देशात 24 तासांत आढळले 7,466 कोरोनाग्रस्त, आजपर्यंतची एका दिवसातली सर्वाधिक वाढ
राज्यात आज 2,598 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 59,546 अशी झाली आहे.
लाईव्ह कव्हरेज
लॉकडाऊन 5 कसं असेल? आधीचे लॉकडाऊन यशस्वी झाले का?
आज दिवसभरात काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो नमस्कार मंडळी,
कोरोना व्हायरसविषयक महत्त्वाचे अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आजही आपण महाराष्ट्र, भारत आणि जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या. आता आपली भेट उद्या सकाळी होईल.
पण, टाटा, बाय-बाय करण्यापूर्वी आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या अपडेट्सवर एक नजर टाकूया.
1.महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे 2,598 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 59,546 वर पोहोचली.
2.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारनं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली.
3.भारतात जवळपास 30 टीम कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचं काम करत आहे. साधारपणे एखादी लस 10 ते 15 वर्षांतून एकदा तयार होत असते. पण, एकाच वर्षात लस बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही एकदाच 100हून अधिक लशींवर काम सुरू केलं आहे. - के. विजय राघवन, भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार
4.मजुरांच्या तिकिटाचा भार राज्यांनी उचलावा, तसंच प्रवासादरम्यान मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करावी. - सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
5.सगळ्या जगात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. चीननं जगाला दिलेली ही वाईट भेटवस्तू आहे. – डोनाल्ड ट्रंप
6.फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात जवळपास 8 लाख 50 हजार जणांना नोकरी गमवावी लागली. यामुळे फ्रान्समधील बेरोजगारांची संख्या 45 लाखांवर पोहोचली आहे.
7.अमेरिकेत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा 1 लाखांवर गेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 47 जणांचा मृत्यू झालाय.
शुभ रात्री, उद्या भेटूयात.
यवतमाळच्या अनिकेतने बनवला मोबाईलच्या मदतीने सॅनिटायझर स्प्रे करणारा डिस्पेन्सर
ब्रेकिंग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची केंद्र, राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला नोटीस
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये स्थलांतरित मजुरांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात केंद्रीय गृह सचिव, रेल्वे मंत्रालय आणि गुजरात आणि बिहार राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.
"या ट्रेनमधील प्रवासादरम्यान गरीब मजुरांच्या जीवाची सुरक्षा करण्यात सरकार अयशस्वी ठरलं आहे," असं आयोगानं म्हटलं आहे.
माध्यमांमधील बातम्यांची आयोगानं दखल घेतली आहे, ज्यात या गाड्या उशीरा निघत असून उशीरा पोहोचत असल्याचं म्हटलं आहे.
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये दोन आणि दानापूर, सासाराम, गया, बेगूसराय आणि जहाणाबादमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, यात एका मुलाचाही समावेश आहे, असं बातम्यांमध्ये आल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
आयोगानं गुजरातच्या सूरतहून बिहारच्या सिवानला जाणाऱ्या एका ट्रेनचाही उल्लेख केला आहे आणि ही गाडी 9 दिवसांनंतर सिवानला पोहोचल्याचं म्हटलं आहे.
या बातम्या खऱ्या असतील तर मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
याप्रकरणी आयोगानं केंद्रीय गृह सचिव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि गुजरात आणि बिहारच्या मुख्य सचिवांना चार आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे सर्वाधिक 1,024 रुग्ण
दिल्लीत गुरुवारी कोरोनाचे सर्वाधिक 1,024 रुग्ण आढळले आहेत. यामुळे दिल्लीतल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या 16, 281वर पोहोचली आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मुंबई शहरातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड्स कमी पडत आहेत का?
मुंबईत एकीकडे सरकार हजारो बेड्सची तयारी करत असूनही, रुग्णांना बेडअभावी हॉस्पिटलमध्ये प्रवेशच मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ICU प्रकारचे किंवा ऑक्सिजन देण्याची सुविधा असणारे बेड्स पुरेसे नसल्यानं कोव्हिड किंवा अन्य गंभीर स्वरुपाच्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना उपचारांसाठी वाट पाहावी लागते आहे. यामागची कारणं काय आहेत?
पाहा व्हीडिओ -
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
कोरोना व्हायरस ही चीननं जगाला दिलेली वाईट भेटवस्तू – डोनाल्ड ट्रंप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे.
ट्रंप यांनी ट्वीट करत म्हटलं, "सगळ्या जगात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. चीननं जगाला दिलेली ही वाईट भेटवस्तू आहे."
अमेरिकेत कोरोनामुळे 1 लाख लोकांचा जीव गेला आहे, ही खूपच दु:खद बाब आहे, असंही ट्रंप यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेत आतापर्यंत जवळपास 17 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरातल्या कोरोना रुग्णांपैकी 30टक्के रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
लॉकडाऊनमध्ये अमित शहा कुठे आहेत? ठाकरेंवर विचारलेल्या प्रश्नावर राऊतांचं उत्तर
#CoronaPodcast: आज काय घडलं?
#CoronaPodcast 70: महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे वाढण्यामागची कारणं काय? भारतात कुठे कुठे सुरू आहे कोरोनाची लस शोधण्याचं काम? स्थलांतरित मजुरांबद्दल सुप्रीम कोर्टानं केंद्र आणि राज्यांना काय दिले आदेश? अमेरिकेत मृतांचा आकडा गेला 1 लाखाच्या पुढे, याव्यतिरिक्त दिवसभरात घडलेल्या महत्त्वांच्या घडामोंडीविषयीचा हा बीबीसी मराठीचा खास लाईव्ह कार्यक्रम.
पाहा -
ब्रेकिंग, महाराष्ट्रात कोरोनाचे 2,598 नवीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्या 59,546
राज्यात आज 2,598 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 59,546 अशी झाली आहे.
आज नवीन 698 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 18,616 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 38,939अक्टिव्ह रुग्ण आहेत.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, कर्नाटक सरकारची 5 राज्यांतून होणाऱ्या प्रवासावर बंदी
कर्नाटक राज्य सरकारनं महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.
यामध्ये विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचा समावेश आहे.
महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
कर्नाटकमध्ये आतापर्यंत 2,418 जणांना कोरोनाची लागण झाली असून 47 जणांचा मृत्यू झाला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
‘ट्रेन मिळेल या आशेनं भाड्याचं घर सोडलं, आता रस्त्यावर रहावं लागतंय’
संजय राऊत : देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षाच्या भूमिकेवर काय म्हणाले?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात 8 लाख 50 हजार जणांना नोकरी गमावली
फ्रान्समध्ये एप्रिल महिन्यात जवळपास 8 लाख 50 हजार जणांना नोकरी गमवावी लागली आहे. यामुळे फ्रान्समधील बेरोजगारांची संख्या 45 लाखांवर पोहोचली आहे.
फ्रान्समधल्या रोजगार संस्थेनं म्हटलं आहे की, 1996मध्ये देशातील बेरोजगारीविषयक माहिती नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बेरोजगारांची ही संख्या सर्वाधिक आहे.

फोटो स्रोत, AFP
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो कोरोनाचे रुग्ण असलेल्या अशोक चव्हाणांनी हाॅस्पिटलमधून पहिला व्हीडिओ ट्वीट केला आहे.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
इंडिगोच्या 11 प्रवाशांना कोरोनाची लागण
इंडिगो विमानातून प्रवास करणाऱ्या 11 जणांना गेल्या 2 दिवसांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.
बुधवारी इंडिगोच्या बंगळुरू-कोईंबतूरमधील 6 आणि दिल्ली-कोईंबतूर या फ्लाईटमधील 2 प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वृत्तसंस्था PTIनं दिली आहे.
मंगळवारी दिल्ली-जम्मू फ्लाईटमधल्या 3 जणांना कोरोनाची लागण झाली होती.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, 'भारतात एकाच वेळी 100 लशींवर काम सुरू'
भारतात जवळपास 30 टीम कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचं काम करत आहे. यामध्ये मोठे उद्योग, स्टार्टअप आणि वैयक्तिक पातळीवर संशोधन करणाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती भारताचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे म्हटलं, "साधारपणे एखादी लस 10 ते 15 वर्षांतून एकदा तयार होत असते आणि त्यासाठी 200 मिलियन डॉलर इतका खर्च येतो. एकाच वर्षात लस बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे आम्ही एकदाच 100हून अधिक लशींवर काम सुरू केलं आहे.
"सामान्य व्यक्तीचं लसीकरण केलं जातं. आजारी व्यक्तींना लस दिली जात नाही. त्यामुळेच लशीची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासणं गरजेचं असतं."

फोटो स्रोत, PIB
फोटो कॅप्शन, के. विजय राघवन कार्टून काय म्हणतं?

फोटो कॅप्शन, कार्टून लॉकडाऊनमुळे हाल होत असलेल्या एका मेंढपाळाची गोष्ट