राज्यात कोरोनाचे 2091 नवीन रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 54,758

मुंबई-पुणे, महाराष्ट्र, देश आणि जगाच्या कोरोनाविषयक ताजे अपडेट्स बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर पाहायला मिळतील.

लाईव्ह कव्हरेज

  1. आतापर्यंत 42 लाख मजुरांना रेल्वेनं आपापल्या राज्यात पोहोचवलं

    भारतीय रेल्वेनं 3 हजार 276 श्रमिक स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून एक मेपासून आतापर्यंत 42 लाख स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात पोहोचवलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. भारतीय अर्थव्यवस्थेला 'कॅश इंजेक्शन'ची गरज - राहुल गांधी

    राहुल गांधी

    फोटो स्रोत, Getty Images

    • कोरोनाचा प्रसार वाढत असताना केंद्र सरकारचे पुढचे नियोजन काय आहे?
    • लॉकडाऊनचं ध्येय पूर्णपणे फसलंय, हे स्पष्ट दिसतंय
    • भारत हा जगात एकमेव असा देश आहे, जिथं आजार वाढत असताना लॉकडाऊन शिथील केला जातोय
    • भारतीय अर्थव्यवस्थेला 'कॅश इंजेक्शन'ची गरज आहे
    • केंद्राच्या पॅकेजमुळे काहीही होणार नाही
    • पुढे काय करायचं, हे पंतप्रधानांनी देशाल सांगायला हवं
  3. आंध्र प्रदेशात मजुरांच्या बसचा अपघात, 10 जण जखमी

    आंध्र प्रदेशात स्थलांतरित मजुरांच्या बसला अपघात झाल्यानं 10 मजूर जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय.

    बंगळुरूहून कोलकात्याच्या दिशेनं ही बस जात होती.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. विमान प्रवास करायचाय? आधी वाचा महाराष्ट्र सरकारचे हे 9 नियम

  5. विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करा - राज ठाकरे

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी राज ठाकरेंनी केलीय. त्यांनी तसं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलंय.

    या परीक्षांवर राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा वादही रंगला होता.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा केवळ एकच रुग्ण हॉस्पिटलमध्ये!

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    कोरोनानं जगभर थैमान घातलंय. मात्र, न्यूझीलंड या देशानं कोरोनाच्या प्रसारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळलंय.

    न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा केवळ एकच रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. तर संपूर्ण देशात केवळ 22 रुग्ण आढळले आहेत.

    कोरोनाची देशांतर्गत साखळी पूर्णपणे तोडल्याचा दावा न्यूझीलंडमधील अधिकाऱ्यांनी केलाय.

    मे या संपूर्ण महिन्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडनं देशातील अनेक भागातील लॉकडाऊनही हटवलंय.

  7. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी: 'सामना'तून टीका

  8. मुंबईहून आलेल्या 75 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग - योगी आदित्यनाथ

  9. 'या' 5 वर्षांच्या मुलानं एकट्यानं केला दिल्ली-बंगळुरू विमानप्रवास

    भारतात लॉकडाऊनमुळे बंद असलेली हवाई वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आलीय. अनेकजण वेगवेगळ्या शहरात अडकले होते. ते आता विमानानं आपापल्या घरी परतू लागलेत.

    पाच वर्षीय विहान शर्मा नावाचा मुलगा दिल्लीत अडकला होता. सोमवारी विहाननं दिल्लीतून बंगळुरूपर्यंत एकट्याने विमानप्रवास केला.

    विहान

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, विहान शर्मा

    बंगळुरू विमानतळावर विहानला नेण्यासाठी त्याची आई आली होती. एएनआयशी बोलताना विहानची आई म्हणाली, विहान दिल्लीतून एकटा आलाय.

    एएनआयच्या फोटोत तुम्ही पाहू शकता की, विहान 'स्पेशल कॅटेगरी'चं फलक हातात घेऊन विमानतळावर उभा आहे.

    विहान शर्मा आणि त्याची आई

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, विहान शर्मा आणि त्याची आई

    काही दिवसांच्या सुट्टीसाठी विहान दिल्लीत आजी-आजोबांकडे राहायला आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे विहानला दिल्लीतच अडकून राहावं लागलं.

  10. दक्षिण कोरियात लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगात डांबलं

    दक्षिण कोरिया

    फोटो स्रोत, EPA/JEON HEON-KYUN

    क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केलेल्या दक्षिण कोरियातील एका तरुणाला कोर्टाना चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावलीय.

    किम नामक व्यक्तीला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र, क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच किम घराबाहेर पडला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं.

    दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्यानं नियम आणखी कडक करण्यात आले आहेत.

  11. परतलेल्या मजुरांसाठी यूपी सरकार कामगार आयोग स्थापन करणार

    कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर भारतात अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. यातील बहुतांश स्थलांतर इतर राज्यातून उत्तर प्रदेशात झालं. याचं कारण उत्तर प्रदेशातील मोठ्या संख्येतील लोक रोजगाराच्या शोधात परराज्यात स्थायिक झालेत.

    24 मे पर्यंत उत्तर प्रदेशात 23 लाख मजूर परतले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच याबाबत ट्विटरवरून माहिती दिली होती.

    आता या कामगारांसाठी उत्तर प्रदेश सरकार कामगार/श्रमिक कल्याण आयोगाची स्थापना करणार आहे. सर्व कामगारांना उत्तर प्रदेशातच रोजगार मिळेल या दृष्टीने पावल उचलणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

    ट्वीट

    फोटो स्रोत, Twitter

  12. भारतात गेल्या 24 तासात 6 हजार 535 रुग्ण सापडले

    भारतात गेल्या 24 तासात 6 हजार 535 नवे रुग्ण सापडले, तर 146 जणांचा मृत्यू झाला.

    भारतातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झालीय, तर मृतांची संख्या 4 हजार 167 वर पोहोचलीय.

    केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. मक्का वगळता संपूर्ण सौदी अरेबियात लॉकडाऊन शिथिल

    सौदी अरेबियात लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गुरुवारपासून लॉकडाऊन शिथिल केलं जाईल.

    31 मे नंतर देशांतर्गत विमानसेवा आणि मशिदीत जाऊन नमाज या गोष्टींवरील बंधनंही हटवण्यात येतील. सार्वजनिक आणि खासगी कार्यालयात जाण्यासही परवानगी देण्यात आलीय.

    मक्कामधील कर्फ्यू मात्र 21 जूनपासून हटवला जाईल. मात्र, सध्या मक्कामध्ये दुपारी तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू असेल.

    मक्का

    फोटो स्रोत, AFP via Getty Images

  14. दिल्ली-गाझियाबाद सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी

    दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांची अचानक वाढ झाल्यानं सीमा बंद करण्यात आल्या. त्यानंतर आज दिल्ल-गाझियाबाद सीमेवर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची दिसून आली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. VIDEO : नारायण राणेंची उद्धव ठाकरे सरकारवर टीका

    माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  16. अमेरिकेत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

    अमेरिकेत सैन्यातल्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ‘मेमोरियल डे वीकेंड’ साजरा केला जातो. या दिवशी अमेरिकेत सुट्टी असते. मात्र, सध्या कोरोनामुळे अमेरिकेत स्थिती अत्यंत बिकट आहे. असं असतानाही सोशल डिस्टन्सिंगला केराची टोपली दाखवत समुद्रकिनारी नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं चित्र दिसलं.

    मिसुरी बिच

    फोटो स्रोत, REUTERS

    फोटो कॅप्शन, मिसुरीतल्या तलावात अशी गर्दी झाली होती.

    फ्लोरिडातल्या डेटोना बिचवर हजारोंच्या संख्येत लोक गोळा झाले होते. त्यांना तिथून हुसकावून लावण्यात फ्लोरिडा पोलिसांची दमछाक झाली.

    कॅलिफोर्निया

    फोटो स्रोत, EPA

    फोटो कॅप्शन, कॅलिफोर्नियातील न्यूपोर्ट बिचवरील गर्दी पाहा.

    अमेरिकेच्या मध्य भागात असलेल्या मिसुरीमधील बार तर भरले होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

    लॉस एंजेलिस

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन, लॉस एंजेलिसमधील बिच

    अमेरिकेतील कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. देब्रो बर्क्स यांनी या सगळ्या दृश्याबाबत चिंता व्यक्त केली.

    न्यू जर्सी

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन, हे न्यू जर्सीतलं चित्र आहे

    “एक गोष्ट स्पष्ट आहे की, सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बाहेर असाल आणि सोशल डिस्टन्सिंग शक्य नसेल, तर मास्क वापरणं गरजेचं आहे,” असं डॉ. बर्क्स या एबीसीशी बोलताना म्हणाल्या.

  17. जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 55 लाखांपर्यंत पोहोचली

    कोरोना

    फोटो स्रोत, Buda Mendes/Getty Images

    कोरोना व्हायरसनं अवघ्या जगाला वेढलं आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 55 लाखांपर्यंत पोहोचलीय.

    जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे 3 लाख 46 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे, तर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या54 लाख 93 हजार 482 एवढी आहे.

    अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत. ब्राझिल आणि रशियामध्येही परिस्थिती चिंताजनक बनत चाललीय.

  18. अमेरिकेत मृतांची संख्या 98 हजार 218 वर पोहोचली

    अमेरिकेत गेल्या 24 तासात 532 जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील मृतांची एकूण संख्या 98 हजार 218 झालीय.

    तर अमेरिकेत आतापर्यंत 16 लाख 62 हजार 375 जणांना कोरोनाची लागण झालीय.

    जगातील इतर कुठल्याही देशांच्या तुलनेत कोरोनानं सर्वाधिक थैमान अमेरिकेत घातलाय.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. उत्तर प्रदेशात रुग्णांची संख्या 6,497 वर पोहोचली

    उत्तर प्रदेशात काल दिवसभरात 229 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील एकूण रुग्णांची संख्या आता 6 हजार 497 झालीय.

    यातील 2 हजार 668 केसेस अॅक्टिव्ह आहेत.

    तर मृतांचा आकडा 169 वर पोहोचला आहे.

    ट्वीट

    फोटो स्रोत, Twitter/PTI

  20. कालच्या अपडेट्सवर एक नजर

    सुप्रभात...

    आजच्या अपडेट्सना आपण सुरुवात करणार आहोतच. तत्पूर्वी, एकदा कालच्या अपडेट्सवर नजर टाकू.

    • काल महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2436 नवे रुग्ण आढळले.
    • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 52,667 वर गेली आहे.
    • काल 1186 रुग्ण बरे होऊन घरी गेले, एकूण 15,786 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
    • महाराष्ट्रात काल 60 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.
    • मुंबईतील रुग्णांची संख्या 31,972 वर गेली आहे.
    • मजुरांच्या प्रश्नावरुन राज्य सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात तणाव
    • कोरोनाचं संकट हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नारायण राणे
    • राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.
    • देशांतर्गत विमानसेवा सुरू आजपासून सुरू झाली असली तरी नियोजनामधील गोंधळामुळे देशभरातील 80 हून अधिक विमानं रद्द करण्यात आल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
    • इराणला मागे टाकत भारत आता कोरोनाग्रस्तांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये.

    कालच्या घडामोडी तुम्ही इथे क्लिक करून पाहू/वाचू शकता.