विधानसभा निवडणूक निकाल : हा नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी, गरीबांचा विजय- नरेंद्र मोदी
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड अशा चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे.
लाईव्ह कव्हरेज
राजस्थान विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मोहम्मद अझरुद्दिन पिछाडीवर, तेलंगणच्या ज्युबिली हिल्स मतदारसंघात काँग्रेसतर्फे लढवलेली निवडणूक

फोटो स्रोत, ANI
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दिन तेलंगणाच्या ज्युबिलि हिल्स मतदारसंघात पिछाडीवर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार अझरुद्दिन बीआरएसच्या के. एम गोपीनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवत होते.ते आता 1648 मतांनी पिछाडीवर आहेत.
'पनौती की चुनौती' हे आता कळालं असेल- आशीष शेलार
तीन राज्यांतील निकालांमध्ये भाजपाला आघाडी मिळाल्यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'पनौती की चुनौती हे आता कळालं असेल. मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो मुंबई महानगरपालिकेत 50 जरी जागा निवडून आणल्या तरी मी एकनाथ शिंदे यांच्या परवानगीने ठाण्यातील सोन्याचा पेढा तुम्हाला भरवेन.'
जादुगाराची जादू संपली- शेखावत

फोटो स्रोत, ANI
राजस्थानातील निकालातील कलामध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळाल्यानंतर केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर टीका केली आहे.
केंद्रीय जलशक्तीमंत्री शेखावत म्हणाले, "या निवडणुकीत भाजपा प्रचंड बहुमताने विजयीहोईल. जादुगाराची जादू आता संपलीय हे निश्चित.जादुगाराचं मायाजाल निष्प्रभ झालंय. राजस्थानच्या जनतेने वास्तव स्थिती पाहून मतदान केलंय. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही भाजपाच सरकार स्थापन करेल."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मध्य प्रदेशचे विद्यमान गृहमंत्री नरोत्तम मिश्रा पिछाडीवर

फोटो स्रोत, Getty Images
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा दातिया मतदारसंघातून 5400 मतांनी पिछाडीवर आहेत.
या जागेवर अद्याप 13 फेऱ्या होणं बाकी आहे. आता फक्त चारच फेऱ्या झाल्या आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपला 230 पैकी 161 जागांवर आघाडी मिळाली आहे.
काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे.
तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार रेवंत रेड्डींचा प्रवास जाणून घ्या
तेलंगणाच्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा विजयरथ रोखणाऱ्या रेवंत रेड्डींना आता काँग्रेसकडून तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जातंय.
एकेकाळी जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी झगडलेले रेवंत रेड्डी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपर्यंत कसे पोहोचले, याची कहाणी रंजक आहे.
वाचा : रेवंत रेड्डी : झेडपीचं तिकीट नाकारलं, पोलिसांनी उचलून नेलं, आता तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

फोटो स्रोत, Facebook
राजस्थानात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील उमेदवाराची काय आहे स्थिती?
राजस्थानात शिंदे गटाचे एकमेव उमेदवार राजेंद्र गुढा सध्या पिछाडीवर आहेत.
हे राजेंद्र गुढा खरंतर गेहलोत सरकार मधले मंत्री होते. 55 वर्षांचे गुढा जवळपास 2008 पासून राजस्थानच्या राजकारणात सक्रीय आहेत. आधी काँग्रेस आणि मग बहुजन समाज पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती.
गेल्या निवडणुकीत ते बसपाकडून निवडून आले. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होत मंत्री देखील झाले. पण सत्तेत असताना देखील अशोक गेहलोत यांचे मुख्य टीकाकार अशीच त्यांची ओळख राहिली.

अगदी ते सचिन पायलट यांच्या बाजूचे असल्याने गेहलोत यांना टार्गेट करतात असेही आरोप झाले.
त्यांनी उघडकीस आणलेल्या लाल डायरीमुळे राजस्थानच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
त्यांच्याविषयी अधिक माहिती तुम्ही इथे वाचू शकता.
विजयाचं संपूर्ण श्रेय शिवराज सिंह चौहान याचंच - ज्योतिरादित्य सिंधिया
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान याचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
त्यांनी म्हटलं, "तीन राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येत आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यश आहे. शिवराज सिंह यांनी केलेल्या चांगल्या कामांचं हे फळ आहे. केंद्रातील त्रिमुर्तींचं हे यश आहे. लाडली बहना गेमचंजर योजना ठरली. त्याचं श्रेय पूर्णपणे शिवराज सिंह चौहान यांना जातं, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्यांनी माझ्या उंचीवर टिपण्णी केली होती, त्यांना माझ्या लोकांनी उत्तर दिलं आहे, असंसुद्धा ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलंय.
माझं कुणाशी वैर नाही, मी काँग्रेसलासुद्धा शुभेच्छा देतो, असं सिंधिया यांनी म्हटलंय.
छत्तीसगढमधले सर्वांत ताजे कल

तेलंगणातले सर्वांत ताजे कल

राजस्थानमधले सर्वांत ताजे कल

मध्य प्रदेशातले सर्वांत ताजे कल

मध्य प्रदेशात शिवराजसिंह यांचं नेतृत्व दिसलं - सप्रिया सुळे

फोटो स्रोत, Getty Images
सुप्रिया सुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची स्तुती केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मध्यप्रदेशमध्ये त्यांनी लाडली नावाची स्कीम आणली ती चालली. त्याचा फायदा शिवराज सिंह यांना झाला. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह यांचं नेतृत्व दिसलं. तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी यांनी आघाडी घेतली हे खूप चांगलं आहे."
भाजपाने मध्य प्रदेशात उमेदवारी दिलेल्या खासदाराची स्थिती काय आहे?
- दिमनी - नरेंद्रसिंह तोमर 12000 मतांनी पुढे
- नरसिंहपूर - प्रल्हाद पटेल 12000 मतांनी पुढे
- निवास - फग्गनसिंह कुलस्ते पिघाडीवर, इथं काँग्रेसचे चैन सिंह 25000 हजारांनी पुढे
- इंदौर-1 - कैलास विजयवर्गिय 17000 मतांनी पुढे
- सीधी - रिती पाठक आणि काँग्रेसच्या ज्ञानसिंह यांच्यात अटितटीची लढ
- सतना - गणेश सिंह 5800 मतांनी पुढे
- गाडरवारा - उदय प्रताप सिंह 14000 मतांनी पुढे
4 राज्यांमध्ये जोर कुणाचा, बीबीसी मराठीवर लाईव्ह विश्लेषण
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
छत्तीसढमध्ये भाजपा आघाडीवर
- सध्याच्या घडीला भाजपा छत्तीसगढमध्ये आघाडीवर आहे.
- तिथं भाजपा सध्या 43 तर काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर आहे.
- तर सीपीआय इथं एका जागेवर आघाडीवर आहे.
- छत्तीसगडमध्ये मिनिटागणीक स्थिती बदलत आहे.
तेलंगणात काँग्रेस आघाडीवर, बीआरएस पिछाडीवर
- तेलंगणात काँग्रेस सध्या 58 जागांवर आघाडीवर आहे.
- भारत राष्ट्र समिती 33 जागांवर आघाडीवर आहे.
- भाजपा 7 तर सीपीएम एका जागेवर सध्या आघाडीवर आहे.
राजस्थान - भाजपा आघाडीवर, काँग्रेस पिछाडीवर
राजस्थानमध्ये सध्या भाजपा आघाडीवर आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार सध्या तिथं भाजप 102 तर काँग्रेस 77 जागांवर आघाडीवर आहे.
तर अपक्ष 8 आणि बसपा 3 जागांवर आघाडीवर आहे.

फोटो स्रोत, ANI
इंडिया आघाडीची 6 डिसेंबरला बैठक
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी येत्या 6 डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीनंतर बराच काळ इंडिया आघाडीची बैठक झाली नव्हती. आता 5 राज्यांच्या निकालांनंतर ही बैठक होत आहे.