उत्तरकाशी बोगदा बचावकार्य: 41 मजुरांची सुखरुप सुटका, 12 नोव्हेंबरपासून काय काय घडलं?
उत्तरकाशीच्या बोगद्यात 17 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वाचवलेल्या सर्व मजुरांना एक-एक लाख रुपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली.
लाईव्ह कव्हरेज
ढिगाऱ्याचा शेवटचा भाग कोसळला आणि मजुरांनी जल्लोष केला
बचावकर्त्यांपैकी एकाने आम्हाला सांगितलं की “ज्या क्षणी आम्ही ढिगाऱ्याचा शेवटचा भाग तोडला त्याच क्षणी बोगद्यात जल्लोष झाला. मागच्या 17 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांनी उत्साहात टाळ्या वाजवायला सुरुवात केली."
तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की, शांत राहा, धीर धरा, आम्ही तुम्हाला एक-एक करून बाहेर काढू.
फोटो स्रोत, Reuters
बोगद्याच्या तोंडाजवळ नातेवाईकांची गर्दी
सिलक्यारा बोगद्याजवळ मागच्या 17 दिवसांपासून ताटकळत उभ्या राहिलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या या बोगद्यावर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
आता कोणत्याही क्षणी हे बचावकार्य संपल्याची घोषणा होऊन 41 मजूर बाहेर येऊ शकतात.
फोटो स्रोत, ASIF ALI
बोगद्याच्या तोंडावर रुग्णवाहिकांचा ताफा तर तयार आहेच आणि परिसरातील लोकांनीही आजूबाजूच्या डोंगरांवर गर्दी केलीय. अडकलेल्या मजुरांचे नातेवाईकही अधीर होऊन त्यांची वाट बघत आहेत.
बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर मजुरांना 'इथे' आणणार
मागच्या 17 दिवसांपासून उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेचा क्षण आता जवळ आलाय. अवघ्या काही तासांमध्ये त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु होईल.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी स्वतः याबाबत माहिती दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार बोगद्यात पाईप टाकण्याचं काम आता पूर्ण झालंय आणि आता मजूर बाहेर येण्याची सगळे वाट बघत आहेत.
फोटो स्रोत, ANI
अडकलेले हे मजूर बाहेर येताच त्यांना रुग्णवाहिकेतून थेट चिन्यालीसौरच्या आरोग्य केंद्रात आणलं जाईल. डॉक्टरांच्या देखरेखीखाली मजुरांवर पुढील उपचार केले जातील.
एएनआयने या आरोग्य केंद्राच्या मधला एक फोटोदेखील शेअर केलाय, ज्यात कामगारांसाठी स्वतंत्र बेड तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिका तैनात, डॉक्टरांची टीमही तयार
उत्तरकाशी बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून, स्ट्रेचरही उपलब्ध करण्यात आले आहेत. तसंच, डॉक्टरांची टीमही तयार आहे.
फोटो स्रोत, ASIF ALI
मजूर बोगद्यातून बाहेर आल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाईल. आवश्यक उपचार केले जातील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मजुरांच्या सुटकेसाठी आता मॅन्युअल ड्रिलिंग
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या सिलक्यारा येथील यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यामुळे 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 16 दिवसांपासून मदतकार्य सुरू आहे.
या बचाव मोहिमेच्या 16 व्या दिवशी बोगद्याच्या आतील ऑगर मशीनसह काम थांबवण्यात आलं असून, मजुरांकडून मॅन्युअल खोदकाम सुरू करण्यात आलं आहे.
मॅन्युअल मोहीम 24 तास सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेत 24 मजुरांचा सहभाग आहे.
LIVE : उत्तरकाशी बोगद्यातून थोड्याच वेळात मजूर येणार बाहेर
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात अडकलेले 41 मजूर बाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अखेर सतराव्या दिवशी हे कामगार सुखरूप बाहेर येतील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
बोगद्यात पाईप टाकण्याचं काम पूर्ण झालंय - उत्तराखंडचे मुख्यमंत्री
उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्याची माहिती देताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्यात पाईप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
काही वेळापूर्वी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली होती.
फोटो स्रोत, X
उत्तरकाशीतलं बचावकार्य अंतिम टप्प्यात
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या सिलक्यारा येथील यमुनोत्री महामार्गावर निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यामुळे 12 नोव्हेंबरपासून अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 16 दिवसांपासून मदतकार्य सुरू आहे.
मात्र, कामगारांना बाहेर काढण्याचा क्षण जवळ आल्याचे संकेत मिळू लागले आहेत. पुढच्या काही तासातच कामगारांना सुखरूप बाहेर काढलं जाऊ शकतं.