संजय राठोड यांनी घेतली शपथ
संजय राठोड यांनी शपथ घेतली आहे. पूजा चव्हाण प्रकऱणात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते प्रकरण काय होतं ही बातमी इथे वाचा
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार संपन्ना झाला. आज एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 आमदारांचा समावेश आहे.
संजय राठोड यांनी शपथ घेतली आहे. पूजा चव्हाण प्रकऱणात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ते प्रकरण काय होतं ही बातमी इथे वाचा
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली आहे. शिंदे गटाचे शपथ घेणारे ते पहिले मंत्री आहेत. ते चित्तथरारक पणे गुवाहाटीला पोहोचले होते. ती बातमी इथे वाचा.
https://bbc.com.im/marathi/india-61920332%3C/p%3E%3C/div%3E%3C/div%3E%3C/article%3E%3C/li%3E%3Cli class="css-xxlek1">
भाजप नेते गिरीश महाजन यांनी शपथ घेतली आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. ते याआधीही मंत्री होते.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्याविषयी इथे माहिती वाचा.
https://bbc.com.im/marathi/india-53559733%3C/p%3E%3C/div%3E%3C/div%3E%3C/article%3E%3C/li%3E%3Cli class="css-xxlek1">
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गेल्या सरकारमध्ये ते वनमंत्री होते. ते बल्लारपूर मधून आमदार आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेतली. विखे पाटील पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी आहेत. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ते भाजपत दाखल झाले. 2014 मध्ये ते विरोधी पक्ष नेते होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं आगमन झालं असून आता शपथविधीला सुरुवात होईल. तब्बल 14 मिनिटे उशीरा शपथविधी सुरू होत आहे.
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये एकही महिला नाही.
थोड्याच वेळात होणाऱ्या शपथविधीसाठी राजभवन सज्ज झालं आहे.
शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यावेळी मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या विषयावरची एक जुनी बातमी इथे सविस्तर वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले असून थोड्याचवेळात शपथविधीला सुरुवात होत आहे. शपथविधीला अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये
राधाकृष्ण विखे पाटील
चंद्रकांत पाटील
विजयकुमार गावित
सुधीर मुनगंटीवार
अतुल सावे
मंगलप्रभात लोढा
सुरेश खाडे
गिरीश महाजन यांचा समावेश आहे.
आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मला मंत्रिपद मिळतंय. हा माझा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी दिली आहे.
भाजप पक्ष तसा मोठा आहे त्यामुळे काय मिळालं आणि काय नाही यापेक्षा सेवा करणं हाच आमचा उद्देश आहे. आमचा परिवार खूश असल्याची प्रतिक्रिया खाडे यांच्या कुटुंबियांनी दिली.
वर्ष 2014. युतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. खाते वाटप झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या पहिल्या फळीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. यापैकी एक एकनाथ शिंदे सुद्धा होते. त्यांना रस्ते वाहतूक विकास खातं मिळालं. एकनाथ शिंदे चिडले आणि त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली.
वाचा सविस्तर. - https://bbc.com.im/marathi/india-61970393%3C/p%3E%3C/div%3E%3C/div%3E%3C/article%3E%3C/li%3E%3Cli class="css-xxlek1">
आज होणाऱ्या शपथविधीत 18 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यात भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. अशी माहिती शिवसेना गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली आहे. संभाव्य मंत्र्यांमध्ये
उदय सामंत
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपान भुमरे
संजय राठोड
अब्दुल सत्तार
तानाजी सावंत
दीपक केसरकर
शंभूराजे देसाई यांचा समावेश आहे.
नमस्कार मंडळी,
सुप्रभात
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज (9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी 11 वाजता सकाळी राजभवनावर हा नवीन मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या राज्य सरकारला तब्बल 38 दिवस झाल्यानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होतोय.
या संदर्भातले सर्व ताजे अपडेट्स आपण आज इथं पाहणार आहोत.