अमेरिकेचा कल कोणाच्या बाजूने?

फोटो स्रोत, ट्रंप बायडन
डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे लवकरच कळणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीत 'स्विंग स्टेट्स'ची भूमिका ही महत्त्वाची समजली जाते.

फोटो स्रोत, ट्रंप बायडन
आतापर्यंत 50राज्यांपैकी 19 राज्यांतले कलसमोर येत आहेत. साउथ कॅरोलिना राज्यात ट्रंप विजयी होतील, हे अनुमान आहे. त्याचसोबत अलाबामा, नॉर्थ डाकोटा, साउथ डाकोटा राज्यातही ट्रंप यांच्या विजयाचं अनुमान आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे बायडन हे कनेक्टिकट, न्यूयॉर्क, कोलोरोडो राज्यांमध्ये बायडन विजयी होतील असा कल आहे.
डेलावेअरमधून पहिल्यांदाच ट्रान्सजेन्डर सिनेटर निवडून आल्याचं वृत्त AP आणि CBC नं दिलं आहे. सारा मॅकब्राइड या डेलावेअरमधून सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत.
त्यांनी ओबामा प्रशासनात इंटर्न म्हणून काम केलं होतं. त्यांनी कायमच एलजीबीटी समुदायाच्या हक्कांचं समर्थन केलं आहे.
LGBTQ Victory Fund च्या अध्यक्षा अॅनिस पार्कर यांनी मॅकब्राइड यांचा विजय हा अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तिंसाठी प्रेरणादायी ठरेल असं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. काही राज्यांत बायडन आघाडीवर आहेत, तर काही ठिकाणी ट्रंप आघाडीवर आहेत.
अतिशय चुरशीची अशी लढत सुरू आहे. निकालाचे अंदाज काय आहेत? निकालानंतर काय होऊ शकतं? निकालानंतरच्या 3 शक्यता काय आहेत? जाणून घेऊया सोपी गोष्टमधून...
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
डोनाल्ड ट्रंप हे टेनेसीमधून विजयी होत असल्याचं अनुमान आहे.
बिल क्लिंटन यांच्यानंतर टेनेसीनं कायमच रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारालाच मतं दिली आहेत. 2016मध्ये ट्रंप हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा 26 पॉइंट्सनं आघाडीवर होते.
वेस्ट व्हर्जिनियामधूनही ट्रंप यांच्या विजयाचं अनुमान आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये या राज्यानं रिपब्लिकन पक्षाच्या बाजूनेच कौल दिला आहे.
अर्कान्सासमध्येही ट्रंप विजयी होतील असं अनुमान आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Joe Raedle/Newsmakers
अवघ्या काही तासांत आपल्याला कळेल की अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे. एका बाजूला आहेत सक्रीय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन.
कोण जिंकेल? बायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
जो बायडन हे व्हर्मोन्टमधून विजयी होतील असं अनुमान आहे. हे राज्य डेमोक्रॅटिक पक्षाचा बालेकिल्ला मानलं जातं.2016 साली हिलरी क्लिंटन यांना इथून 56 टक्के मतं मिळाली होती.
या राज्यात इलेक्टोरल कॉलेजची तीन मतं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डेलावर, मेरिलँड, मॅसेच्युसेट्स आणि न्यू जर्सी या राज्यांमधूनही जो बायडन हे विजयी होत असल्याचा सुरूवातीचा कल आहे.
इंडियानामधून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप विजयी होत असल्याचा अंदाज आहे. हे राज्य उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचं गृहराज्य आहे आणि इथून सहसा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवारच विजयी झाल्याचं पहायला मिळतं.
मात्र, 2008 साली इंडियानामधून बराक ओबामा विजयी झाले होते.
इंडियानामध्ये इलेक्टोरल कॉलेजची 11 मतं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
यावेळी अमेरिकेत विक्रमी मतदानाची चर्चा सुरू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडामधील प्राध्यापक मायकल मॅकडोनाल्ड सांगतात की, ओरेगन अमेरिकेतली पाचवं राज्य आहे, जिथे 2016 च्या तुलनेत जास्त मतदान झालं आहे.
टेक्सास, हवाई, मोंटाना, वॉशिंग्टन आणि आता ओरेगन इथं मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला. टेक्सासमध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यामध्ये चुरशीची लढत असल्याचं सांगितलं जातंय.
सुरूवातीच्या टप्प्यात 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी मतदान केल्याचं सांगितलं जातंय.

फोटो स्रोत, Getty Images
मतदानादरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्वीट करून म्हटलं, “आपण कोठून आलो आहोत आणि कोठे राहतो, याला फारसं महत्त्व नसतं हे जो बायडन यांना ठाऊक आहे. आपला वंश, लिंग, पार्श्वभूमी आणि धार्मिक श्रद्धा यांनीही काही फरक पडत नाही. तुमची ओळख काय आहे आणि तुम्ही कोणावर प्रेम करता या गोष्टीही तशा निरर्थक आहेत. तुमचे पूर्वज कोणती भाषा बोलायचे, यानेही फरक पडत नाही. या सगळ्या गोष्टींचा वापर करून कोणीही आपल्यामध्ये फूट पाडू शकत नाही.”