G-20 परिषद : ‘एकत्रित काम करण्यासाठी सज्ज,’ जाहीरनामा मंजूर केल्याबाबत मोदींनी मानले आभार

भारतात 18 वी G-20 परिषद होतेय. राजधानी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबरला ही परिषद होत आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. राज्यातील महापालिकांचा निकाल काय सांगतो? 5 राजकीय विश्लेषक काय सांगतात?

  2. 'इराणच्या आंदोलनांतील मृत्यूंसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जबाबदार,' खामेनी यांचा आरोप

  3. 'छावा' चित्रपट विभाजन करणारा असल्याच्या चर्चांबाबत ए.आर. रहमान यांनी काय म्हटलं?

  4. पुण्यात अजित पवार - शरद पवारांचा भाजपने कसा पराभव केला?

  5. महाराष्ट्रातच इतके पक्ष, मग परराज्यातील MIM ला महापालिका निवडणुकीत इतकं यश कसं मिळालं?

  6. बेळगावमध्ये 70 वर्षांपूर्वीच्या 'या' घटनेमुळे साजरा होतो 'हुतात्मा दिन'

  7. घनदाट जंगलातील डोंगरावर 25 वर्षांपासून एकटं राहणारं कुटुंब, त्यांना शहरात आणण्याचे सर्व प्रयत्न अपयशी

  8. ठाकरेंच्या ऐतिहासिक एकजुटीनंतरही मुंबई महापालिकेमध्ये सत्ता का नाही आली?

  9. पुणे-पिंपरीच्या निकालाचे अर्थ काय? याचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर काय परिणाम होईल?

  10. 'भाजपला भविष्यात एकनाथ शिंदेंची गरज भासणार नाही' - राजेंद्र साठेंचं विश्लेषण

  11. महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस 'वंचित' का राहिली?

  12. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी

  13. पेनी स्टॉक्स : चिल्लरच्या दरात मिळणारे हे शेअर्स काय असतात? त्यात गुंतवणूक करून फायदा मिळतो?

  14. निकालाआधी मतकेंद्रावर पोलिसांचा लाठीचार्च, माजी महापौरांना मारहाण

  15. मर्चंट नेव्हीमध्ये कसे जायचे, त्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते आणि पगार किती असतो?

  16. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 59.82 टक्के

    छत्रपती संभाजीनगर महापालिका

    फोटो स्रोत, Kiran Sakale/BBC

    फोटो कॅप्शन, छत्रपती संभाजीनगर महापालिका

    छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 59.82 टक्के मतदान पार पडले. एकूण 11 लाख 18 हजार 284 मतदारांपैकी 6 लाख 69 हजार 1 मतदारांनी मतदान केले.

    ठाणे महानगर पालिका

    ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.

    ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते.

    त्यापैकी 4 लाख 83 हजार 698 पुरूष, 4 लाख 33 हजार 385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 9 लाख 17 हजार 123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

  17. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसाठी 52.94 टक्के मतदान, मतमोजणीसाठी 23 कक्षात प्रक्रिया सुरू

    बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार एकूण 52.94 टक्के मतदारांनी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे.

    बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज (16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे.

    महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

    मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्‍यासह 770 अन्य सहकारी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.

    निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार, तसेच माध्‍यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली.

    दिनेश वाघमारे
  18. जळगावच्या छोट्या आदिवासी गावातून अमेरिकेतील पीएचडीपर्यंत: भिल्ल समाजातील शंकरचा प्रेरणादायी प्रवास

  19. पुण्यात 52.42 टक्के मतदान, तर नागपूरमध्ये 51 टक्के

    पुण्यात एकूण मतदान 52.42 टक्के झालं. गेल्या वेळी साधारण 55 टक्के झालं होतं. सर्वात कमी मतदान औंध, बोपोडी येथे झालं. सर्वाधिक मतदान शिवणे प्रभागात झालं. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जवळपास 51 टक्के मतदान झालं. मागील निवडणुकीत (2017) हेच मतदान 53 टक्के झालं होतं.

    पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) 4 हजार 11 मतदान केंद्रांवर मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता अतिशय शांततामय वातावरणात मतदान पार पडले, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.

    पुण्यात सकाळी 10 वाजल्यापासून 15 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सुनिश्चित करण्यात आलेल्या 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

    दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली होती. मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यामुळे प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागले. इतर 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा होत्या. काही महानगरपालिकांच्या प्रभागांत तीन किंवा पाच जागाही होत्या.

    EVM

    फोटो स्रोत, Getty Images

  20. ‘शाई’वरून आरोप-प्रत्यारोप,

    मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.
    फोटो कॅप्शन, मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.

    15 जानेवारी रोजी राज्यातल्या 29 महानगर पालिकांसाठी मतदान झालं. या मतदान सर्वाधिक चर्चेत आला तो मुद्दा म्हणजे शाईचा. मतदान झाल्यावर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात आहे, अशी तक्रार अनेकांनी केली. यावरुन आरोप प्रत्यारोपदेखील झाले.

    मतदानानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षासह मतदारांनीही मार्करच्या ‘शाई’वरुन प्रश्न उपस्थित केले.

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

    राज ठाकरे म्हणाले की, "यापूर्वी बोटाला शाई लावली जायची. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते. शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू आहे."

    दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप नाकारला असून निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी विरोधक करत असल्याचं फडणवीस म्हणाले.

    मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.

    राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.

    ते म्हणाले, "महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी ज्या मार्कर पेनची जी शाई वापरण्यात आली, त्याबाबत बराच संभ्रम पसरवला जातो आहे. त्याबाबत माझं सांगणं असं आहे की, ही शाई जी आहे, ती इंडेलिबल इंक आहे. भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो, तीच ही इंक आहे. मात्र, ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. असे मार्कर पेन 2011 पासून वापरात आहेत. ही शाई पुसली जात नाही. शाई लावल्यानंतर बारा ते पंधरा सेकंदांनंतर ती ड्राय होते. या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे, तसे व्हीडिओ बाहेर प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय."

    एकंदरीत कालचा दिवस 'शाई' आणि 'शाही' प्रकरणावरून गाजला, यावर विविध मीम्सदेखील व्हायरल झाले.