आम्ही अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीखांच्या संपर्कात - भारतीय परराष्ट्र मंत्रालय
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हाती सत्ता आली आहे. त्या ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींचा लेखाजोखा.
लाईव्ह कव्हरेज
आम्ही अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीखांच्या संपर्कात - भारतीय परराष्ट्र मंत्रालय
काबूल विमानतळावर गोळीबारात तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त
अमेरिकेचे वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावर सोमवारी झालेल्या गोळीबारात तीनजणांचा मृत्यू झाला आहे.
घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी रक्ताने माखलेले मृतदेह पाहिले आहेत.
गोळीबार कुणी केला याबाबत वृत्तात माहिती देण्यात आलेली नाही.
गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याची बातमी समोर आली होती.
देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. विमान सेवा मर्यादित असल्याने गोंधळाचं वातावरण होतं.
नागरिकांचं आयुष्य सुखकर करू - तालिबान

फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, तालिबान नेते काबूलवर कब्जा केल्यानंतर तालिबानने व्हीडिओ जारी केला आहे.
तालिबानच्या उपनेत्यांनी म्हटलं आहे की, "अफगाणिस्तानच्या लोकांसाठी काही करण्याची तसंच आयुष्य अधिक चांगलं करण्याची वेळ आली आहे.
सत्वपरीक्षेची वेळ आली आहे. आम्ही संपूर्ण देशात शांतता प्रस्थापित करू. लोकांचं आयुष्य अधिक सुखकर व्हावं यासाठी प्रयत्न करू.
आम्ही ज्या पद्धतीने इथवर पोहोचलो तसंच ज्या ठिकाणी पोहोचलो आहोत त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती".
तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की देशात शांतता आहे आणि संघर्षाचं वातावरण नाही.
काबूलचे विमानतळ बंद; हजारो नागरिक प्रतीक्षेत

फोटो स्रोत, AFP
फोटो कॅप्शन, काबूल विमानतळावरचं दृश्य काबूलचे विमानतळ आता बंद करण्यात आले आहे.
हजारो अफगाण नागरिक सुरक्षिततेच्या कारणास्तव देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर जमा झाल्याचे फोटो, व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते.
गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबारही केला होता.
मात्र आता विमानतळाचं कामकाज बंद करण्यात आलं आहे.
सध्याच्या घडीला काबूलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. आपल्या नागरिकांना तसंच दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानच्या बाहेर नेणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे.
तालिबानच्या नेत्यांविषयी तुम्हाला माहितेय का?

फोटो कॅप्शन, तालिबान संघटनेची रचना विमानतळावरची गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांचा हवेत गोळीबार

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, काबूल विमानतळावरची स्थिती काबूलच्या विमानतळावर अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याचं वृत्त आहे.
विमानात प्रवेश करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. नागरिकांना बाजूला करण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केला.
एका अधिकाऱ्याने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, गर्दी नियंत्रणाबाहेर गेली होती. हा गोळीबार केवळ लोकांना विमानापासून दूर करण्यासाठी होता.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओत गोळीबाराचा आवाज ऐकायला मिळतो.
विमानात मिळेल तिथून प्रवेश करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचा व्हीडिओ समोर आला होता. अमेरिकचं सैनिक विमानतळावर हजर आहेत. दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित देशाबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काबूलच्या विमानतळावरून कमर्शियल उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत.
नागरिकांना त्रास देऊ नका- तालिबानचं आवाहन
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहैल शाहीन यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, तालिबानने त्यांच्यासाठी लढणाऱ्या सैनिकांना सांगितलं आहे की कोणाच्याही परवानगीशिवाय घरात प्रवेश करू नका. लोकांचा जीव, संपत्ती आणि अन्य मालमत्ता यांचं नुकसान होता कामा नये.
काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर तालिबान उदार धोरण असल्याचं दाखवू पाहत आहे.
दरम्यान काबूलमधील विद्यार्थी आयशा खुर्रमने एक ट्वीट करून सोमवारची सकाळ कशी होती ते सांगितलं आहे. घरासमोर आरडाओरड सुरू असल्यानेच जाग आली. गोळीबारही होत होता. तालिबानचे सैनिक म्हणवणारे काहीजण घरोघरी जाऊन लोकांचं सामान आणि गाड्या जप्त करत होते. तालिबानचे अधिकारी येत आहेत समजताच त्यांनी तिथून पोबारा केला.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय सुरू आहे?

फोटो स्रोत, Reuters
फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधील दृश्य -अफगाणिस्तानमध्ये अशरफ गनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार गनी उझबेकिस्तानला गेले असल्याचं स्पष्ट होतं आहे.
-माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी तालिबानशी शांततापूर्वक सत्तेचं हस्तांतरण व्हावं यासाठी चर्चेचं आवाहन केलं आहे.
-काबूलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह विदेशी मंडळींनी अफगाणिस्तान सोडून जाण्यासाठी विमानतळावर गर्दी केली आहे. रविवारी रात्रीपासून काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी असल्याचं चित्र आहे. तिथे गोंधळाचं वातावरण आहे.
-काबूलच्या हमीद करझई विमानतळावरून कमर्शियल विमानांची उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. अमेरिका आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-अफगाणिस्तानमध्ये सुरक्षित वातावरण असावं आणि नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी 60हून अधिक देशांनी एक पत्रक जारी केलं आहे. नागरिक देश सोडू इच्छित असतील तर त्यांना रोखू नका असं आवाहनही या देशांनी तालिबानला केलं आहे.
-अफगाणिस्तानच्या काही भागात महिलांच्या बाहेर जाऊन काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेनेदेखील चिंता व्यक्त केली आहे.
दुपारी एक विमान दिल्लीहून काबूलला जाणार
"आम्ही परिस्थितीवर काळजापूर्वक लक्ष ठेऊन आहोत. दुपारी साडेबारा वाजता दिल्लीहून काबूलला एक विमान रवाना होणार आहे. अफगाणिस्तानमधून लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात सरकार प्रसिद्धीपत्रक जारी करेल", असं एअर इंडियाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
तालिबानशी लढणारा सिंह असं कोणाला म्हटलं जातं?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, मोहम्मद इस्माइल खान तालिबानविरोधात लढा देणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याविषयी जाणून घ्या.
काबूल विमानतळावरची भीषण परिस्थिती
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर नियंत्रण मिळवलं आहे. हजारो नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.
मात्र अफगाणिस्तानमधली परिस्थिती लक्षात घेऊन अनेक देशांनी हवाई सेवा स्थगित केली आहे. काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानात जागा मिळवण्यासाठी चाललेली नागरिकांची धडपड या व्हीडिओतून स्पष्ट दिसते.
बुरखा परिधान न केलेल्या महिलांच्या फोटोंना मिळतेय ही वागणूक
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहरावर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. तालिबानने आपली कार्यपद्धती राबवायला सुरुवात केल्याचं शहरात दिसतं आहे. बुरखा परिधान न केलेल्या महिलांचे फोटो झाकून टाकण्यात येत आहेत.
टोलो न्यूजच्या प्रमुखांनीच ट्वीट करून काबूल शहरातली ही वस्तुस्थिती मांडली आहे.
तालिबानने इतक्या वेगात अफगाणिस्तानवर नियंत्रण कसं मिळवलं?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधील दृश्य अमेरिकेचं सैन्य माघारी परतू लागल्यानंतर अवघ्या काही दिवसात तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आहे. हे कसं शक्य झालं? समजून घेऊया
तालिबान संघटना म्हणजे नेमकं काय आहे

फोटो स्रोत, EPA
फोटो कॅप्शन, तालिबान म्हणजे काय? 90 च्या दशकात सोव्हिएत संघ आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलवत होतं, त्याच दरम्यान देशात तालिबान संघटना उदयाला आली.
पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधलं जातं. जाणून घ्या या संघटनेबद्दल
जे होऊ नये असं वाटत होतं तेच घडतंय...
अफगाणिस्तानमधील महिलांना पुन्हा एकदा बंद दरवाजाआड पडद्यामागे जगायला लागू नये असं प्रसिद्ध लेखक खालेद हौसेनी यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेचा निर्णय झाला आहे. जे घडू नये असं वाटत होतं त्याचा अनुभव अफगाणिस्तानचे नागरिक घेत आहेत. चाळीस वर्ष शांततेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडलं जाऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काईट रनर ही त्यांची पहिली कादंबरी गाजली होती. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानमधील वास्तवाचा त्यांनी वेध घेतला होता.
खालेद यांच्या बहुतांश पुस्तकात अफगाणिस्तान हाच केंद्रबिंदू असतो. देशातील महिलांच्या हक्कांविषयी ते बोलतात. अफगाणिस्तानमधील महिलांचे हक्क दडपून काढण्याविरोधातही बोलतात.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हताश चेहरे, दु:खी मनं- काबूलची व्यथा

फोटो स्रोत, EPA
फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमधील दृश्य रविवारी तालिबानने राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवलं. 24 तासानंतर काबूल शहरात गोंधळाचं वातावरण आहे. काबूल विमानतळावर हजारो नागरिकांनी देश सोडण्यासाठी गर्दी केली.
देशात लोकशाही ध्वस्त झाल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं.
बीबीसी प्रतिनिधी कवून खामोश यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, हताश चेहरे, दु:खी मनं यांनी काबूल भरून गेलं आहे. या सगळ्यांना देश सोडून जायचं आहे. त्यांच्या एका हातात फोन आणि दुसऱ्या हाताची नखं दातात धरून आहेत.
असंख्य महिलांना भवितव्याविषयी चिंता भेडसावते आहे.
मुलींचं बोर्डिंग स्कूल चालवणाऱ्या शबाना बासिज-रसीख यांनी ट्वीट करून म्हटलंय की मला असं वाटतंय की माझ्या डोक्यावर साडेतीन कोटीचा बोजा आहे.
अमेरिकन कर्मचारी अफगाणिस्तान सोडत आहेत
अमेरिकन दूतावास तसेच इतर कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानबाहेर आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना हमीद करझाई विमानतळावर आणण्यात आले आहेत. येथून ते काही वेळात अमेरिकेला रवाना होतील.
अफगाणिस्तानातून कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर आणण्यासाठी अमेरिकेनी 6 हजार सैनिकांची व्यवस्था केली आहे. असं सांगण्यात येत आहे की अमेरिकन सैनिक काबुल विमानातळाची सुरक्षा करत आहेत.
अफगाणिस्तानमधली वेगाने बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊन, अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत.
दूतावासातील तसंच अन्य कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानमधून बाहेर पडता यावं यासाठी अमेरिकेचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तानमध्ये रविवारी काय काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय काय घडलं? रविवारी काबूलजवळच्या जलालाबाद शहरावर कब्जा केल्यानंतर तालिबानसाठी लढणारे सैनिक काबूलच्या वेशीवर पोहोचले.
शांततामय पद्धतीने सत्तेचं हस्तांतरण व्हावं यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचं तालिबानने सांगितलं. बातचीत सुरू असेपर्यंत आमचे सैनिक काबूल शहरात प्रवेश करणार नाहीत असं तालिबानने स्पष्ट केलं होतं. यादरम्यान काबुलमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं ट्वीट राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी केलं.
अफगाणिस्तानमधली वेगाने बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊन, अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी 5,000अतिरिक्त सैनिक पाठवले. त्याचवेळी दूतावासातील तसंच अन्य कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानमधून बाहेर पडता यावं यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले.
अफगाणिस्तानमधील महिला खासदार फरजाना कोचाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, लोक काबूल सोडून दुसरीकडे जाऊ इच्छित आहेत. परंतु पळून जायला जागाच शिल्लक राहिलेली नाही. तालिबानचं नियंत्रण असलेल्या भागांमध्ये महिलांच्या काम करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
तालिबानने बामियान प्रांतावरही कब्जा केला. 20 वर्षांपूर्वी तालिबानने याच भागातील बुद्धमूर्तीची तोडफोड केली होती.
अफगाणिस्तानचे काळजीवाहू गृहमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोलो न्यूजला सांगितलं की सत्तेचं हस्तांतरण शांततामय मार्गाने होईल. काबूलवर हल्ला होणार नाही.
तालिबानने काबूल शहराच्या बाहेरच्या भागातील बगराम एअरफिल्ड आणि तुरुंगाला ताब्यात घेतल्याचा दावा केला. याच एअरफिल्डवरून अमेरिकेने अफगाणिस्तानात वीस वर्ष नियंत्रण केलं होतं.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी उशिरा राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमीरुल्लाह सालेह यांनी देश सोडल्याचं वृत्त आलं. दुसरीकडे आमचे सैनिक काबूल शहरात दाखल होत असून कार्यालयांवर कब्जा करत आहेत असं तालिबानने सांगितलं. तालिबानच्या कब्जात आल्यानंतर आणि राष्ट्राध्यक्ष गनी यांनी देश सोडल्याचं समजल्यानंतर अनेक ठिकाणी गोळीबार ऐकायला मिळाला.
अमेरिकेने आपला दूतावास काबूल विमानतळावर स्थलांतरित केला आहे असं परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांनी सांगितलं.
काही वेळातच राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्याचं तालिबानने स्पष्ट केलं. अल जजीराने प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओत राष्ट्रपती भवनात तालिबानचे सैनिक दिसून येत आहेत. काबूलनजीकच्या 11 जिल्ह्यांमध्येही नियंत्रण मिळवल्याचं तालिबानने म्हटलं आहे.
काबूल विमानतळावरून सर्व प्रकारची कमर्शियल उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. या विमानतळावरून केवळ लष्कराच्या विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.
काबूलमध्येच राहणार असल्याचं अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझई यांनी म्हटलं आहे. दरम्यान देशात रक्तपात होऊ नये यासाठी देश सोडल्याचं राष्ट्राध्यक्ष गनी यांनी सोशल मीडियावर सांगितलं.
अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेसाठी बायडन यांनी राजीनामा द्यावा असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.
या अपमानासाठी राजीनामा द्या; ट्रंप यांची बायडन यांच्यावर टीका

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन अफगाणिस्तानसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर आता माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जोरदार टीका केली आहे.
अफगाणिस्तानात जे घडायला त्यांनी अनुमती दिली त्यासाठी बायडन यांनी राजीनामा द्यायला हवा असं ट्रंप म्हणाले.
मी राष्ट्राध्यक्षपदी असतो तर अमेरिकेची अफगाणिस्तानमधून माघार वेगळ्या आणि यशस्वी पद्धतीने झाली असती असा दावाही त्यांनी केला.
अमेरिका-तालिबान यांच्यातील करार ट्रंप यांच्या कार्यकाळातच झाला होता असं बायडन प्रशासनाने म्हटलं आहे.
करार ट्रंप यांच्या काळात झाला मात्र कराराचा तपशील बायडन यांच्या काळात निश्चित झाला. तालिबानने ज्या वेगाने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आहे त्यावरून बायडन प्रशासनावर टीका होत आहे. परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिंकन यांच्या मते आम्ही अंदाज केला होता त्याआधीच अफगाणिस्तानवर त्यांनी ताबा मिळवला.
