शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असल्याचं पत्र निवडणूक आयोगाला मिळालं आहे. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईचं पुढे काय होणार?
लाईव्ह कव्हरेज
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
निशिकांत दुबे यांचं ठाकरे बंधूंना उद्देशून खोचक ट्वीट

फोटो स्रोत, x/@nishikant_dubey
मराठी आणि हिंदी भाषेवरुन राजकारण तापले असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी यात भाग घेतला होता. 'पटक पटक के मारेंगे' असं विधान त्यांनी केलं होतं. त्याला राज ठाकरे यांनी 'दुबे तू मुंबईत ये.. तुला मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे...' असं उत्तर दिलं होतं. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट सत्तास्थापनेच्या दिशेने आगेकूच करत असताना निशिकांत दुबे यांनी नवं ट्वीट केलं आहे. मुंबईत येऊन उद्धव आणि राज ठाकरे यांना भेटणार असं ते म्हणाले आहेत.
निकालाआधी मतकेंद्रावर पोलिसांचा लाठीचार्च, माजी महापौरांना मारहाण
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 59.82 टक्के

फोटो स्रोत, Kiran Sakale/BBC
फोटो कॅप्शन, छत्रपती संभाजीनगर महापालिका छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत 59.82 टक्के मतदान पार पडले. एकूण 11 लाख 18 हजार 284 मतदारांपैकी 6 लाख 69 हजार 1 मतदारांनी मतदान केले.
ठाणे महानगर पालिका
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते.
त्यापैकी 4 लाख 83 हजार 698 पुरूष, 4 लाख 33 हजार 385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 9 लाख 17 हजार 123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 52.94 टक्के मतदान, मतमोजणीसाठी 23 कक्षात प्रक्रिया सुरू
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी (15 जानेवारी) झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार एकूण 52.94 टक्के मतदारांनी याठिकाणी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारीला झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज (16 जानेवारी) सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
मतमोजणीसाठी 759 पर्यवेक्षक आणि 770 सहायक यांच्यासह 770 अन्य सहकारी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.
निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार, तसेच माध्यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली.

पुण्यात 52.42 टक्के मतदान, तर नागपूरमध्ये 51 टक्के
पुण्यात एकूण मतदान 52.42 टक्के झालं. गेल्या वेळी साधारण 55 टक्के झालं होतं. सर्वात कमी मतदान औंध, बोपोडी येथे झालं. सर्वाधिक मतदान शिवणे प्रभागात झालं. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जवळपास 51 टक्के मतदान झालं. मागील निवडणुकीत (2017) हेच मतदान 53 टक्के झालं होतं.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (15 जानेवारी) 4 हजार 11 मतदान केंद्रांवर मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता अतिशय शांततामय वातावरणात मतदान पार पडले, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.
पुण्यात सकाळी 10 वाजल्यापासून 15 निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सुनिश्चित करण्यात आलेल्या 15 ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली होती. मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा होता. त्यामुळे प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागले. इतर 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा होत्या. काही महानगरपालिकांच्या प्रभागांत तीन किंवा पाच जागाही होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
‘शाई’वरून आरोप-प्रत्यारोप,

फोटो कॅप्शन, मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली. 15 जानेवारी रोजी राज्यातल्या 29 महानगर पालिकांसाठी मतदान झालं. या मतदान सर्वाधिक चर्चेत आला तो मुद्दा म्हणजे शाईचा. मतदान झाल्यावर बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात आहे, अशी तक्रार अनेकांनी केली. यावरुन आरोप प्रत्यारोपदेखील झाले.
मतदानानंतर राज्यातील विविध राजकीय पक्षासह मतदारांनीही मार्करच्या ‘शाई’वरुन प्रश्न उपस्थित केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले की, "यापूर्वी बोटाला शाई लावली जायची. पण आता त्यांनी पेन आणला आहे. या पेनबाबत सगळीकडून तक्रारी येत आहेत. मतदान करून बाहेर पडल्यानंतर त्या शाईवर सॅनिटाझर लावल्यानंतर ती शाई जाते. शाई पुसा, परत जा आणि पुन्हा मतदान करा, असा प्रकार सुरू आहे."
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप नाकारला असून निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी विरोधक करत असल्याचं फडणवीस म्हणाले.
मार्करच्या शाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच निवडणूक आयोगानेदेखील यावर आपली बाजू मांडली.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.
ते म्हणाले, "महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी ज्या मार्कर पेनची जी शाई वापरण्यात आली, त्याबाबत बराच संभ्रम पसरवला जातो आहे. त्याबाबत माझं सांगणं असं आहे की, ही शाई जी आहे, ती इंडेलिबल इंक आहे. भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरतो, तीच ही इंक आहे. मात्र, ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. असे मार्कर पेन 2011 पासून वापरात आहेत. ही शाई पुसली जात नाही. शाई लावल्यानंतर बारा ते पंधरा सेकंदांनंतर ती ड्राय होते. या शाईविषयी कुठल्याही प्रकारची शंका उत्पन्न करणे, तसे व्हीडिओ बाहेर प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय."
एकंदरीत कालचा दिवस 'शाई' आणि 'शाही' प्रकरणावरून गाजला, यावर विविध मीम्सदेखील व्हायरल झाले.
मतदानानंतर बोटावरची शाई पुसल्याचा आरोप, त्यावर निवडणूक आयोगाने काय दिली होती प्रतिक्रिया?
शाई पुसली जात नाही; व्हीडिओ प्रसारित करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय: निवडणूक आयोग
सी. डी. देशमुख : स्वतंत्र भारताच्या पहिल्या नोटेवर सही करणारा महाराष्ट्राचा 'कंठमणी'
महानगरपालिका निवडणूक : 'या' 12 पैकी एक कागदपत्र असेल, तरी मतदान करता येणार
12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा आज निकाल, कुणाला किती जागा? जाणून घ्या
मुंबईच्या निवडणुकीत यंदा मतांचं धार्मिक की भाषिक ध्रुवीकरण निर्णायक ठरेल? - विश्लेषण
महापालिका निवडणूक : एक मत की अनेक? प्रभाग पद्धतीत मतदान कसं होतं, मतदारांनी नेमकं काय करायचं? जाणून घ्या
अजित डोभाल यांच्या 'इतिहासाचा बदला घ्यायचाय' या विधानाचा अर्थ काय? ते नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस-भाजप, MIM-भाजप युतींविषयी एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुंबईत पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार? मुंबईकर संतापलेले का आहेत? - ग्राऊंड रिपोर्ट
सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आम्ही नॉर्मल गौतम अदानी पाहिलेत, त्यांना आता ग्लॅमर आलंय'
ठाकरे बंधूंनी उद्योगपती गौतम अदानींवर केलेल्या टीकेला भाजपनं काय उत्तर दिलं?
