जॉर्जियामध्ये मतांची फेरमोजणी होणार
जॉर्जिया राज्याचे गृहमंत्री ब्रॅड रॅफन्सबर्गर यांनी राज्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 4,169 मतं मोजणं अजून बाकी आहे. तसंच सैनिकांनी दिलेली 8,000 ॲब्सेंटी मतं आज दिवसअखेर पर्यंत पोहोचली तरंच मोजली जातील. “पण सध्याची स्थिती पाहता, दोन्ही उमेदवारांमध्ये अगदी थोडंच अंतर आहे.
त्यामुळे जॉर्जियातल्या नियमांनुसार इथे फेरमोजणी होईल. जॉर्जियाच्या निकालाचा देशावर परिणाम होऊ शकतो. ” रॅफन्सबर्गर यांचे सहाय्यक गॅब्रिएल स्टर्लिंग यांनी स्पष्ट केलं आहे, की निवडणुकीत कुठलाही घोटाळा दिसून आलेला नाही आणि केवळ मतांचा फरक अगदी कमी असल्यानं पुन्हा मतमोजणी केली जाईल.
पेन्सिल्वेनियात बायडन यांची आघाडी आणखी वाढताना दिसते आहे. तिथले ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाचेच सिनमेटर पॅट टूमी यांनी निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप फेटाळला असून ट्रंप यांच्यावरच टीका केली आहे.