनी स्टुडंट काँट्रॅक्टर्सच्या संपर्कात राहिलं पाहिजे.
"सर्व नागरिकांना पासपोर्ट आणि आपत्कालीन खर्चासाठी अमेरिकन डॉलर सोबबत ठेवावे. तसंच, कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्रही सोबत ठेवावं आणि शक्य असेल तर आपल्या गाड्यांवर तिरंग्याचं चित्र चिकटवा," असं या पत्रकात म्हटलंय.
'युक्रेनमध्ये माझा एकुलता एक मुलगा अडकलाय, खूप भीती वाटतेय'
युक्रेनला दडपशाहीतून मुक्त करण्याचं आमचं ध्येय - रशियाचे परराष्ट्रमंत्री
फोटो स्रोत, Getty Images
"युक्रेनच्या नागरिकांना दडपशाहीतून मुक्त करण्याचं ध्येय रशियाच्या कारवाईमागे आहे, जेणेकरून ते त्यांचं भविष्य स्वत:च ठरवू शकतील," असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ म्हणाले.
रशियाची राजधानी मॉस्कोत लावरोफ यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, "युक्रेनमधील सरकारला लोकशाही सरकार मानण्यासाठी कुठलीच गोष्ट दिसत नाही. नुकतेच रशियानं युक्रेनमधील फुटीरतावाद्यांच्या नियंत्रणातील दोन भागांना मान्यता दिलीय."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
लावरोफ यांनी पुतीन यांच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हटलं की, "युक्रेनवर आम्ही ताबा मिळवू पाहत नाहीय, तर त्यांना 'डिमिलिट्राइज' करू पाहतोय."
ज्यावेळी लावरोफ यांनी युक्रेनसारख्या लोकशाहीप्रधान देशाला पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याबाबत विचारलं, तेव्हा ते म्हणाले, युक्रेनला लोकशाहीप्रधान देश म्हटलं जाऊ शकत नाही.
'मुलगा युक्रेनमध्ये आहे, त्याने भारतात सुखरुप यावं माझी एवढीच इच्छा आहे'
रशिया-युक्रेन संघर्ष जाणून घ्या बीबीसी मराठीच्या ट्विटर स्पेसमध्ये
रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतर जागतिक स्तरावर वेगवान घडामोडी घडत आहेत. याचा भारतावर आणि जगावर काय परिणाम होईल? रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना यातून काय साध्य करायंच आहे? याविषयी बीबीसी मराठी आज, शुक्रवारी, रात्री 9 वाजता ट्विटर स्पेस आयोजित करत आहे.
या ट्विटर स्पेसमध्ये JNU मधील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. रश्मिनी कोपरकर आणि आंतरराष्ट्रीय संबंध व राष्ट्रीय सुरक्षा विषयाच्या अभ्यासक डॉ. तन्वी कुलकर्णी या विश्लेषकांचा सहभाग असेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
रशिया-युक्रेन युद्धाच्यावेळेस नरेंद्र मोदींच्या भूमिकेची इतकी चर्चा का होत आहे?
कीव्हमध्ये रशियाचे सैनिक घुसले, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती
फोटो स्रोत, Getty Images
रशियाचे सैनिक राजधानी कीव्हमध्ये दाखल झाले आहेत, अशी माहिती युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं दिलीय.
त्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं नागरिकांना लष्करात सहभागी होण्याचं आवाहन केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
"लष्करात सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. भले तुम्ही अल्पवयीन असाल," असं युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानं ट्वीटमध्ये म्हटलंय.
ट्वीटमध्ये युक्रेनच्या लष्कराच्या कमांडरनी म्हटलंय की, "आज युक्रेनलसा सर्वकाही हवंय. लष्करात सहभागी होण्याची प्रक्रिया सहजसोपी करण्यात आलीय. केवळ पासपोर्ट आणि ओळखपत्र क्रमांकासोबत या. वयाची कुठलीही अट नाही."
रशिया आणि युक्रेनमध्ये कोणत्या सैन्याची ताकद अधिक जास्त?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
रशियाचे 450 सैनिक मारले गेले - ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी दावा केलाय की, युक्रेनमध्ये लष्करी कारवाईदरम्यान रशियाचे 450 सैनिक मारले गेले आहेत.
स्काय न्यूज या ब्रिटनस्थित वृत्तवाहिनीशी बोलताना बेन वॉलेस यांनी हा दावा केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे पूर्ण युक्रेनवर आक्रमण करू पाहतंय, असंही बेन वॉलेस यांनी म्हटलं.
"रशिया युक्रेनमधील एका महत्वाच्या विमानतळाला आपल्या विशेष सैनिकांच्या मदतीने नियंत्रित करू पाहतंय. मात्र, वास्तव हे आहे की, रशिया यात अयशस्वी ठरला आणि युक्रेन पुन्हा त्या विमानतळावर नियंत्रण मिळवलं," असं वॉलेस म्हणाले.
रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं? 'या' 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या...
रशियन सैन्य मोठ्या संख्येनं सीमा ओलांडून युक्रेनमध्ये प्रवेश करतंय., क्रायमियाजवळ सीमेवरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रशियन ट्रक दिसले
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
ब्रिटिश एअरवेजवर रशियाकडून निर्बंध
फोटो स्रोत, Getty Images
ब्रिटिश एअरवेजच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यास तसंच भूमीवर लँडिंग करण्यास रशियाने बंदी घातली आहे.
रशियाच्या विमान वाहतूक नियामकांनी याबाबत म्हटलं की ब्रिटिश एअरलाईन्सच्या विमानांना रशियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी आता नसेल.