बिहार निवडणूकः पंतप्रधान मोदींने मानले बिहारच्या जनतेचे आभार

बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरू होईल - संजय राऊत

    बिहार निवडणुकीचे निकाल अजून यायचे आहेत. पण जे कल येतायेत, त्यावरून एक तरुण नेत्ता केंद्रतल्या सत्तेला सुद्धा काँटे की टक्कर देत आहे. तेजस्वी पर्व सुरू होतय अस चित्र आहे. तेजस्वी समोर पूर्ण मंत्रिमंडळ होतं, पण या मुलानं ज्या पद्धतीने टक्कर दिलीय, भविष्यसाठी एक मोठं संकेत आहे. बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरू होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

    बिहार च निकाल काही लागू द्या, पण ज्या प्रकारे जनतेने साहस दखवलय त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार. महाराष्ट्रात परिवर्तन झालं त्यानंतर देशात संकेत गेला परिवर्तन शक्य आहे.

    नितीश कुमार यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा पाहिजे होता. नोकरीचा मुदा पाहिजे होता. मात्र हे मुद्दे कधीच दिसले नाहीत. त्यामुळे बिहारमध्ये लोकांना बदल हवा होता. तो आता दिसतोय, असं संजय राऊत म्हणाले.

    संजय राऊत

    फोटो स्रोत, Getty Images

  2. बिहार निवडणूकः देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये भाजपला फायदा करून देऊ शकतील काय?

  3. 200 जागांचे कल हाती, NDA 102 तर महागठबंधन 88 ठिकाणी आघाडीवर

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत 243 पैकी 200 जागांचे प्राथमिक कल हाती आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर महागठबंधन सुरुवातीला काही वेळ पुढे होता. पण नंतर अत्यंत अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. सकाळी दहानंतर NDA ने महागठबंधनला मागे टाकलं.

    सध्याच्या स्थितीत NDA 102 तर महागठबंधन 88 ठिकाणी आघाडीवर आहे.

    पक्षःनिहाय आघाडी खालीलप्रमाणे -

    NDA

    भाजप - 54

    जद(यु) - 42

    विकासशील इन्सान पार्टी - 5

    हम - 1

    महागठबंधन

    राजद - 57

    काँग्रेस - 17

    डावे पक्ष - 14

    याव्यतिरिक्त स्वबळावर निवडणूक लढवत असलेले लोजपा 4, MIM 2 तर अपक्ष 3 ठिकाणी आघाडीवर आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. NDA 81 तर महागठबंधन 75 ठिकाणी आघाडीवर

    बिहार निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. मतमोजणीत सुरुवातीला महागठबंधन पुढे असल्याचं चित्र होतं. पण सकाळी दहानंतर परिस्थिती बदलल्याचं पाहायला मिळालं.

    मतमोजणीत सध्या NDA पुढे असून त्यांचे उमेदवार 81 ठिकाणी आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 42, जद(यु) 34 तर विकासशील इन्सान पार्टी 5 ठिकाणी आघाडीवर आहे.

    तर महागठबंधनचे उमेदवार 75 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामध्ये राजद 51, काँग्रेस 13 आणि डावे पक्ष 11 ठिकाणी आघाडीवर आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. नितीश कुमार 15 वर्षांच्या सत्तेनंतरही निवडणुकीच्या केंद्रस्थानी कशामुळे?

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जनता दल (संयुक्त)चे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) चे नेते असतील, असं भारतीय जनता पक्षाने घोषित केलं होतं. गेल्या 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान आहेत. सत्तेतील त्यांचा भागीदार भाजपनेही त्यांचं नेतृत्व मान्य करून त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवलं होतं. नितीश कुमार यांच्याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

    नितीश कुमार

    फोटो स्रोत, Getty Images

  6. एक्झिट पोल दाखवतात तेजस्वी आणि नितीश यांच्यामध्ये अटीतटीची लढत

  7. शाहनवाज हुसेन यांना NDAच्या विजयाचा विश्वास

    भाजप नेते आणि प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी बिहार निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

    माध्यमांमध्ये येणारे आकडे आमच्या मताप्रमाणे नाहीत. गेल्यावेळी 10-11 वाजेपर्यंत आम्ही जिंकत होतो. मात्र नंतर आकडे बदलले अंतिम निर्णय येत-येता आम्ही सरकार बनवण्याजवळ नक्की पोहचू भाऊ-भाऊ असतो. आम्ही जुळे भाऊ आहोत. आमची युती इमानदार आहे, अशी प्रतिक्रिया हुसेन यांनी आजतकशी बोलताना दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. तेजस्वी यादव यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा गराडा

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजद-काँग्रेसचं महागठबंधन पुढे असल्याचं दिसताच कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांच्या घरासमोर गराडा घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तेजस्वी यादव यांचा फोटो घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याचं चित्र आहे. तेजस्वी यादव हे त्यांच्या राघोपूर मतदारसंघात आघाडीवर आहेत.

    राज्यात सर्वत्र काँटे की टक्कर सुरू असून मतमोजणीत प्रचंड चुरस दिसून येत आहे. त्यामुळे आताच निकालाचं भाकित करणं घाईचं ठरू शकतं

    तेजस्वी यादव यांचं घर
    तेजस्वी यादव यांचं घर
    तेजस्वी यादव यांचं घर
    तेजस्वी यादव यांचं घर
  9. ब्रेकिंग, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भाजप सर्वात पुढे

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान सुरुवातीचे कल महागठबंधनच्या बाजूने असल्याचं सर्व माध्यमांवर दिसत आहे. पण निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भाजप सर्वात पुढे असल्याचं दिसून येत आहे.

    निवडणुकीच्या पहिल्या 43 जागांचे कल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. यामध्ये भाजप सर्वाधिक 15 जागांवर पुढे असल्याचं दिसत आहे. पाठोपाठ राजद 9 आणि जनता दल 8 जागांवर आघाडीवर आहे. तर कांग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे.

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बहुमताचा आकडा 122 इतका आहे. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या सुरुवातीच्या कलांमध्ये दोन्ही बाजूच्या पक्षांना शंभरपेक्षा जास्त जागा मिळत असल्याचं दिसत आहे. एकूणच बिहारमध्ये सध्यातरी तुल्यबळ लढत चालू आहे.

    निवडणूक आयोग

    फोटो स्रोत, eci

  10. मुंबईमध्ये राहणाऱ्या बिहारींना निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

    बिहारमधून मुंबईत स्थलांतरित झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे. काही जण मतदानासाठी खास मुंबईहून बिहारला जात असल्याचंही काहीवेळा दिसून येतं. मुंबईत राहणाऱ्या बिहारींना यंदाच्या निवडणुकीबाबत काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला होता. यापैकी कोणकोणते मुद्दे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात महत्त्वाचे ठरतील, याबाबत उत्सुकता आहे.

  11. तेजस्वी यादव : बिहार विधानसभा निवडणुकीतला क्रिकेटर राजकारणी

  12. सुरुवातीच्या कलांमध्ये महागठबंधन पुढे

    बिहार निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि कांग्रेस यांचं महागठबंधन पुढे असल्याचं दिसून येत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये महागठबंधन हे NDA पेक्षा पुढे असल्याचं दिसत आहे.

    तेजस्वी यादव

    फोटो स्रोत, Getty Images

  13. तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी समर्थक जमायला सुरुवात

    राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे समर्थक त्यांच्या निवासस्थानी जमायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या दिशेने काही एक्झिट पोल्सनी कल दाखवले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. मध्यप्रदेशातही 28 जागांसाठी मतमोजणीला सुरूवात

    मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूकही पार पडली होती. या मतमोजणीकडेही देशाचं लक्ष असणार आहे. पोट निवडणूक होत असलेल्या जागांपैकी 25 जागा ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्या होत्या. तसंच इतर कारणामुळे रिक्त झालेल्या इतर 3 जागा आहेत.

    या निवडणुकीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं सरकार तसंच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. ही निवडणूक कशा प्रकारे महत्त्वाची ठरेल, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेश पोटनिवडणूक : ज्योतिरादित्य सिंधिया यांचं राजकीय भवितव्य कसं असेल? ही बातमी वाचू शकता...

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचं सूचक ट्वीट

    बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी “बादशाह तो वक्त का होता है…. इन्सान तो युं ही गुरूर करता है! “ असं ट्विट केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. पाटण्यात मतमोजणीला सुरुवात

    पाटणा येथील अनुग्रह नारायण कॉलेज मतमोजणी केंद्रात मतांची मोजणी सुरू झाली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. बिहारमध्ये 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्रं

    बिहारमध्ये 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्रं बनवली गेली आहेत. इथं 8 वाजल्यापासून मोजणीला सुरुवात झाली आहे. चार जिल्ह्यांत प्रत्येकी 3 मोजणी केंद्रं तयार केली जात आहेत. त्यात पूर्व चंपारण्य, गया, सिवान, बेगूसराय यांचा समावेश आहे.

  18. तेजस्वी भवः बिहार; भाऊ तेजप्रताप यांच्याकडून तेजस्वी यांना शुभेच्छा

    बिहार निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव या निवडणुकीत नितीश कुमार यांच्याशी टक्कर घेत आहेत. निवडणूक मतमोजणीच्या सकाळी तेजस्वी यांचे भाऊ तेजप्रताप यांच्याकडून तेजस्वी भव: बिहार असं ट्विट भाऊ तेजस्वी यादव यांच्यासाठी केलं आहे. दोन्ही भावांमध्ये मतभेद आहेत अशी चर्चा बिहार निवडणुकीच्या आधी होती. मात्र या ट्विटमध्ये तेजस्वी यांना तेजप्रताप यादव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. बिहार निवडणूकः पंतप्रधान मोदींने मानले बिहारच्या जनतेचे आभार

  20. बिहारची निवडणूक नेमकी कशी झाली? - पाहा व्हीडिओ

    निकाल समजून घ्यायचे असतील, तर बीबीसी मराठीने पाटण्याच्या गंगाघाटावरूनहा ग्राऊंड रिपोर्ट तुम्ही नक्की पाहायला हवा..