जगभरातल्या रुग्णसंख्येत एका दिवसात उच्चांकी वाढ - WHO
कोरोना व्हायरसच्या साथीपासून जगाची इतक्यात सुटका होणार नसल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. गेल्या 24 तासांमध्ये जगभरात 1,06,000 नवीन रुग्णांचं निदान झालेलं आहे. आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वात मोठी रुग्णसंख्याआहे.
संपूर्ण जगातली कोव्हिड-19ची रुग्णसंख्या आता 50 लाखांच्या उंबरठ्यावर आहे.
एकीकडे श्रीमंत देश लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांत आहेत तर दुसरीकडे गरीब देशांमध्ये हा व्हायरस झपाट्याने पसरत असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे संचालक तेद्रॉस अॅडहॉनम गिब्रिएसुस यांनी जिनिव्हामध्ये म्हटलंय.
युरोपातल्या देशांनी संसर्गाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावं, असा इशारा युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कन्ट्रोलच्या संचालक डॉ. अँड्रिया अमॉन यांनी दिलाय.