या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मुंबई अंडरवर्ल्डच्या हाती पूर्वांचलमधले शार्प शूटर्स लागले आणि...
पाच राज्यांच्या निवडणुकीतले एक्झिट पोलचे अंदाज आणि त्याचे अर्थ
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या एक्झिट पोलनुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या पाचही राज्यांत मतमोजणी 10 मार्चला होणार आहे. पण, आज आलेल्या एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगत आहेत
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
पंजाबमध्ये आपला बहुमत मिळणार की काँग्रेस सत्ता राखणार?
इंडिया टुडेच्या एक्झिट पोल नुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यंदा बहुमताचा आकडा मिळेल असा अंदाज आहे. इथं 117 पैकी आपला 76 ते 90 जागा, काँग्रेसला 19 ते 31 तर आकाली दलाला 7ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवाय भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला 1 ते 4 तर इतर पक्षांच्या खात्यात एक जागा जाण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक टीव्ही आणि पी. मार्क यांच्यानुसार आम आदमी पार्टीला 62 ते 70 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 23 ते 31 जागा मिळू शकतात. शिरोमणी अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळू शकतात तर इतर पक्षांना 1 ते 3 जागा मिळतील.
एबीपी न्यूज सी-व्होटर यांच्यानुसार आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये 51 ते 61 जागा मिळतील, काँग्रेसला 22 ते 28 जागा मिळतील आणि अकाली दलाला 20 ते 26 जागा मिळतील असा अंदाज आहे.
योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री कसे झाले?
फोटो स्रोत, Getty Images
मुख्यमंत्री होण्याच्या दहा वर्ष आधी म्हणजे 2007 मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते खासदार होते. मनोज सिंह त्यावेळी काय घडलं ते सांगतात, "ज्यावेळी पोलीस त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी आधी योगी यांच्या पाया पडून नमस्कार केला.
श्रद्धेचा अंमल इतका की हिंदी भाषीय वृत्तपत्राने याघटनेसंदर्भात वृत्तांकन करताना अटक झाल्यानंतर गोरखनाथ मंदिरातील गोशाळेतील एका गायीच्या रडण्याचं सविस्तर वर्णन केलं होतं".
योगी आदित्यनाथांचं धार्मिक प्रभुत्व आणि उग्र हिंदुत्वाचं राजकारण हे त्यांच्या सरकारी निर्णयांमध्येही ठळकपणे दिसतं. हे केवळ योगी आदित्यनाथ यांच्यापुरतं सीमित नाही. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सरकारी हेलिकॉप्टरमधून कांवडिया यात्रेवर पुष्पवृष्टी केली होती.
अँटी रोमियो स्क्वॉड, बेकायदेशीर कत्तलखान्यांना टाळं, लग्नासाठी धर्म परिवर्तनावर बंदीचा कायदा अशा सगळ्यातून, त्यांच्या भाषणांमधून, वक्तव्यांमधून सगळीकडे धार्मिक आणि राजकीय सत्तेचं एकत्रीकरण झालेलं दिसतं. यंदाच्या वर्षीच एका सभेत बोलताना ते म्हणाले, 2017 आधी अब्बाजान म्हणणारे रेशन हडप करत असत.
गेल्या वर्षी जौनपूर पोटनिवडणुकीसाठीच्या सभेत ते म्हणाले, लव्ह-जिहादवाले सुधारले नाहीत तर रामनाम सत्य है यात्रा निघू शकते.
त्यांच्या सरकारी कार्यकाळात आंतरधर्मीय लग्नांना विरोध झाला आहे. अशा विवाहांना लव्ह-जिहाद म्हटलं जाऊ लागलं आहे.
हिंदूधर्मीय महिलांना लग्नासाठी सक्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्याच्या प्रक्रियेला लव्ह जिहाद असं नाव देण्यात आलं आहे. या शब्दाचा उच्चार कथित कटाच्या दिशेने अंगुलीनिर्देश करण्यासाठी केला जातो.
गोव्यात यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसून येतेय. सर्व मोठ्या एक्झिट पोल्समध्ये कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाहीये.
इंडिया टुडेनं भाजपला 14 ते 18, सीएनएक्सने 16 ते 22, टीव्ही -9 ने 17 ते 19 तर ग्राउंड-0 ने 10 ते 14 जागा त्यांच्या सर्व्हेमध्ये दिल्या आहेत.
काँग्रेसला 2-ते 25 जागा मिळण्याचा अंदाज ग्राउंड-0 ने व्यक्त केलाय. काँग्रेसला इंडिया टुडे 15 ते 20, सीएनएक्स 11 ते 17, टीव्ही-9 11 ते 13 जागा दर्शवत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये कोणाचं सरकार येणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?
इंडिया टुडे-अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपला 288 ते 326 जागा मिळतील असा अंदाज आहे. समाजवादी पार्टीला (सपा) 71 ते 101 जागा मिळतील, बहुजन समाज पक्षाला (बसपा) 3 ते 9, काँग्रेसला 1 ते 3 आणि इतर पक्षांना 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टाईम्स नाऊच्या एक्झिट सर्व्हेनुसार, भाजपला 225, सपाला 151, बसपाला 14, काँग्रेसला 9 आणि इतर पक्षांना 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इंडिया न्यूजच्या सर्व्हेनुसार, भाजपला 222 ते 260, सपाला 135 ते 165, बसपाला 4 ते 9 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
टीव्ही-9 च्या एक्झिट पोलनुसार 403 जागांच्या उत्तर प्रदेशात भाजपला यंदा 211 ते 225 जागा मिळण्याचा अंदा आहे. तर सपाला 146 ते 160 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसप 14 ते 24 तर तर काँग्रेसच्या खात्यात 4 ते 6 जागा येण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेनुसार यूपीत भाजपला 262 ते 277 तर सपाला 119 ते 134 बसपला 7 ते 15 आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेत इतर पक्षांच्या खात्यात 2 ते 6 जागा देण्यात आल्या आहेत.
'या' निरक्षर सासू-सुनांनी मला उत्तर प्रदेशचं राजकारण समजावून सांगितलं
गोवा : निकालाअगोदरच 'रिसॉर्ट पॉलिटिक्स,' डी. के. शिवकुमार गोव्यात तळ ठोकून
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज
फोटो स्रोत, bbc
गुड मॉर्निंग. बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये सगळ्यांचं स्वागत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये आज विधानसभा निवडणुकींचे निकाल आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सत्ता राखणार की अखिलेश यादव यांचं आव्हान त्यांना जड जाणार? पंजाबमध्ये आम आदमी पक्ष किंग ठरणार की किंगमेकर? गोव्यात यावेळेस कोणाला सत्ता मिळवण्यात यश येणार? या सगळया प्रश्नांची उत्तरं या लाइव्ह पेजमध्ये तुम्हाला मिळतील. कारण निवडणूक निकालासंबंधीच्या दिवसभरातल्या सर्व घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर वाचू शकता.
केवळ निकालांची आकडेवारीच नाही, तर निकालांचं विश्लेषणही तुम्हाला इथे वाचू शकता, त्यासंबंधीचे व्हीडिओही पाहू शकता.
बीबीसी मराठीच्या या लाइव्हपेजसोबत निवडणूक निकालांबद्दल तुम्हीही अपडेटेड राहाल...चला तर मग....