You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

राज्यात 2608 नवीन रुग्णांची नोंद, 60 जणांचा एका दिवसात मृत्यू

राज्यात शनिवारी 2,608 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर राज्यातील रुग्णांचा एकूण आकडा 47 हजारांच्या वर गेला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. आज दिवसभरात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडी पुढील प्रमाणे

    1) राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार

    2) राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार

    3) आज राज्यात 2608 रुग्णांची नोंद

    4) आज राज्यात 60 रुग्णांचा मृत्यू झाला तर आज 821 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

    5) आतापर्यंत राज्यात 47,190 रुग्ण आढळले आहेत.

    आता आपण उद्या नव्या लाईव्ह पेजच्या माध्यमातून ताज्या बातम्या जाणून घेऊ. हे पेज येथे थांबवत आहोत.

    धन्यवाद

  3. कोरोनाच्या काळात कुणी फसवण्याचा प्रयत्न केल्यास अशी घ्या खबरदारी

  4. 'कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आणि मला वाटलं आता सगळं संपलं', दिपाली जगताप, बीबीसी मराठी प्रतिनिधी

    "30 एप्रिलला माझ्या नवऱ्याला ताप आला. दोन दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मी, माझ्या दोन मुली आणि माझ्या 82 वर्षांच्या सासूबाईंची कोरोना टेस्ट केली.

    आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एका क्षणात माझा संसार उद्ध्वस्त झाला असं वाटलं," नवी मुंबईत राहणाऱ्या मानसी (बदललेलं नाव) यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

    मानसी आणि त्यांचे पती वाशी बाजारपेठेत व्यवसाय करतात. फळांच्या गिफ्ट पॅकेजिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. लॉकडाऊन सुरू असलं तरी बाजारपेठेत फळांची विक्री सुरू असल्याने दररोज हे दाम्पत्य कामावर जात होते.

    बाजारपेठेत सकाळी ग्राहकांची गर्दी व्हायची. कारण वाशी बाजारपेठेत कल्याण,डोंबिवली,ठाणे अशा सगळ्या ठिकाणाहून छोटे व्यापारी फळांच्या खरेदीसाठी येत होते.

    बाजारपेठेत सुरक्षा व्यवस्था होती. सोशल डिस्टंसिंग पाळून काम करण्याच्या सूचना होत्या.

    ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा-

  5. राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार

    लाभार्थींसोबत लाभार्थी नसलेल्यांवर होणार खासगी रुग्णालयात उपचार होणार महात्मा ज्योतीबा फुले आणि पंतप्रधान आरोग्य योजनेशी संलग्न खासगी रुग्णालयात मिळणार. याबाबत आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढण्यात आले आहे.

    कोव्हिडबाधितांना उपचार पिवळं, केशरी आणि पांढरे रेशनकार्ड, तहसीलदार दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र पुरावा म्हणून स्विकारण्यात येणार.

    कोव्हिडची राज्यातील परिस्थिती पाहता या योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील रहिवाशांना महात्माफुले योजनेअंतर्गत 996 उपचार पद्धतींचा लाभ मिळेल.

    राज्य सरकारने 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार देण्याची घोषणा केली होती.

    सरकारी रुग्णालयात राखीव 134 सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि श्रवणयंत्रांचा उपचार वगळता 120 उपचार संलग्न खासगी रुग्णालयात 31 जुलै 2020 पर्यंत मान्यता दराने द्यावेत, असेही त्यात नमूद केले आहे.

  6. PGIMER च्या डॉक्टरांनी तयार केली रोबोटिक ट्रॉली

    कोरोनाच्या काळात रुग्णाशी संपर्क कमीत कमी येण्यासाठी चंदिगढ येथिल PGIMER संस्थेच्या डॉक्टरांनी रोबोटिक ट्रॉली तयार केली आहे. डॉ. प्रणय महाजन आणि शैलेश गहुकर यांनी ही ट्रॉली तयार केली आहे.

  7. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

    शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट, पण ही भेट का महत्त्वाची? महाराष्ट्रात आज पुन्हा वाढले कोरोनाचे आकडे. मुंबईत किती वाढले रुग्ण? हायड्राॅक्सीक्लोरोक्वीन औषधाबद्दल ICMR नं काढली नवी नियमावली. याबद्दल सांगतायत विनायक आणि आशिष

  8. मोदी सरकारचा स्थलांतरित मजुरांच्या समस्येबाबत अंदाज चुकला का?

  9. ब्रेकिंग, आज राज्यात 2608 नव्या रुग्णांची नोंद

    आज महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2608 नवे रुग्ण आढळून आले. आज राज्यात 60 रुग्णांचा मृत्यू झाला तर आज 821 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत राज्यात 47,190 रुग्ण आढळले आहेत.

  10. उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत- मुख्यमंत्री

    मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 14 दिवसांवर गेला आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.

    गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो असा मला विश्वास आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    त्यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, डीन , डॉक्टर्स यांच्याशी आज दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. फिल्ड हॉस्पिटलमुख्यमंत्री म्हणाले की, एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश व प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत तसेच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल अशी पाउले उचलत आहोत.पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसेच सुसज्ज कंट्रोल रूमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सुविधाचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  11. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या सहकाऱ्याचं स्वागत

    मुंबईतील जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांनी कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या आपल्या सहकाऱ्यांचं फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत केलं.

  12. कोरोना मुंबईः 100 कोरोनाग्रस्त मातांचं बाळंतपण या रुग्णालयानं कसं केलं?, सौतिक बिस्वास, बीबीसी भारत प्रतिनिधी

    भारतात सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण आर्थिक राजधानी मुंबई शहरात आहेत. मुंबईत आता गरोदर मातांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे.

    अशातच मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये 100 हून अधिक कोरोनाग्रस्त महिलांची प्रसुती झाली आहे.

    लोकमान्य टिळक महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांत 115 पैकी 3 नवजात बाळांना कोरोनाची लागण झाली आहे.

    प्रसुतीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली. पण काही दिवसांनंतर टेस्ट केल्यानंतर ते बरे झाले आहेत. अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन हॉस्पिटलमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मातांची प्रसुती सी सेक्शनद्वारा झाली तर उर्वरित मातांची नैसर्गिक प्रसुती झाली.

    जन्म झालेल्या बाळांमध्ये 56 मुलगे तर 59 मुली आहेत. यापैकी 22 गरोदर मातांना इतर हॉस्पिटलमधून उपचारासाठी इथे पाठवण्यात आले होते.

    या गर्भवतींना कोरोनाची बाधा नेमकी कशामुळे होत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. घरी, हॉस्पिटलमध्ये की इतर कुठून याचा शोध घेता येत नाही.ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  13. आरोग्य सेतू ॲप संसर्ग कमी करू शकतं?

  14. लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

    लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.

    लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.

    तुम्हीसुद्धा सध्या तेलकट, चमचमीत पदार्थ खात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा- लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

  15. कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं?

  16. विमानसेवेबाबत अद्याप निर्णय नाही- भूषण गगराणी

    केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने 25 एप्रिलपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

    केंद्रीय मंत्रालयाने देशातील सर्व एअरपोर्टना ऑपरेशनसाठी सज्ज राहण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, विमानसेवा सुरू करण्याच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने असल्याचं पहायला मिळतंय.महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारने 31 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने विमानसेवेला परवानगी नाही असा पवित्रा घेतलाय.केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत बीबीसीशी बोलताना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी म्हणाले, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या आदेशात बदल केलेला नाही. लॉकडाऊनच्या आदेशात विमानसेवेला परवानगी नाही.केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे प्रवाशात मात्र संभ्रम आहे. विमानसेवा केंद्राच्या अख्यारीत येते.

    आता प्रश्न असा आहे, भारतातील विविध ठिकाणहून मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर ठिकाणी आलेल्या प्रवाशांचं होणार काय?टॅक्सी, ओला, रिक्षा यांच्यावरही महाराष्ट्रात बंदी आहे. त्यामुळे एअरपोर्टवर उतरलेल्या प्रवाशांना प्रवासासाठी वाहन मिळणार का?

    खासगी वाहन प्रवाशांना घेण्यासाठी येणार असेल तर त्यांना एअरपोर्टमध्ये प्रवाशांना पिकअप करण्यासाठी येता येईल का?रस्त्यावरून एअरपोर्टकडे येताना लोकांना पोलिसांनी अडवलं तर? प्रवासी काय करणार ?हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. याचं उत्तर राज्य आणि केंद्राने अजूनही दिलेलं नाही.तामिळनाडू सरकारनेही केंद्राच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. तामिळनाडू सरकार 31 मे पर्यंत विमानसेवा सुरू न करण्याबाबत केंद्राला पत्र पाठवणार आहे.

  17. थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती

  18. कडेला झाली प्रसुती, तासाभराने पुन्हा तिची पायपीट, सुशीला सिंह, बीबीसी प्रतिनिधी

    डोक्यावर सामानाचं गाठोडं, कडेवर लहानगी लेक आणि मागे आणखी तीन लहान मुलं. यापैकी सगळ्यात मोठं मूल सात वर्षांचं. शकुंतला आणि राकेश यांचं कुटुंब नाशिकहून पायी चालत मध्य प्रदेशातल्या सतनामधल्या गावी जायला निघालं.

    असे हजारो मजूर सध्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला निघालेले आहेत. पण त्यांच्यात आणि या कुटुंबातला फरक म्हणजे शकुंतला गर्भवती होत्या. गरोदरपणाचा नववा महिना सुरू होता आणि खूप मोठा पल्ला गाठायचा होता.

    हे कुटुंब जिथे काम करायचं तिथलं सगळं अन्न संपलं, मुलांची उपासमार होऊ लागली. रोजंदारीवर काम करणाऱ्या राकेश यांना दिवसाचे 400 रुपये तर शकुंतलांना दिवसाचे 300 रुपये मिळायचे.

    कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन महिनाभरापेक्षा जास्त चालला आणि इतक्यात तो उठण्याची चिन्हं दिसेनात.

    पूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

  19. कोरोनाच्या काळातही या आजी 1 रुपयात इडली का विकतात?

  20. आयुष्मान भारत योजनेबाबत पंतप्रधान मोदींनी केलेला दावा किती खरा?