अमेरिकेत मतमोजणीला 'म्हणून' होतोय वेळ
अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये पोस्टल मतं स्वीकारण्यासाठीची अंतिम तारीख वेगवेगळी आहे. म्हणून अनेकदा निवडणुकीचा दिवस उलटून गेल्यावरही इथली मतमोजणी सुरू असते. यावर्षी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लाखो लोकांनी पोस्टाने मतपत्रिका पाठवलेल्या आहेत आणि म्हणूनच मतमोजणीला अधिक वेळ लागतोय.