COP26- हवामान बदलामुळे शेतीचे नुकसान होत आहे - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेत सहभाग नोंदवला.

लाईव्ह कव्हरेज

  1. मोखाड्यात सौर ऊर्जेने झळाळून निघालं आयुष्य

  2. COP26 LIVE: हवामान बदलाचा नेमका परिणाम काय?

    हवामान बदलाचा कोणाकोणावर काय परिणाम झाला आहे? दिल्लीमध्ये टेरी या संस्थेतील तज्ज्ञ डॉ. रितू माथुर यांच्याशी बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी साधलेला संवाद. (कॅमेरा- देवाशिष कुमार)

  3. COP26 परिषदेचा खरंच जगाला उपयोग होईल का?

    युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना वाटतं त्याप्रमाणे COP26 खरंच वातावरणाच्या दृष्टीने एक टर्निंग पॉईंट ठरणार का? किंवा पर्यावरण कार्यकर्ते उपहासाने संबोधतात त्याप्रमाणे पोकळ गप्पांचंच व्यासपीठ बनून राहील? जाणून घेण्यासाठी क्लिक करा-

    हवामान बदल

    फोटो स्रोत, Getty Images

  4. वाळवंटात पुन्हा नदी कशी वाहू लागली?

  5. पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लासगोमध्ये दाखल

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, Getty Images

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लासगो इथं होणाऱ्या जागतिक हवामान बदलाविषयक होणाऱ्या परिषदेला (COP26) उपस्थित राहणार आहेत. 1 आणि 2 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी ग्लासगोमध्ये असतील.

    नरेंद्र मोदी हॉटेलमध्ये आले असता, तिथल्या भारतीयांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधानांनी त्यावेळी जमलेल्या लहान मुलांशी संवादही साधला.

  6. गुडमॉर्निंग...बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये स्वागत.

    भारताला गेल्या वर्षभरात दुष्काळ, अवकाळी पाऊस, पूर, वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताला जवळपास 87 अब्ज डॉलर नुकसान झालं आहे.

    हा आकडा वर्ल्ड मीटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशनने प्रसिद्ध केला आहे. चीनला नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या एका वर्षांत 238 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानाचा संबंध तज्ज्ञ हवामान बदलाशी जोडत आहेत.

    हवामान बदलाच्या या संकटाचा धोका लक्षात घेऊन भारतासह जगातील 120 देश ब्रिटनमधील ग्लासगो शहरात एकत्र जमत आहेत. जेणेकरून या संकटाशी लढण्यासाठी एकत्रित उपाय शोधले जातील.

    दिल्ली, उत्तराखंडपासून महाराष्ट्र, केरळ गुजरातपर्यंत आणि पश्चिम बंगाल-ओडिसापासून आसामपर्यंत तुमच्या-आमच्यासारख्या सगळ्याच लोकांना हवामान बदलामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तींना सामोरं जावं लागलं. या गोष्टीचं महत्त्व लक्षात घेऊनच या लाइव्ह पेजमध्ये ग्लासगो इथल्या परिषदेचे अपडेट तर आम्ही देऊच, पण हवामान बदलाशी संबंधिता बातम्या, व्हीडिओही तुम्हाला पहायला मिळतील.