राज्यातल्या खासगी रुग्णालयातील 80% बेड्स सरकारने घेतले ताब्यात
राज्याची आरोग्ययंत्रणा कोलमडली, 50 हजार कोटींचं पॅकेज द्या - देवेंद्र फडणवीस
लाईव्ह कव्हरेज
स्पर्श न झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?
कोरोनाच्या काळात अनेक जण अनेक गोष्टींना मुकतायत, त्यातलीच एक म्हणजे मानवी स्पर्श. स्पर्श, प्रेम, सेक्स याबद्दल अनेक लोक खुलेपणाने बोलू शकत नाहीत.
कोरोनाच्या या काळात जेव्हा यातील अनेक गोष्टींना आपल्याला मुकावं लागतंय, त्यावेळी हे बोलणं गरजेचं झालंय.
मानवी आयुष्यात स्पर्शाचा एक महत्त्वाचा रोल असतो.
तो मिळाला नाही तर आपल्या मानसिक आणि शारिरीकआरोग्यावर काही परिणाम होऊ शकतात. काय आहे स्पर्शाचं महत्त्व याचीच ही सोपी गोष्ट.
व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लॉकडाऊन: स्पर्श न झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात? #सोपीगोष्ट 83
सरकारनं धार्मिक स्थळांचा पैसा ताब्यात घ्यावा- प्रकाश आंबेडकर
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापाठोपाठ प्रकाश
आंबेडकर यांनीही कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी धार्मिक
स्थळाकडील सोनं ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या
प्रतिक्रिया फेसबुक किंवा ट्वीटरवरच्या या चर्चेमध्ये पोस्ट करू शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
RBI ने कर्जाचा हप्ता न भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली
RBI ने कर्जाचा हप्ता न भरण्याची मुदतआणखी तीन महिन्यांनी वाढवून कर्जदारांना दिलासा दिला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात
रिझर्व्ह बँकेकडून रेपो
रेटमध्ये कपात. रेपो रेट 4.4% पासून 4% केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास
यांनी पत्रकार परिषदेत केली.
शक्तिकांत दास यांच्या
पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-
रिव्हर्स रेपो रेट 3.35% टक्क्यावरआणला
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मार्चअखेरीस 17टक्क्यांची घट तर उत्पादनात
21टकक्यांची घट.मुलभूत उद्योगातील उत्पादनात 6.5% टक्क्यांची घट
जीडीपीची वाढ येत्या काळात नकारात्मकच राहणार
2020च्या सुरुवातीच्या काळात महागाई राहणार.
2020च्या उत्तरार्धात कमी होईल.
लॉकडाऊनच्या काळातअन्नधान्याच्या उत्पादनात 3.7 टक्क्यांनी वाढ झाली असूनही दिलासादायक बातमी आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
ब्रेकिंग, देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6088 नवीन रुग्ण
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6088 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या
आता 1,18,447 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3583 रुग्णांचा
मृत्यू झाला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
इटलीमध्ये कोरोना व्हायरसचे 51,000 बळी?
फोटो स्रोत, Getty Images
चीनपाठोपाठ कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला होता.इटलीमधली रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्याही चीनपेक्षा जास्त
झाली.
त्यानंतर अमेरिकेतली कोरोनाग्रस्तांची आकडेवारी जास्त झाली.अमेरिकेत
आतापर्यंत कोव्हिड-19मुळे 95,000 लोकांचा मृत्यू
झालेला आहेत, तर इटलीमध्ये 32,000
मृत्यू झालेले
आहेत.
पण इटलीमध्ये
मार्च आणि एप्रिलमध्ये कोव्हिड-19 मुळे जितके मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय
हा आकडा त्यापेक्षा 19,000 नी जास्त असण्याची शक्यता असल्याचं गुरुवारी
इटलीच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने म्हटलं आहे.
INPS ही इटलीमधली
सगळ्यात मोठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी संस्था आहे. सरकारी
आकडेवारीवर विश्वास ठेवता येणार नसल्याचं या संस्थेने म्हटलंय.
मार्च -
एप्रिलमध्ये इटलीमध्ये एकूण 1,56,429
मृत्यू झाल्याचं
या अभ्यासात सांगण्यात आलंय. 2015
ते 2019 दरम्यान या महिन्यांमध्ये इटलीमध्ये झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत ही आकडेवारी
सरासरी 46,909 ने जास्त आहे. यापैकी फक्त 27,938 मृत्यू कोरोनाव्हायरसशी संबंधित असल्याचं सिव्हिल प्रोटेक्शन
एजन्सीने म्हटलंय.
याचाच अर्थ
एरवीपेक्षा 18,971 जास्त मृत्यू झालेले आहेत आणि यापैकी 18,412 मृत्यू हे कोरोनाचा सर्वात गंभीर प्रादुर्भाव झालेल्या इटलीच्या उत्तर भागात झालेले आहेत. मृत्यूंचं वाढलेलं प्रमाण हे केवळ कोरोनाव्हायरसशी संबंधित असू शकत नाही, कारण लोकांना
कोव्हिड 19च्या रुग्णांमुळे हॉस्पिटलमध्ये जागा नसल्यानेआरोग्यसेवा मिळत नसल्याचं INPSचं म्हणणं आहे.
शुक्रवारपर्यंत
इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंची अधिकृत संख्या 32,486 आहे. यापैकी 26,715 मृत्यू हे इटलीच्या उत्तरेकडील लॉम्बार्डिया
भागात झालेले आहेत. युरोपातल्या या भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात झालेला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
कोरोना पॉडकास्ट
रात्री आठच्या सुमारास आशिष आणि विनायक तुमच्यासाठी कोरोनासंदर्भातले
दिवसभराचे अपडेट्स घेऊन येतात, त्यांचं विश्लेषण करतात आणि
तुमच्या प्रश्नांची उत्तरंही देतात.हा पॉडकास्ट न चुकता लाईव्ह
पाहण्यासाठीबीबीसी मराठीच्या फेसबुक पेजला लाईक
आणि फॉलो करा.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, ठाकरे सरकारवर विरोधकांची टीका
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 1.12 लाखांहून
अधिक झाला आहे. महाराष्ट्रात ही संख्या 41 हजारांहून अधिक झाली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2345 नवीन
रुग्ण आढळले.
एकट्या मुंबईत रुग्णांची संख्या 25 हजारांहून
अधिक झाली असून गेल्या 24 तासात 1,382 नवीन
रुग्ण आढळले आहेत .
महाराष्ट्रात गुरूवारी (21 मे) कोरोनामुळे 64 रुग्णांचा
मृत्यू झाला.
एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा
साधला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोना संकट निवारण्यामध्ये अपयशी ठरल्याची टीका
फडणवीस यांनी केली.
“महाराष्ट्राला
कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईतली परिस्थिती तर हाताबाहेर जात आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनच या सरकारची धोरणं चुकलेली आहे. मुख्यमंत्री नवे आहेत
आणि त्यांच्याकडे प्रशासनाचा कोणताही अनुभव नाहीये.”
फोटो स्रोत, Getty Images
गेल्या 24 तासातले कोरोनासंबंधीचे महत्त्वाचे अपडेट्स
फोटो स्रोत, Getty Images
·विमानात सोशल डिस्टन्सिंग नाही, सर्व सीट भरणार - हरदीप सिंह पुरी
·कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील
सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने
·राज्यात आज 2345 नव्या
रुग्णांची नोंद, एकूण संख्या 41 हजार 642 वर
·रेड झोन, कंटेनमेंट झोन
वगळता इतर भागात जिल्हांतर्गत एसटी बस उद्यापासून सुरू - परिवहन मंत्री अनिल परब
·एकट्या उत्तर प्रदेशात 15 लाखांहून अधिक स्थलांतरित दाखल
·ऑलिंपिक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता
·जगभरातल्या रुग्णसंख्येत एका दिवसात उच्चांकी
वाढ - WHO
बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर स्वागत
गुड मॉर्निंग. तुम्हाला जगभरातून कोरोना व्हायरससंबंधीचे
सर्व अपडेट्स देण्यासाठी आम्ही इथे हजर आहोत.
त्यामुळे हे पान तुम्ही नक्की शेअर करा आणि दिवसभरातल्या
ताज्या घडामोडींसाठी यावर लक्ष ठेवा.