You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

अमेरिका निवडणूक निकाल : कोण होणार राष्ट्राध्यक्ष?

डोनाल्ड ट्रंप व्हाईट हाऊसमध्ये आणखी 4 वर्षं राहणार की नाही हे लवकरच कळणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीत 'स्विंग स्टेट्स'ची भूमिका ही महत्त्वाची समजली जाते.

लाईव्ह कव्हरेज

  1. पती-पत्नी जेव्हा 2 वेगळ्या पक्षांना मतदान करतात

    अमेरिका हे आता विभागलेलं घर आहे, असं काहीजण म्हणतात. पण जर का राजकारणामुळे एखाद्या कुटुंबातच मतभेद असतील तर? इमिग्रेशनसारख्या धोरणांवर त्यांना काय वाटतं? ट्रंप यांच्याविषयी या जोडप्याला काय वाटतं? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ-

  2. डोनाल्ड ट्रंप यांना आव्हान देणारे बायडन कोण आहेत?

    जो बायडन हे परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. वॉशिंग्टन डीसी मधला अनेक वर्ष राजकारणाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जीभेवर साखर ठेवून बोलणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे. आपल्या वक्तृत्व कौशल्याने ते चुटकीसरशी लोकांची मनं जिंकतात. बायडन यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी सहजपणे सामान्य माणसात मिसळतात. खाजगी आयुष्यात बायडन यांनी अनेक चढ-उतार पाहिलेत आणि अनेक संकटं झेलली आहेत. समर्थकांच्या मते या बायडन यांच्या जमेच्या बाजू आहेत.

    जो बायडन यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी क्लिक करा- जो बायडन कोण आहेत?

  3. जो बायडन यांनी विजय मिळवल्यास चीनचं काय होईल?

    22 ऑक्टोबरला डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यामध्ये तिसरी प्रेसिडेन्शियल डिबेट झाली. यावेळी संचालकाने जो बायडन यांना एक प्रश्न विचारला… कोरोना व्हायरससंदर्भात पारदर्शकता न बाळगल्याबद्दल ते चीनवर कशाप्रकारे कारवाई करतील?

    या प्रश्नाचं उत्तर देताना बायडन यांनी म्हटलं, "चीनवर आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे कारवाई करू. चीनलाही आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करावं लागेल."

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनवर कोरोना व्हायरससंबंधातील माहिती दडविल्याचा आणि हा विषाणू जगभर पसरू देण्याचा आरोप केला आहे. चीननं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

    अमेरिकेत कोरोनामुळे 2 लाख 30 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचंही नुकसान झालं आहे.

    अमेरिकेतील डेलावेयर विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक मुक्तदर खान हे विधान भ्रामक असल्याचं म्हणतात. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा-जो बायडन यांनी विजय मिळवल्यास चीनचं काय होईल?

  4. ट्रंप म्हणतात, 'बायडन निवडणूक चोरण्याचा प्रयत्न करतायत'

  5. अमेरिकन निवडणूक निकालात 'या' आहेत निकालाच्या 3 प्रमुख शक्यता

  6. फ्लोरिडात ट्रंप यांना 51% मतं

    अमेरिकेच्या पूर्वेला असणाऱ्या फ्लोरिडा राज्यातली जवळपास सगळी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. या राज्यामध्ये डोनाल्ड ट्रंप यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. डोनाल्ड ट्रंप यांना 51% मतं मिळालेली आहेत तर जो बायडन यांना 48% मतं मिळालेली आहेत. 2016मधल्या निवडणुकीमध्ये हिलरी क्लिंटन यांना जितकी मतं मिळाली होती, त्यापेक्षा बायडन यांची कामगिरी फारशी वेगळी नाही.

  7. विविध राज्यांमधले आतापर्यंतचे कल

  8. 'निवडणूक जिंकल्याचा दावा ट्रंप करू शकत नाहीत'

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपण निवडणूक जिंकलो होतो मात्र देशाला फसवण्यात आलं आहे असं सांगत सुप्रिम कोर्टात जाण्याची घोषणा केली होती. त्यावर बीबीसीचे अमेरिका ब्युरो चिफ पॉल डनहर म्हणतात, "राष्ट्राध्यक्ष आताच निवडणूक जिंकल्याचा खात्रीलायक दावा करू शकत नाहीत. आतापर्यंत घोटाळा झाल्याचा कोणताही पुरावा नाही. लाखो वैध मतांची अजून मोजणी झालेली नाही."

  9. ट्रंप यांचा विजयाचा दावा, पण 40 राज्यातले कल काय आहेत?

  10. ट्रंप यांनी निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ असं का म्हटलं?

    अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे कल समोर येत आहेत. या दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 'व्हाईट हाऊस'मधून केलेल्या संबोधनात म्हटलं की, आपण निवडणूक जिंकलो आहोत.

    ट्रंप यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानताना म्हटलं," आपण एका मोठ्या विजयासाठी तयार होतो. आम्ही सगळीकडे जिंकत होतो."

    "मात्र असं असताना काही गोष्टी समोर येऊ लागल्या ज्यामुळे वाटायला लागलं की, दुःखी लोकांचा एका गट लोकांच्या मताधिकाराचा खेळखंडोबा करत आहे. टेक्सास, फ्लोरिडा आणि ओहायोमध्ये आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. त्यांना माहितीये की ते जिंकू शकत नाही. म्हणूनच ते कोर्टात जाण्याबद्दल बोलत होते. मला हे पहिल्यापासून माहीत होतं," असं ट्रंप यांनी म्हटलं.

    "हा एक मोठा धोका आहे. निंदनीय आहे. हा आपल्या देशासोबत धोका आहे. आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. आम्ही आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात जाऊ. मतदान संपल्यानंतर मतदान करू दिलं जाणार नाही."

  11. पोस्टल बॅलेटमुळे निकालांना उशीर लागू शकतो?

    अमेरिकन निवडणुकीच्या संदर्भात यावर्षी तुम्ही पोस्टल बॅलेटबद्दल खूप ऐकलं असेल.

    पोस्टानं मतदान करण्यात काही नवीन नाही. 2016 मध्ये एकूण मतदानापैकी एक चतुर्थांश मतदान हे पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून झालं होतं.

    पण यावर्षी कोव्हिड-19 मुळे पोस्टल बॅलेटमध्ये वाढ झाली आहे.

    काही राज्यांनी या मतांची मोजणी सुरू केली आहे. काही राज्यांत तर पोस्टल बॅलेटची मोजणी एक दिवस सुरू केली होती. बाकी राज्यांनी मतदानाच्या दिवसांपर्यंत मतमोजणी सुरू केली नव्हती.

    बायडन आणि ट्रंप यांच्यासाठी अटीतटीच्या ठरणाऱ्या पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिनमध्ये पोस्टल बॅलेटची मोजणी निवडणुकीच्याच दिवशी सुरू झाली. ही प्रक्रिया साधारण मतगणनेपेक्षा जास्त वेळखाऊ असते.

    मिशिगन प्रशासनानं स्पष्टपणे सांगितलं आहे की, त्यांना मतमोजणीसाठी शुक्रवारपर्यंतचा वेळ लागू शकतो. ब्लूमबर्ग न्यूजच्या मते या प्रमुख राज्यांतील निकाल येण्यासाठी बुधवार संध्याकाळपर्यंत वेळ लागू शकतो.

  12. ट्रंप आणि बायडन दोघांनाही वाटतोय विजयाचा विश्वास

  13. 50 पैकी 39 राज्यातले कल काय सांगतात?

  14. अमेरिका निवडणुकीत कोण आहे आघाडीवर, ट्रंप की बायडन

  15. ट्विटरनं ट्रंप यांच्या 'या' ट्वीटवर कोणती सूचना केली?

    ट्विटरनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या एका ट्वीटवर सूचना लिहिली आहे. 'ही माहिती निवडणूक प्रक्रिया किंवा अन्य नागरी प्रक्रियांमधील सहभागाबद्दल दिशाभूल करणारी असू शकते' अशी सूचना या ट्वीटसोबत पहायला मिळतीये.

    ट्रंप यांनी या ट्वीटमध्ये नेमकं असं काय म्हटलं आहे?

    बायडन यांच्या डेलावेअरमधल्या भाषणानंतर ट्रंप यांनी हे ट्वीट केलं आहे.

    या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, की आपण पुढे आहोत. पण ते निकाल 'चोरण्याचा' प्रयत्न करत आहेत. पण आपण त्यांना हे करू देणार नाही. निवडणूक संपल्यानंतर मतदान करता येणार नाही.

  16. आपण विजयाच्या मार्गावर योग्य दिशेने आहोत- जो बायडन

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे कल समोर येत असताना डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी डेलावेअरमध्ये एक भाषण केलं.

    "विस्कॉन्सिन आणि मिशिगनबद्दल आपण समाधानी आहेत. जोपर्यंत प्रत्येक मत मोजलं जात नाही, तोपर्यंत निवडणूक संपणार नाही," असं त्यांनी म्हटलं.

    "आपण विजयाच्या मार्गावर योग्य दिशेने आहोत, असं मला वाटतंय. निकाल येण्यासाठी वेळ लागेल, याची आपल्याला कल्पना होती. पण त्यासाठी उद्याची सकाळ उजाडेल किंवा त्याहून अधिक वेळही लागू शकेल याचा अंदाज कोणाला आला होता," असं बायडन यांनी म्हटलं.

  17. कशी पार पडते अमेरिकेतली निवडणूक?

    अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे कल हाती येत आहेत. जो बायडन आणि ट्रंप यांच्यात अनेक राज्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

    अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण असेल हे काही तासांमध्ये समजेल. पण मुळात ही सगळी निवडणूक पार पडते कशी? जाणून घेऊया या व्हीडिओमधून.

  18. ट्रंप विरुद्ध बायडन : 50 पैकी 34 राज्यांमध्ये कोण आघाडीवर?

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत 50 पैकी 31 राज्यांचे कल समोर आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहेत.

    फ्लोरिडामध्ये ट्रंप यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. अर्थात, जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, विस्कॉन्सिन, मिशिगन, अॅरिझोना, ओहायो, टेक्सास आणि नॉर्थ कॅरोलिना राज्यातील निकालांवर बरंच काही अवलंबून आहे.

    राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीबरोबर काँग्रेसमध्ये कोणाचं वर्चस्व असेल, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. व्हाईट हाऊससोबतच सिनेटमध्येही वर्चस्व राखण्याचा रिपब्लिकन्सचा प्रयत्न आहे.

  19. डोनाल्ड ट्रंप राष्ट्राला संबोधित करण्याची शक्यता

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची निवडणूक मोहीम सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेतील बीबीसीचं सहयोगी सीबीएस नेटवर्कशी बोलताना म्हटलं की, डोनाल्ड ट्रंप आज आपला दृढपणा आणि दृष्टिकोन मांडू इच्छितात.

    त्यांनी म्हटलं, "राष्ट्राध्यक्ष आज रात्री बोलतील. विजयाची घोषणा करण्यासाठी ते लोकांना संबोधित करणार नाहीत, तर व्हाईट हाऊसच्या ईस्ट रुममधून ट्रंप आपला दृष्टिकोन मांडतील.

  20. व्हाईट हाऊसबाहेर काय आहे परिस्थिती?

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांचे कल हाती येत आहेत.

    अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड होत असताना व्हाईट हाऊस बाहेर कसं वातावरण आहे याचा आढावा घेतला आहे बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी