अमेरिका निवडणूक: अॅरिझोनामध्ये बायडेन यांना आघाडी

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची सुरू आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टामध्येच राष्ट्राध्यक्षपदाचा निर्णय होणार का?

  2. अमेरिकेतील निवडणुकीचं कोडं अद्याप का सुटलेलं नाही?

    अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कोडं सुटलेलं नाही. ते सुटेपर्यंत काही दिवसही जातील अशी परिस्थिती का निर्माण झाली? जाणून घेण्यासाठी सर्व स्लाईड्स पाहा...

  3. भारताशी संबंधित कोणते मुद्दे नवीन राष्ट्राध्यक्षांना हाताळावे लागतील?

    डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन

    अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांसमोर आशियाई देशांशी निगडीत अनेक मुद्दे असतील. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्यासोबत असलेले संबंध जपणं, चीनसोबत ताणले गेलेल संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न करणं, जपान, दक्षिण कोरियासारख्या जुन्या मित्रांना बरोबर घेऊन चालणं हे सगळे मुद्दे अमेरिकेची आशियायी देशांसंबंधीची धोरणं ठरवतील.

    बीबीसी प्रतिनिधी नेहा भटनागर आपल्या रिपोर्टमध्ये म्हणतात, “भारत-अमेरिकेचे संबंध गेल्या एका दशकात बऱ्यापैकी सुधारले आहेत आणि नवीन राष्ट्रपती भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.”

    तज्ज्ञांच्या मते चीनला आव्हान म्हणूनही अमेरिका भारताकडे या भागातली एक ताकद म्हणून पाहू शकते. यासाठी भारताला अमेरिका मदत देऊ करेल पण याच्याबदल्यात आपल्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करणं, शेजारी देशांशी असणाऱ्या संबंधांमध्ये हस्तक्षेप भारत खपवून घेणार नाही.

    दोन्ही देशांमध्ये आर्थिक सहकार्य, व्यापार, व्हीसा आणि अमेरिकास्थित अनिवासी भारतीयांचे मुद्दे महत्त्वाचे ठरतील.

    वेस्टमिन्सटर यूनिवर्सिटीच्या डॉ निताशा कौल यांच्या मते, “भारत आणि अमेरिकेच्या संबंधामध्ये अनेक चढ-उतार आलेले आहेत. शीतयुद्धाच्या काळात भारताने घेतलेली भूमिका आणि अमेरिकेचे पाकिस्तानशी असणारे जवळचे संबंध याने या दोन्ही देशांच्या संबंधांवर अनेक वर्षं परिणाम केला. आताही भारताचे रशियाशी असणारे संबंध याबाबतीत महत्त्वाचे आहेत. पण गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमध्ये आर्थिक राष्ट्रवाद वाढीला लागला आहे. अल्पसंख्यकांविषयक धोरणांमध्येही दोन्ही देशात समानता आढळून येतेय.”

  4. पेन्सिल्वेनियात ट्रंप यांची आघाडी कमी झाली

    पेन्सिल्वेनिया राज्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी या राज्यात आघाडी घेतली होती, पण आता ट्रंप यांचं मताधिक्य कमी होताना दिसून येतंय.

    अमेरिकेच्या इस्टर्न स्टॅण्डर्ड टाईमनुसार रात्री 11.30 वाजता, म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता ट्रंप 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर होते. बुधवारी दुपारी मात्र हीच आघाडी जवळपास 3 लाख 80 हजार इतकी होती.

    बीबीसीचे अमेरिकेतली सहकारी माध्यमसंस्था सीबीएसनुसार ज्या मतांची मोजणी शिल्लक आहे अशी पोस्टाने आलेली मतं बायडन यांच्या बाजूची असल्याची शक्यता आहे. जवळपास 31 लाख पोस्टल मतांचे अर्ज एकट्या पेन्सिल्वेनियात लोकांनी सरकारी यंत्रणेकडे केले होते.

    त्यातले जवळपास 63 टक्के लोक डेमोक्रॅटिक पक्षाला म्हणजेच बायडन यांच्या पक्षाला समर्थन देणारे होते. पेन्सिल्वेनिया राज्यात 20 इलेक्टोरल व्होट्स आहेत. म्हणजेच हे राज्य जिंकणं एकप्रकारे निवडणूक जिंकण्याची चावी आहे. पेन्सिल्विनियाने 2016 साली डोनाल्ड ट्रंप यांच्याबाजूने कौल दिला होता पण त्याअाधी सलग सहा निवडणुकांमध्ये इथून डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन लाभलं होतं.

    ट्रंप

    फोटो स्रोत, Getty Images

  5. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांना सुरुवात

    मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या काही शहरांमध्ये निदर्शनं सुरू झाल्याचं दिसत आहे.

    पोर्टलँडच्या ऑरेगोनमध्ये प्रत्येक मत मोजण्यात यावं, यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

    प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, एका मुख्य गटापासून काही जण बाजूला झाले आणि त्यांनी दुकांनाच्या खिडक्या फोडल्या. पोलिसांनी या घटनेला दंगल असं संबोधलं आहे.

    मिनेयापोलिसमध्ये पोलिसांनी 200 निदर्शकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी रस्ता रोको केला होता. हे निदर्शक डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात निदर्नन करत असल्याचं अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटलं आहे.

    अशीच निदर्शन न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि शिकागोमध्ये पाहायला मिळाली आहेत.

    डेट्रॉइटमध्ये ट्रंप यांचे समर्थक मतमोजणी केंद्राबाहेर येऊन मतमोजणी बंद करा, अशा घोषणा देताना दिसून आले.

    अमेरिका निवडणूक

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, अमेरिका निवडणूक
  6. अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत नेमकं काय चाललंय?

    आपल्या व्हाईट हाऊस प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील इतकी मतं आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी म्हटलंय. अजूनही अनेक राज्यांमधली गणना सुरू असून तिथले निकाल आले नसल्याने, आपण इतक्यातच विजय जाहीर करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

    दरम्यान ट्रंप यांनी मिशिगन, पेन्सलव्हेनिया आणि जॉर्जियामध्ये कायदेशीर कारवाईला सुरुवात केलीय. इथल्या मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करत मतमोजणी थांबवण्यात यावी असं ट्रंप यांनी म्हटलंय. पण हे दावे करताना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. शिवाय अशा प्रकारचा मोठा घोटाळा झाल्याचं सांगणारे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनीही म्हटलंय.

    त्यामुळे अमेरिकेत नेमकं काय सुरू आहे, ते पाहूया....

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  7. ट्रंप आणि बायडन : कोण कोणत्या राज्यात आघाडीवर?

    • जॉर्जियामध्ये अद्याप 2 लाख मतांची मोजणी बाकी आहे. इथं ट्रंप 38,996 मतांनी पुढे आहेत.
    • नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रंप 76,737 मतांनी आघाडीवर आहेत. इथल्या अधिकाऱ्यांच्या मते, इथला निकाल 13 नोव्हेंबर आधी लागू शकणार नाही.
    • विस्कॉन्सिनमध्ये बायडन 20,510 मतांनी आघाडीवर आहेत. इथं 99 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे.
    • नेवाडामध्ये 85 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे आणि बायडन 7,467 मतांनी पुढे आहेत.
    • पेन्सिल्वेनियामध्ये ट्रंप 1 लाख 87 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पण, इथं लाखो मतांची मोजणी बाकी आहे.
  8. पेन्सिल्वेनिया मतमोजणी केंद्राबाहेर ट्रंपविरोधी निदर्शक जमा

    फिलाडेल्फियाच्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये पेन्सिल्वेनिया राज्याची मतमोजणी सुरू आहे. या राज्यात डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात अटीतटीची लढाई सुरू आहे. हे राज्य जिंकणं दोन्ही उमेदवारांसाठी महत्त्वाचं आहे. आता पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी सुरू आहे.

    निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की पोस्टाने आलेली हजारो मतं मोजयला अनेक दिवस लागू शकतात. केंद्राबाहेर जमलेले निदर्शक 'प्रत्येक मत मोजलं गेलंच पाहिजे' अशा आशयाच्या घोषणा देत आहेत.

    डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा निवडून आले तर किती भयावह परिस्थिती उद्भवू शकते याबद्दल हे निदर्शक भाषणं करत आहेत. या आंदोलकांनी एका पत्रकारावरही निशाणा साधला जे डोनाल्ड ट्रंप यांचे पुत्र एरिक ट्रंप यांची पत्रकार परिषद कव्हर करायला त्यांच्यासोबत आले होते.

    “त्यांच्याकडे (एरिक ट्रंप) सांगण्यासारखं काहीही नाहीये. आमच्याशी बोला, आम्ही फॅसिझमविरोधात लढा देतोय,” एका निदर्शकाने ओरडून सांगितलं.

    ट्रंपविरोधी निदर्शक

    फोटो स्रोत, Getty Images

  9. बायडन यांनी केली ट्रांन्झिशन वेबसाईट सुरू

    जो बायडन

    फोटो स्रोत, Drew Angerer/Getty Images

    फोटो कॅप्शन, जो बायडन

    अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो उमेदवार जिंकतो, तो व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ट्रान्झिशन टीम स्थापन करत असतो.

    अजून निवडणुकीचा अंतिम निकाल लागलेला नसून दोन्ही उमेदवारांनी विजयाची शक्यता बोलून दाखवली आहे.

    अशातच बायडन यांनी ‘बिल्ड बॅक बेटर’ नावानं ट्रान्झिशन वेबसाईट सुरू केली आहे.

    यात लिहिलंय, “सध्या देश कोरोना संकट, आर्थिक मंदी, हवामान बदल तसंच वंशभेदासारख्या आव्हानांचा सामना करत आहे. ट्रान्झिशन टीम वेगात काम करेल, जेणेकरून बायडन–हॅरिस यांची जोडी पहिल्या दिवसापासून काम करू शकेल.”

  10. आतापर्यंत कोण आघाडीवर?

    अमेरिका निवडणूक
    फोटो कॅप्शन, अमेरिका निवडणूक
  11. डोनाल्ड ट्रंप सुप्रीम कोर्टात गेले तर काय होईल?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  12. जो बायडन मिशिगनमधून विजयी

    डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी मिशिगन राज्यातून विजय मिळवला आहे. आतापर्यंत बायडन यांना 7 कोटी 15 लाख मतं मिळाली असून पुरेशा राज्यांत विजय मिळवून राष्ट्राध्यक्षपद मिळवणार असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे.

    मतमोजणी संपल्यानंतर विजय आमचाच होईल, असंही ते म्हणाले आहेत.

  13. राष्ट्राध्यक्षीय निवडणूक निकाल नकाशा

    अमेरिका निवडणूक
    फोटो कॅप्शन, अमेरिका निवडणूक
  14. ट्रंप की बायडन, कधी सुटणार राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाचं कोडं?

  15. काय काय घडलंय आतापर्यंत?

    आपल्या व्हाईट हाऊस प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील इतकी मतं आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी म्हटलंय. अजूनही अनेक राज्यांमधली गणना सुरू असून तिथले निकाल आले नसल्याने, आपण इतक्यातच विजय जाहीर करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

    जो बायडन मिशिगनमधून जिंकतील असा बीबीसीचा अंदाज आहे तर ते विस्कॉन्सिनमधून जिंकतील असं अमेरिकन माध्यमांनी म्हटलंय. पेन्सलव्हेनियामधून अजूनही कोणताही निकाल आलेला नसला तरी आपल्याला याबद्दल सकारात्मक वाटत असल्याचं बायडन यांनी म्हटलंय.

    दरम्यान ट्रंप यांनी मिशिगन, पेन्सलव्हेनिया आणि जॉर्जियामध्ये कायदेशीर कारवाईला सुरुवात केलीय.

    इथल्या मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करत मतमोजणी थांबवण्यात यावी असं ट्रंप यांनी म्हटलंय. पण हे दावे करताना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. शिवाय अशा प्रकारचा मोठा घोटाळा झाल्याचं सांगणारे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनीही म्हटलंय.

    सध्याच्या घडीला अमेरिकेत अनिश्चितता आहे. डेट्रॉईटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट सर्मथकांमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश नाकारल्यानंतर बाचाबाची झाली.

    प्रातिनिधिक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
  16. बायडन म्हणतात विजय दृष्टीपथात

    अमेरिकेतली मतमोजणी सुरू असली तर दोन्ही बाजू विजयाचे दावे करतायत.

    आपल्या सर्मथकांसमोर बोलताना जो बायडन यांनी आपला विजय जाहीर केला नाही, पण आपलाच विजय होणार असून राष्ट्राध्यक्षपद आपल्यालाच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

    जो बायडन म्हणाले,“मतमोजणीची दीर्घ रात्र उलटल्यानंतर सगळं स्पष्ट झालंय. मी इथे आपला विजय झाल्याचं जाहीर करायला आलेलो नाही. पण मी हे सांगायला आलोय की जेव्हा ही मतमोजणी संपेल, तेव्हा आपणच विजयी झालेलो असू यावर माझा विश्वास आहे.”

    यावेळच्या निवडणुकीमध्ये झालेल्या अभूतपूर्व मतदानाचा उल्लेखही बायडन यांनी त्यांच्या भाषणात केला.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. आतापर्यंत काय घडलं?

    व्हाईट हाऊसच्या शर्यतीमध्ये आपणच विजयपथावर असल्याचा दावा स्पर्धेतले दोन्ही उमेदवार – डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन करतायत. मतमोजणी संपेल तेव्हा आपणच जिंकू असा विश्वास जो बायडन यांनी त्यांच्या समर्थकांसमोर बोलताना व्यक्त केला.

    सोबतच दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाईसाठीही तयारी सुरू केलीय. विस्कॉन्सिन, पेन्सलव्हेनिया आणि मिशीगन या महत्त्वाच्या राज्यांमधल्या मतमोजणीला आव्हान देण्याची तयारी ट्रंप मोर्चाने सुरू केलीय. जो बायडन मिशिगनमधून जिंकतील असा बीबीसीचा अंदाज आहे. तर विस्कॉन्सिनमधून ते जिंकतील असा अंदाज अमेरिकन माध्यमांनी वर्तवलाय.

    पेन्सलव्हेनियामधून अद्याप कोणताही निकाल आलेला नाही.बायडन जर या तीनही राज्यांतून जिंकले, तर ते विजयाच्या अगदी जवळ जातील.अमेरिकेच्या अनेक स्विंग राज्यांमधली मत मोजणी अजूनही सुरू आहे.

    फ्लोरिडा, ओहायो, टेक्सास आणि आयोवामधून ट्रंप यांचा विजय होण्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आलेली आहे.पण जो बायडन यांनी मिशिगनवर वर्चस्व मिळवलेलं आहे.

    2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी इथून विजय मिळवलेला होता.ॲरिझोना,पेन्सलव्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये अजूनही अटीतटीची लढत सुरू आहे. आतापर्यंत बायडन यांच्याकडे 243 इलेक्टोरल कॉलेज मतं तर ट्रंप यांच्याकडे 214 इलेक्टोरल कॉलेज मतं जाण्याचा अंदाज आहे.

    राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी 270 मतांची गरज आहे.अद्याप 7 राज्यांमधले कल येणं बाकी असल्याने, निकाल लागायला अजून वेळ आहे.

    या सात राज्यांकडे किती इलेक्टोरल व्होट्स आहेत, यावर एक नजर टाकूयात

    -पेन्सलव्हेनिया – 20

    -जॉर्जिया- 16

    -नॉर्थ कॅरोलिना-15

    -ॲरिझोना-11

    -विस्कॉन्सिन 10

    -नेवाडा 6

    -अलास्का 3

    ट्रंप

    फोटो स्रोत, Getty Images