शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असल्याचं पत्र निवडणूक आयोगाला मिळालं आहे. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईचं पुढे काय होणार?
लाईव्ह कव्हरेज
'शक्तीपीठ महामार्गा'बद्दल एकनाथ शिंदे म्हणाले...
- लोकांच्या सहमतीशिवाय शक्तीपीठ महामार्ग होणार नाही.
- महामार्ग झाला तर लोकांचाच फायदा होईल. हे सगळं लोकांसाठीच सुरु आहे. त्यांच्या सहमतीशिवाय करणार नाही.
- समृद्धी महामार्गाला असाच विरोध होता. मात्र, नंतर लोकांना जेव्हा कळलं की हा आपल्या फायद्याचा आहे, तेव्हा लोकांनी सहमती दिली.

राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण उद्योगांना मारक नाहीये का, या प्रश्नावर ते म्हणाले...
- लोकसभेआधी कुणी ध्रुवीकरण केलं? कुणी विरोधात बोलला तर त्या पत्रकारालाही अटकेत टाकलं.
- केतकी चितळे, कंगणा रणौत, नारायण राणे या सगळ्या प्रकरणात काय झालं?
- अंबानींच्या घराखाली जिलेटीन कुणी ठेवलं?
- वातावरण दुषित ठेवण्याचं काम विरोधक जाणीवपूर्वक करत आहेत.
- आम्हाला महाराष्ट्र शांतच हवा आहे. हे पुरोगामी राज्य आहे. आम्हाला वातावरण दुषित करायचं नाही.
- त्यामुळे, नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्यात मुख्यमंत्री आणि मी स्वत: जातीनं लक्ष घालत होतो.
- आम्ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहोत.
- हे उद्योग-स्नेही राज्य आहे. त्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते आम्ही करु.
कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बीबीसीच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
लाडकी बहिण योजनेबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...
- पात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाहीत.
- मात्र, जे पैसे गेलेले आहेत, ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा आम्ही करणार नाही.
- अपात्र महिलांकडे जे पैसे गेले आहेत, त्यांच्याकडून पुन्हा कसे वसूल करायचे, त्याचे मार्ग शोधले जातील.
- विरोधकांना असं वाटत होतं की, आम्ही हे पैसे निवडणुकीनंतर देणार नाही. मात्र, आम्ही देणारे लोक आहोत, घेणारे नाही.
- विरोधक तोंडघशी पडले. ते म्हणत होते की, पंधराशे रुपये कुठून देणार? आणि शेवटी स्वत:चं तीन हजार रुपयांचं आश्वासन दिलं.

फोटो स्रोत, bbc
मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तुमच्या शिवसेनेकडून केला जातोय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी याच मंचावर केला, यावर काय सांगाल...
- याच लोकांनी देवेंद्रजींना फडतूस वगैरे म्हटलं. पण मग आता त्यांना हे लोक का भेटतात? देवेंद्रजींचं काडतूस निघेल म्हणून भेटतात का ते?
- आम्ही जे करतो, ते खुलेआम करतो. पोटात एक ओठात एक असं करत नाही.
- देवेंद्रजींबद्दल तुमच्या काय भावना होत्या, ते आम्हाला माहिती आहे.
- आमच्या दोघांमध्ये कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमची दोस्ती तुटणार नाही. कारण आमची लढाई खुर्चीसाठी वा स्वार्थासाठी नाहीये.
- महायुती अत्यंत मजबूत आहे.
महाराष्ट्रातील धार्मिक ध्रुवीकरणावर एकनाथ शिंदे म्हणाले...
- आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करा, असं कधीच नाहीये. हिंदुत्व हे व्यापक आहे. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं हिंदुत्व नाहीये.
- बाळासाहेब सच्च्या आणि राष्ट्रभक्त मुस्लिमांच्या विरोधात नव्हते.
- जे पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडतात, ते मुसलमान देशाचा दुष्मन आहेत.
- आम्ही विकासाला महत्त्व देतो. आमच्या योजनेत मुसलमान फायदा घेत नाहीत का? लाडक्या बहिणी फायदा घेत नाहीयेत का? आम्ही कुठे फरक केला आहे?
- देशाच्या विरोधात काम करणारा कोणीही असो, तो देशाचा दुष्मन आहे.मग कोणत्याही धर्माचा असो.

- लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पात्र बहिणी योजनाबाह्य होणार नाहीत. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली होईल, तेव्हा योजनेतील रक्कमही वाढवली जाईल.
- पायाभूत विकासासंदर्भातील प्रकल्प महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत.
औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे म्हणाले...
- आमचं एवढंच म्हणणं आहे की, जो औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, ज्याने अत्याचार-अन्याय केला. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केला, त्याचं उदात्तीकरण करू नये.
- उदात्तीकरण होता कामा नये, ही भूमिका सगळ्या शिवभक्ताची आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे.
- सच्चे देशभक्त असलेले मुसलमान पण त्याचं उदात्तीकरण करणार नाहीत.

- विरोधकांना जर सभागृहात चर्चाच करायची नसेल, तर काय बोलणार? चर्चा करायला आणि उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत.
- आमचं विरोधकांना आवाहन आहे की, तुमची संख्या कमी असली तरीही आम्ही तुम्हाला अंडरइस्टीमेट करत नाहीये. तुम्ही या, विकासावर बोलू.
पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले...
- बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तडजोड केली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली. मी मंत्री होतो, माझ्यासोबत आठ मंत्री सोबत आले. त्यानंतर मी झालो मुख्यमंत्री. अडीच वर्षे काम केलं भरपूर.
- आमचं भांडण खुर्चीसाठी नाहीये. आमचा संघर्ष हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, त्याच्या समस्या सोडवणं यासाठी आहे.

- मी ज्या रोलमध्ये त्या रोलमध्ये काम करतो आहे.
- पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकारणात 'जर-तर'ला काही स्थान नसतं.
- काम करणाऱ्याला पदाचा काहीही फरक पडत नाही.
सरकारच्या पहिल्या 100 दिवसांबाबत काय सांगाल?
- आधीचं आमचं सरकार आणि आताच सरकार एकच आहे. मुख्यमंत्री बदलला असला तरीही आम्ही टीम म्हणूनच काम करतो.
- समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो, कारशेडची कामं, अशी सगळी थांबलेली कामं आम्ही मार्गी लावली.
- शेवटी, आपल्या उद्योजक केव्हा येतात? तुमच्याकडे पायाभूत सुविधा असल्या आणि सोयीसुविधा असल्या तरच उद्योजक येतात.
- आम्ही दावोसला गेलो आणि अनेक गुंतवणुकीचे करार केले.

- आम्ही आरोग्यावर फोकस केलं. शाळांवर फोकस केलं.
- 'माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित' ही योजना राबवत आहोत.
- ग्रामीण भागातील आमच्या लाडक्या बहिणी आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी योजना आणल्या.
- पर्यटनासाठीही आम्ही चालना दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटी करतो आहोत.
- मी गावी जातो तेव्हा सगळ्यांच्या पोटात दुखतं. मी गावी गेलो तरी नाराज, दिल्लीला गेलो तरी नाराज, शांत बसलो तरी नाराज, काहीही केलं तरी नाराज... मी संवेदनशील माणूस आहे. मी गावी जातो, याचा अभिमान आहे. तिकडे गेलो की मी शेतीत जातो.
- गावी गेल्यावर मला जरा मानसिक शांतता मिळते, म्हणून मी जातो.
- काही लोकांना घरं सुटत नाहीत, तेच माझ्यावर असे आरोप करतात.
- तिथल्या तरुणांना इतर शहरात नोकरीसाठी जायला लागू नये, हा माझा प्रयत्न आहे.
कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
- खरं म्हणजे आरोपांवर मी प्रतिक्रिया देतच नाही. अडीच वर्षे सातत्याने पहिल्या दिवसापासून सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोक झाडत होते. आरोपाला मी कामाने उत्तर देणार, असं मी नेहमी म्हणत असतो. आरोपाला आरोपाने उत्तर दिलं तर आपलाच फोकस हलतो.
- महाविकास आघाडीने ज्या कामावर जे स्टे ऑर्डर दिले होते, ते सगळे उखडून फेकले.
- बंद पडलेल्या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आणि विकासाला महत्त्व दिलं. विकास आणि कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं.
- एकीकडे एवढे निर्णय आम्ही घेतले आणि त्याची अंमलबजावणी आम्ही केली. त्यामुळे, आरोपांकडे मी पाहिलंच नाही. कोण काय बोलतंय, त्याकडे बघितलंच नाही.

- विधानसभा निवडणुकीत आरोप करणाऱ्यांना घरी बसवलं आणि महायुतीला ऐतिहासिक असा जनमताचा कौल दिला.
- आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जिंकल्या. समोरच्यांनी 100 जागा लढवलल्या आणि 20 जिंकल्या. आरोपांना आम्ही कामाने उत्तर दिलं म्हणून आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं.
- आम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला वगैरे आरोप करुनही जनतेनं जर आम्हाला मँडेट दिला असेल, तर तुम्ही गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे समजून जा.

- अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे.
- याच माणसाने सरन्यायाधीशांबद्दल, पंतप्रधानांबद्दल, निर्मला सीतारमण यांच्याबद्दल, उद्योगपतींबद्दल काय बोलला आहे ते पाहा.
- हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे.
- मी यावर दिवसभर बोललो नाहीये आणि बोलणारच नाहीये.
- तोडफोडीचं समर्थन मी कधीच करत नाही. मात्र, समोरच्यानं आरोप करताना कुठल्या लेव्हलला आरोप करायचं ते तरी पाहिलं पाहिजे.
- माझी सहन करण्याची ताकद खूप आहे. पण यांची आहे का? मी कधीही कुणावरही रिऍक्ट होत नाही. कामावर फोकस करणं आणि लोकांना न्याय देणं, या माझ्या भूमिकेमुळे देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात 'बीबीसी मराठी'च्या मंचावर...

लाडकी बहीण योजनेची रक्कम कधी वाढणार? बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात आदिती तटकरे काय म्हणाल्या?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ औरंगजेबापेक्षा दारा शिकोहला अधिक प्राधान्य का देत आहे?
सभागृहातल्या कामकाजाबाबत संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात..

एआय आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात

राज्यातील तरुणांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाचं काय?
राज्यातील तरुणांनी त्यांना मिळणाऱ्या शिक्षण आणि पदव्यांचा दर्जाबाबत केलेल्या तक्रारींचा बीबीसी मराठीने केलेला रिपोर्ट बघून चंद्रकांत पाटील म्हणाले,
- या व्हीडिओमध्ये दिसणारे सगळे विद्यार्थ्यांचे नेते वाटत आहेत कारण त्यांच्याकडे डेटा कमी आहे.
- मी विद्यार्थी परिषदेत असताना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली होती. आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न करत आहोत.
- या व्हीडिओमध्ये मांडलेले मुद्दे थोडे जुने वाटत आहेत. नोकरी, पगार याबाबत माझं म्हणणं असं आहे की, एका बाजूने बेरोजगारी आहे पण समाजात जी गरज आहे ते शिक्षण घेण्याची आमची तयारी नाहीये.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून तुमच्या तीन प्रमुख प्राथमिकता काय आहेत?
या प्रश्नाचं उत्तर देताना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,
- 2022 ला सरकार आलं तेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाचा 'न' देखील लिहिला नव्हता.
- नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायाभिमुख शिक्षण, मराठीतून शिक्षण आणि शिक्षणामधून समाज जागरूक करता आला पाहिजे या आमच्या प्राथमिकता असणार आहेत.
- नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहोत.

थोड्याच वेळात चंद्रकांत पाटील बीबीसी मराठीच्या मंचावर
बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

थोड्याच वेळात आदिती तटकरे 'बीबीसी मराठी'च्या मंचावर
बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

'देवेंद्र फडणवीसांमधील संवेदनशीलता जागवण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं'? आदित्य ठाकरे यांचा सवाल
'राष्ट्र-महाराष्ट्र' LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीबीसी मराठीच्या मंचावर
