अमेरिका निवडणूक: अॅरिझोनामध्ये बायडेन यांना आघाडी

अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची सुरू आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. बराक ओबामांचे सहकारी ते अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष, जो बायडन यांचा प्रवास

  2. डोनाल्ड ट्रंप मोडणार परंपरा, जो बायडन यांच्या शपथविधीला राहणार गैरहजर

  3. कोण जिंकणार अमेरिकेतील निवडणूक?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    लेखक आणि अभ्यासक सूरज येंगडे यांनी गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील वास्तव्यात तिथलं राजकारण आणि समाज जवळून पाहिला आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्याशी संवाद साधला. ट्रंप आणि बायडन यांच्यापैकी कुणाचं पारडं सध्या जड आहे? अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय वंशाचे मतदार का महत्त्वाचे ठरू शकतात? अशा अनेक मुद्यांवर त्यांनी आपली मतं मांडली आहेत

  4. डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या ट्वीटवर चर्चा

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. या ट्वीटचा नक्की अर्थ काय यावर तर्कवितर्क केले जात आहेत.

  5. अमेरिका निवडणुकीसह आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवरील चर्चा

  6. आता थोड्याच राज्यांचे निकाल येण्याची प्रतीक्षा

    usa

    फोटो स्रोत, Getty Images

    अमेरिका निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता फक्त थोड्याच राज्यांचा कल हाती येणं बाकी आहे. बायडन 243 इलेक्टोरल कॉलेजच्या मतांसह आघाडीवर आहेत. ट्रंप यांना 241 मतं आहेत.

    270 मतं मिळणाऱ्या प्रतिनिधीला राष्ट्राध्यक्ष होता येतं. अरिझोना, जॉर्जिया, नेवाडा, पेनसिल्वानिया, नॉर्थ कॅरोलिना आणि व्हिस्कॉन्सिन या राज्यांच्या हातात आता निर्णायक कौल आहे.

    ट्रंप यांना राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वानिया, अॅरिझोना, नेवाडापैकी एका ठिकाणी विजय मिळवावा लागेल.

    जर बायडेन यांना व्हिस्कॉन्सिनमध्ये विजय मिळाला तर त्यांना अॅरिझोना आणि नेवाडाही जिंकावं लागेल.

    अॅरिझोनामध्ये बायडन यांना 80 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रंप यांना 77 हजार मतांची आघाडी मिळाली आहे.

  7. अॅरिझोनाचा अंतिम निकाल काय असेल?

    अॅरिझोनाचा अंतिम निकाल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अॅरिझोनाचा अंतिम निकाल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  8. खोट्या दाव्यांमुळे अमेरिकन निवडणुका दुषित- आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक

    ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कोऑपरेशन इन युरोप या पर्यवेक्षण संस्थेने राजकीय ध्रुवीकरण आणि घोटाळ्याच्या तथ्यहीन आरोपांमुळे निवडणुका दुषित झाल्या आहेत असं निरीक्षण नोंदवलं आहे. मतदानामध्ये अनेक आक्षेप राजकीय पक्षांनी नोंदवले आहेत. ट्रंप यांच्या प्रचार दलाने पेन्सिल्वेनिया, व्हिस्कॉन्सिन, जॉर्जिया आणि मिशिगनच्या मतांची मोजणी रोखण्याची मागणी केली आहे. मतांमध्ये घोटाळा झाल्याचा आऱोप त्यांनी केला आहे मात्र त्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही.

  9. अमेरिका निवडणूक निकाल : ...तर 'या' महिलेच्या हाती येतील राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र

  10. जो बायडन यांचं ते भाषण निवडणूक फिरवेल का?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची कधीही चर्च निघाली की, शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची आठवण काढली जातेच. त्या सभेतील पावसात भिजत भाषण करतानाच्या शरद पवारांच्या दृश्यानं महाराष्ट्रातील सोशल मीडिया दाणाणून सोडला. माध्यमांनी हे दृश्य दाखवलं. शरद पवार यांच्या या सभेची आठवण निघण्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील निवडणूक आणि तेथील ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांची भर पावसातली सभा. अमेरिकेच्या दक्षिण-पूर्व भागातील फ्लोरिडा राज्यात जो बायडन यांची ही सभा झाली. सभा सुरू असतानाच पाऊस आला आणि भर पावसातच जो बायडन हे भाषण करत राहिले. पण जो बायडन यांच्या 'या' सभेची शरद पवारांच्या सभेशी तुलना का होतेय? पावसातली ही सभा निवडणूक फिरवणार का?

  11. अमेरिकन निकालाच्या तीन प्रमुख शक्यता

    या ऐतिहासिक निवडणुकीत मतदारांचा आतापर्यंतचा कौल कुणाच्या बाजूने आहे? अमेरिकन निकालाच्या तीन प्रमुख शक्यता काय असतील-

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. रशियातली माध्यमं अमेरिकेतल्या निवडणुकीकडे कसे पाहात आहेत?

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. अॅरिझोनामध्ये बायडन यांची आघाडी

    अॅरिझोनामधील मॅरिकोपा काऊंटीच्या मतमोदणीमध्ये बायडन यांना 75415 मते जास्त मिळाल्याचं दिसून आलं आहे. संपूर्ण अॅरिझोना राज्याचा विचार करता बायडन यांना एकूण 68 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. अर्थात आताच अरिझोनाबद्दल कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.

  14. ट्रंप पराभूत झाले तर?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    अवघ्या काही तासांत आपल्याला कळेल की अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे. एका बाजूला आहेत सक्रीय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डॉनल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन. कोण जिंकेल? बायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत.

  15. निकालाला आव्हान दिलं गेलं तर....

    अमेरिका

    फोटो स्रोत, Getty Images

  16. अॅरिझोनामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर ट्रंप समर्थकांची निदर्शनं

    usa

    फोटो स्रोत, Getty Images

    अॅरिझोनामध्ये मॅरिकोपा काऊंटी रेकॉर्डर केंद्राबाहेर रिपब्लिकन समर्थकांनी निदर्शनं केली. या केंद्रामध्ये मतमोजणी सुरू होती.

    ट्रंप यांच्या मतांची मोजणी केली नसल्याचा आरोप या निदर्शकांनी सोशल मीडियावर केला आहे. पोलिसांना बोलावल्यानंतरही ही निदर्शनं थांबली नाहीत.

  17. डोनाल्ड ट्रंप कोर्टात गेल्यास पुढे काय होईल?

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    अमेरिकेत मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशीही अजून काही कोटी मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे निकालाची अनिश्चितता आहे. पण, पुढे नेमकं काय होऊ शकतं?

  18. अमेरिकेतल्या निवडणुकीत नक्की काय सुरू आहे?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

    आपल्या व्हाईट हाऊस प्रवेशावर शिक्कामोर्तब करतील इतकी मतं आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास आपल्याला असल्याचं डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी म्हटलंय.

    अजूनही अनेक राज्यांमधली गणना सुरू असून तिथले निकाल आले नसल्याने, आपण इतक्यातच विजय जाहीर करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

    दरम्यान ट्रंप यांनी मिशिगन, पेन्सिल्वेनिया आणि जॉर्जियामध्ये कायदेशीर कारवाईला सुरुवात केलीय. इथल्या मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करत मतमोजणी थांबवण्यात यावी असं ट्रंप यांनी म्हटलंय. पण हे दावे करताना त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. शिवाय अशा प्रकारचा मोठा घोटाळा झाल्याचं सांगणारे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनीही म्हटलंय.

  19. घोटाळा झाल्याचे आरोप अॅरिझोनामधील अधिकाऱ्यांनी फेटाळले

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    मार्करने खूण केलेली मतपत्रिका मतमोजणीत अयोग्य ठरवल्याचा दावा अॅरिझोनामधील निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे.

    असं काहीही झालं नसल्याचा दावा निवडणूक अधिकारी केटी हॉब्स यांनी ट्वीट करुन स्पष्ट केलं आहे.

    अॅरिझोनामध्ये 85 टक्के मतांची मोजणी झाल्यावर बायडन यांनी 79,000 मतांची आघाडी घेतल्याचं दिसतं. 1952 नंतर केवळ 1996 चा अपवाद वगळता रिपब्लिकन पक्षाचा इथं विजय झाला आहे.

  20. अमेरिका निवडणुकीबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?

    usa

    फोटो स्रोत, Getty Images

    • मिशिगनमध्ये बायडन यांचा विजय होण्याची शक्यता आहे. आजवरची परंपरा पाहाता इथं डेमोक्रॅटिक विजयी होतात. मात्र 2016 हिलरी क्लिंटन यांचा इथं पराभव झाला होता.
    • जॉर्जियामध्ये अजून सगळ्या मतांची मोजणी झालेली नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रात्री 90 हजार मतांची मोजणी शिल्लक होती. तोपर्यंत ट्रंप यांची आघाडी 28 हजारांवर आली होती.
    • नेवाडामध्ये बायडन यांना फक्त 7,647 मतांची आघाडी आहे.
    • अरिझोनामध्ये मतांची मोजणी सुरू आहे,पण त्याचे निकाल कधी येतील हे स्पष्ट झालेलं नाही.
    • व्हिस्कॉन्सिनमध्ये बायडन यांना 20,510 मतांची आघाडी मिळाली आहे.
    • पेनसिल्वानियामध्ये ट्रंप यांची आघाडी कमी झाली आहे.
    • नॉर्थ कॅरोलिनामध्ये ट्रंप यांना 76,737 मतांची आघाडी मिळाली आहे.