You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

चंद्रयान-3चं यशस्वी लँडिंग, नरेंद्र मोदींनी दक्षिण आफ्रिकेतून इस्रो प्रमुखांना फोन करून म्हटलं...

चंद्रयान- 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. लँडर आता चंद्रापासून फक्त 15 किमी अंतरावर

    • लँडर आता चंद्रापासून फक्त 15 किमी अंतरावर
    • पंतप्रधान नरेंद्र मोदीही दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गहून चंद्रयान-3 चं लँडिंगवर लक्ष ठेवून आहेत
  2. चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचलं

    • लँडर आता चंद्रापासून फक्त 27 किमी अंतरावर
    • 8 मिनिटांच्या प्रवासानंतर लँडर आता चंद्रापासून फक्त 24 किमी अंतरावर
  3. चंद्रायान – 3 ने त्याचा 20 टक्के प्रवास यशस्वीरित्या पार केला आहे – इस्रो

    रफब्रेकिंगची सुरुवात योग्यरितीने सुरू झाली आहे. एएलएस अॅक्टिव्हेट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ग्राउंडवरून कुठलीही कमांड जात नाहीये.

  4. चंद्रयान-3 चं लँडिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरू प्लॅनेटरियममध्ये

  5. चंद्रयान-3 च्या लँडिंगचं काऊंटडाऊन सुरू, जगाच्या नजरा इस्रोच्या कंट्रोल रुमकडे

  6. शास्त्रज्ञांना 17 महिन्यांपासून पगार मिळाला नाही - दिग्विजय सिंग

    काँग्रेसचे मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय की, "चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगचा प्रयत्न करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचा आपल्याला अभिमान आहे. यशस्वी लँडिंगसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो. मात्र, वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत की, शास्त्रज्ञांना 17 महिन्यांपासून पगार दिला गेला नाहीय. त्यावरही पंतप्रधानांनी लक्ष दिलं पाहिजे."

  7. 'चंद्रयान 3' चंद्रापासून 30 किलोमीटर उंचीवर असताना काय-काय होईल?

    श्रीहरिकोटा इथून 14 जुलैला प्रक्षेपित झालेलं चंद्रयान-3 यान 40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.

    या चंद्रयानमधलं लँडर चंद्रावर उतरायला सुरुवात करेल तेव्हापासूनचा प्रत्येक क्षण हा यानाचं लँडिग यशापयश ठरवणारा असेल.

    हे लँडर उतरतानाचे अनेक टप्पे आहेत आणि या टप्प्यांमबद्दल इस्रोच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिलीय.

  8. चंद्रयान-3 मोहीम यशस्वी होण्यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांकडून सदिच्छा

    पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी भारताच्या चंद्रयान-3 मोहीम यशस्वी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या. तसंच, इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदनही केले.

  9. 'चंद्रयान-3' यानाचं लँडिंग दक्षिण ध्रुवावर उतरणार

  10. चंद्रयान-3 ची तीन उद्दिष्टं

    इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 साठी प्रामुख्याने तीन उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत.

    • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचं सॉफ्ट लँडिंग करणं
    • लँडरमधून रोव्हरला उतरवणं आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरवणं
    • लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचं अन्वेषण करणं
  11. नासापेक्षा स्वस्तात भारताची इस्रो अवकाश मोहिमा कशा आखते?

    चंद्रयान 3 च्या निमित्ताने भारताच्या अंतराळ मोहिमेची जोरदार चर्चा होतेय, पण जागतिक अवकाश उद्योगात भारताचा वाटा फक्त 2 टक्के आहे. हाच वाटा वाढवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.

  12. चंद्रयान-3 चं लँडर 15 मिनिटांत चंद्रावर नेमकं कसं उतरेल, जाणून घ्या

  13. चंद्रयान-3 च्या चंद्रावरील लँडिंगसाठी 'इस्रो'ची तयारी पूर्ण

    आज चंद्रावर भारताचं चंद्रयान-3 यानाचं लँडिंग होणार आहे. हे लँडिंग नीट आणि सुरळीत व्हावं म्हणून संपूर्ण देश सदिच्छा व्यक्त करत आहे. इस्रो या भारतीय अंतराळ संस्थेनंही चंद्रयान-3 च्या लँडिंगची तांत्रिक माहिती सोशल मीडियावरून दिलीय.

  14. भारताची अवकाश संशोधनातील प्रगती अफाट आहे - फारूक अब्दुल्ला

    "भारताची अवकाश संशोधनातील प्रगती अफाट असून, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या काळापासून अवकाश संशोधन क्षेत्रातली आपली प्रगती वाढतच गेली आहे. आपण सर्वांनाच आपल्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे," असं फारूक अब्दुल्ला म्हणाले.

  15. सोशल मीडियावर #Chandrayaan3Landing ट्रेंडिंग

    भारताच्या चंद्रयान-3 मोहिमेच्या निमित्तानं आज सकाळपासूनच सोशल मीडियावर #Chandrayaan3Landing हॅशटॅग ट्रेंड होऊ लागलं आहे.

    अनेक सेलिब्रेटींसह सर्वसामान्य लोकही पोस्ट शेअर करत, इस्रो या भारतीय अंतराळ संस्थेला सदिच्छा देत आहेत.

    हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यानं तर इस्रोच्या नाव असलेलं टीशर्ट परिधान करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

  16. चंद्रयान-3 चंद्रावर पाऊल ठेवण्यास काही तासांचा अवधी

    नमस्कार, चंद्रयान-3 संबंधित लाईव्ह अपडेट्स तुम्हाला आम्ही या पेजवरून देणार आहोत. तुमच्या परिचयातील लोकांनाही हे अपडेट्स वाचता यावेत म्हणून बीबीसीच्या या लाईव्ह अपडेटची लिंक त्यांच्यापर्यंतही शेअर करा.

    तर तुम्हाला आतापर्यंत हे कळलंच असेल की, 'चंद्रयान-3' चंद्रापासून हाकेच्या अंतरावर आहे. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकेल अशी अपेक्षा आहे.

    14 जुलै रोजी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेलं चंद्रयान - 3 चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे.