महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 37 हजार 158 वर पोहोचली

राज्य सरकारने चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

लाईव्ह कव्हरेज

  1. मुंबईत CISF, CRPF दलाचे सैनिक दाखल

    मुंबईत CISF आणि CRPF दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. झोन क्रमांक 1, 3, 5, 6, 9 या ठिकाणी या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

    कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका मुंबई पोलिसांना बसला आहे. पोलिसांवरील वाढता ताण तसंच कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यानुसार या तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. ...तर अमेरिकेकडून WHOला मिळणारी मदत बंद होईल-ट्रंप

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    पुढील महिनाभरात जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनासंदर्भात ठोस माहिती मिळवून कार्यवाही केली नाही तर अमेरिकेतर्फे संघटनेला पुरवली जाणारी आर्थिक मदत हंगामी नव्हे तर कायमस्वरुपी बंद करण्यात येईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.

    कोरोनाचा उगम कुठे झाला, या विषाणूचा प्रसार कसा झाला, चीनची यामधली भूमिका काय आहे असे अनेक प्रश्न अमेरिकेने या पत्रात उपस्थित केले आहेत. महिन्याभरात कार्यवाही झाली नाही तर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचं सदस्यत्व सोडण्याचा विचार करू शकते असं ट्रंप यांनी सांगितलं.

    ट्रंप यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस घेब्रस्युस यांना पत्र लिहिलं आहे.

  3. ब्रेकिंग, यवतमाळजवळ चार स्थलांतरित कामगारांचा मृत्यू

    सोलापूरहून झारखंडकडे जाणाऱ्या चार स्थलांतरित कामगारांचा यवतमाळजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात 15 जण जखमी झाले. स्थलांतरित कामगार प्रवास करत असलेली बस आणि ट्रक यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला. मंगळवारी पहाटे हा अपघात झाला.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा लाखाच्या पुढे जाणार?

    आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 96 हजारच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 3029 जणांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारहून अधिक केसेस समोर येत आहेत. मंगळवारी कोरोनाग्रस्तांचा आकडा एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

    दरम्यान जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने तयार केलेल्या डॅशबोर्डनुसार, भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या याआधीच लाखाच्या पुढे गेली आहे. विद्यापीठाच्या मते हा आकडा 100,328 असा आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3,156 आहे.

  5. कोरोनाबाबत माहिती जमा करण्यात WHO अपयशी- अमेरिका

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप केला आहे.

    वर्ल्ड हेल्थ असेंब्लीदरम्यान अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेवर जोरदार टीका केली. कोरोना विषाणूसंदर्भात तपशीलवार माहिती जमा करण्यात जागतिक आरोग्य संघटना अपयशी ठरली असा आरोप अमेरिकेने केला. दुसरीकडे कोरोना विषाणूसंदर्भात आम्ही अत्यंत पारदर्शक आणि जबाबदारीने काम केल्याचा दावा चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षि जिनपिंग यांनी केला आहे.

    कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या मुद्यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

  6. ट्रंप घेत आहेत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन

    कोरोना, ट्रंप

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

    कोरोनापासून प्रतिबंध व्हावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दीड आठवड्यांपासून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेत आहेत.

    मलेरिया रुग्णांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या या औषधाची ट्रंप यांनी आधी खिल्लीही उडवली होती. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे कोरोनाविरुद्ध परिणामकारक ठरू शकतं असं शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालं आहे. त्यासंदर्भात क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत.

    सोमवारी ट्रंप यांना या औषधाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, "दीड आठवडा मी हे औषध घेतो आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे. तुम्ही मला पाहू शकता. या औषधाबाबत अनेकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे".

  7. कोरोना अपडेट्स

    गुड मॉर्निंग,

    लॉकडाऊन ४ सुरू झालं आहे. आपल्याला कोरोना विषाणूच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. घरीच राहा, तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या.

    कोरोनाबाबतच्या राज्यातील, देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सगळ्या अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

    सोमवारी राज्यात कोरोनाचे 2033 रुग्ण आढळले तर 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याचवेळी बरं झालेल्या 749 जणांना घरी सोडण्यात आलं.

    देशात 96 हजारहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर तीन हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    जगभरात 47.86 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर कोरोनामुळे 3.17 लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

    स्पेन आणि इटलीत गेल्या 24 तासात कोरोना मृत्यूंची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.

    अमेरिकेत 15 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर नव्वद हजारहन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.