You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

Budget 2022 : अर्थसंकल्पासंबंधीचे सर्व अपडेट्स वाचा

इन्कम टॅक्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. सलग सहाव्या वर्षी इन्कम टॅक्स संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. नुकत्याच संपलेल्या जानेवारी महिन्यात 1,40,000 कोटी रुपयांची विक्रमी वसुली झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

लाईव्ह कव्हरेज

  1. बजेटच्या वेळेबद्दल लोकसभा सभापतींचे ट्वीट

    लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 11 वाजता बदेट सादर करतील असे ट्वीट केले आहे.

  2. बजेट कसं तयार करतात?

    अर्थखातं, नीती आयोग, वेगवेगळी मंत्रालयं हे सगळे मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. अर्थ खात्यातला - आर्थिक कार्य विभाग म्हणजेच Department of Economic Affairs मधलीबजेट डिव्हिजनहा अर्थसंकल्प तयार करते.

    वेगवेगळी मंत्रालयं, राज्यं, केंद्रशासित प्रदेश, स्वायत्त संस्था, संरक्षण विभागातली विविध खाती हे सगळे आपल्या मागण्या किंवा खर्चाचा अंदाज बजेट डिव्हिजनला देतात. त्याचवेळी शेतकरी, उद्योगपती, विविध समित्या आणि अर्थतज्ज्ञांचा सल्लाही घेतला जातो. या सगळ्या चर्चांनंतर टॅक्सेसबद्दलचे निर्णय घेतले जातात, या सगळ्या Fund Allocation म्हणजे निधीची तरतूद आणि करविषयक गोष्टींवर पंतप्रधानांकडून शिक्कामोर्तब झाल्यावर अर्थसंकल्प नक्की होतो.

    दरवर्षी एक हलवा सेरीमनी म्हणजे गोड शिरा तयार करून नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेटच्या छपाईला सुरुवात होते. पण यावर्षी पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या प्रती छापल्या जाणार नाहीत. यावर्षी सगळे बजेट पेपर्स ऑनलाईन असतील.

    आतापर्यंतचे अर्थमंत्री ब्रिटीश परंपरा पुढे चालवत लाल ब्रीफकेसमधून बजेट घेऊन यायचे. निर्मला सीतारामन अर्थमंत्री झाल्यापासून त्यांनी भारतीय परंपरेतलं बही-खाता हा चोपडीसारखा प्रकार आणायला सुरुवात केली.

  3. बजेटविषयी तुम्हाला किती माहिती आहे? एक क्विझ होऊन जाऊ द्या

  4. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

    अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

    त्यावेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, पंकज चौधरी यांच्यासह अर्थ मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  5. अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री करणार पत्रकार परिषद

    अर्थसंकल्प सादर केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

    अर्थमंत्रालयाने ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3.45 मिनिटांनी ही पत्रकार परिषद होईल.

    संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर तो मोबाईल अॅपवरही उपलब्ध असेल. हे अॅप द्विभाषिक आहे. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये अर्थसंकल्पाचे तपशील जाणून घेता येतील.

    हे अॅप indiabudget.gov.inइथून डाऊनलोड करता येईल.

    बजेट वेब पोर्टल (http://indiabudget.gov.in) इथे पाहता येईल.

  6. देशाचं बजेट म्हणजे नेमकं काय?

    भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 112 अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशेबाला अर्थसंकल्प (बजेट) म्हणतात. घटनेनुसार, सरकारनं दरवर्षाच्या सुरुवातीला संसदेत बजेट सादर करणं आवश्यक आहे.

    वित्तीय वर्षाचा अवधी चालू वर्षाच्या एक एप्रिलपासून पुढच्या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत असतो. सरकारतर्फे सादर करण्यात येणाऱ्या आर्थिक हिशेबात सरकारचा महसूल आणि इतर मिळकती, तसंच खर्चाची गोळाबेरीज दिली जाते.

  7. बजेटची घटिका जवळ आली

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 आर्थिक वर्षासाठी सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. बजेट सादर करण्याची सीतारामन यांची ही चौथी वेळ आहे. यंदाही त्या पेपरलेस बजेट सादर करतील.

    2020 वर्षी त्यांनी टॅब्लेटच्या माध्यमातून अर्थसंकल्पाचं भाषण वाचलं होतं. 2018 मध्ये आंध्र प्रदेश आणि आसाम यांनी ही पद्धत सुरू केली. तंत्रज्ञानाला महत्त्व देत केंद्र सरकारने 2020 मध्ये पेपरलेस बजेटला सुरुवात केली. पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाचे दस्तावेज ब्रीफकेसमधून घेऊन येत असत.

    2019मध्ये निर्मला सीतारामन फाईलमधून बजेटचे दस्तावेज घेऊन आल्या होत्या. या फाईलवर राष्ट्रीय बोधचिन्ह होतं. 1999 आधी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे. जसवंत सिंह यांनी परंपरा बदलत सकाळी 11 वाजता बजेट सादर करायची सुरुवात केली. 2020 मध्ये निर्मला सीतारामन यांनी जे भाषण दिलं ते आतापर्यंतचं सगळ्यात प्रदीर्घ भाषण होतं.

  8. ...असा तयार होतो अर्थसंकल्प

  9. अर्थसंकल्प : सरकारकडे पैसा कुठून येतो आणि कर्ज कधी घ्यावं लागतं?

  10. भारताच्या बजेटबद्दल जाणून घ्या 'या' 18 रंजक गोष्टी