लॉकडाऊन नसता तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली असती -उद्धव ठाकरे

लॉकडाऊन काढला तर आपली स्थिती इटलीसारखी झाली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लाईव्ह कव्हरेज

  1. सोपं, सुबोध लिहिणं हे अवघड काम, असं रत्नाकर मतकरी का म्हणायचे?

    रत्नाकर मतकरी

    फोटो स्रोत, Onkar Karambelkar / Facebook

    लहान मुलांसाठी, गावागावात, झोपडपट्टीतल्या मुलांपर्यंत नाटक जावं यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं मुंबईत निधन झालं. त्यांचा कोव्हिड चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.

  2. उर्वरित पेपरसाठी सीबीएसईने जाहीर केले परिपत्रक

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. 'आत्मनिर्भर भारत अभियाना'साठीचे 20 लाख कोटी रुपये नेमके कसे खर्च होणार?

  4. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आरोग्य मंत्रालयाचा नवा संदेश

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. रोगप्रतिकारशक्ती वाढवायला व्हिटामिन्स, हस्तमैथुन, ग्रीनटी: काय करावं, काय करू नये?

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

    ज्या लोकांचीप्रतिकारक्षमताचांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच कायतेआतापर्यंत लक्षात आलं आहे. याचंच भांडवल आता आपलीबाजारपेठसुद्धाकरू पाहात आहे.

    प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.

    अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात. 1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हासुद्धा अशाचप्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- अफवा आणि रोगप्रतिकारक्षमता

  6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

    कोरोना, उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, PRO

    फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदारकाची शपथ घेतली. विधिमंडळात झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह आठजणांनी आमदारकाची शपथ घेतली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषद सदस्य म्हणून निवडीचे प्रमाणपत्र विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी सुपुर्द केले. यावेळी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, मंत्री आदित्य ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

  7. आरोग्यमंत्री टोपे यांची केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

    कोरोना

    फोटो स्रोत, PRO

    फोटो कॅप्शन, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केला.

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्री के.शैलजा यांच्याशी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात चर्चा केली.

    केरळ राज्याला कोरोनवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. केरळ मध्ये केलेल्या उपाययोजना, राबवलेला लॉक डाऊन याबाबत टोपे यांनी शैलजा यांच्याशी बातचीत केली.

    केरळमध्ये सद्यस्थितीत कोरोनाच्या 601 केसेस असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे.

  8. लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठी काय करावं लागेल, काय नाही?

  9. कोरोना विषाणू आला कुठून? भारतानेही केली चौकशीची मागणी

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, कोरोनासंदर्भात चौकशीसाठी दबाव वाढू लागला आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भातील जिनेव्हात होणाऱ्या बैठकीत कोरोना विषाणूवरून वातावरण तापलं आहे.

    कोरोना विषाणूचा स्रोत काय? त्याचा संसर्ग झाला कसा? याप्रश्नी निष्पक्ष, स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हावी अशी मागणी अनेक देश करत आहे. भारतानेही या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. साधारणत: 60 देश या चौकशीसाठी आग्रही आहेत.

    वर्ल्ड हेल्थ असेंब्ली या संघटनेची 73वी दोनदिवसीय बैठक सोमवारपासून सुरू होत आहे. वुहान शहरातून कोरोना विषाणू जगभर कसा पसरला यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चौकशीची मागणी केली होती. यावरून अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेले होते. जगभरात कोरोनामुळे 310,000 जणांचा मृत्यू झाला आहे.

    कोरोनाच्या संसर्गाला रोखताना अनेक देशांची आरोग्यव्यवस्था अडचणीत सापडल्या आहेत. दरम्यान युरोपियन युनियननेही कोरोना विषाणूच्या प्रसारासंदर्भात चौकशीचा प्रस्ताव मांडला आहे.

    भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, बेलारूस, भूतान, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया, जिबूती, डोमिनिकन रिपब्लिकन, इक्वाडोर, अल सल्वाडोर, ग्वाटेमाला, गुयाना, आइलैंड, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, कझाकिस्तान, मलेशिया, मालदीव और मेक्सिको या देशांनी कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

  10. गुजरातमध्ये स्थलांतरित कामगारांची दगडफेक

    कोरोना

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, गुजरातमध्ये स्थलांतरित कामगारांनी दगडफेक केली.

    गुजरातमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांनी अहमदाबाद शहरात दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. गुजरात सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली. अहमदाबाद ते वस्त्रापूर रस्त्यावर हा प्रकार घडला.

    या भागात राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांना गावी परतायचं आहे पण तशी व्यवस्था न झाल्याने त्यांनी दगडफेक केल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

    दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. काही जणांना अटक करण्यात आली असं अहमदाबाद शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

    सोमवारी सकाळी अचानक शंभरहून अधिक कामगार रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. तिथून जात असलेल्या गाड्यांचंही नुकसान केलं.

  11. नवाझुद्दीन सिद्दीकी होम क्वारंटीनमध्ये

    कोरोना

    फोटो स्रोत, netflix

    फोटो कॅप्शन, नवाझुद्दीन सिद्दीकी

    अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्यांच्या कुटुंबीयांना 14 दिवस होम क्वारंटीन करण्यात आलं आहे.

    पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नवाझुद्दीन ईदच्या सणासाठी मुंबईहून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी पोहोचले होते. नवाझुद्दीन मुजफ्फरनगरजवळच्या सटे बुढानाचा आहे.

    सावधानतेचा उपाय म्हणून त्यांना होम क्वारंटीन करण्यात आलं आहे.

  12. आयुश उपचारपद्धतीसंदर्भात राज्य सरकारचा टास्क फोर्स

    कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं आवश्यक आहे. त्याकरता आयुश उपचार पद्धतीचा अवलंब कसा करता येईल यादृष्टीने राज्य सरकारने एका टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे.

    टास्क फोर्स सरकारला आयुश उपचार पद्धतीचा प्रत्यक्षात कशी उपयोगात आणता येईल यासंदर्भात शिफारशी देईल.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. वादग्रस्त आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं आता सक्तीचं नाही का?

  14. दक्षिण कोरियात फुटबॉल मॅचदरम्यान प्रेक्षकांऐवजी सेक्स डॉल?

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    दक्षिण कोरियात फुटबॉल लीगच्या मॅचेस पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. मात्र स्टेडियममध्ये प्रेक्षकांना परवानगी नाही. प्रेक्षक नसल्याची उणीव भरून काढण्यासाठी एफसी सोलने प्लॅस्टिकच्या बाहुल्यांना प्रेक्षक म्हणून बसवल्याचं स्पष्ट झालं आहे.

    खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी एफसी सोलने हा निर्णय घेतला होता. रविवारी ग्वांग्झु एफसी आणि एफसी सोल यांच्यात मॅच झाली. मात्र काही सोशल मीडिया युझर्सच्या म्हणण्यानुसार या प्लॅस्टिक बाहुल्या सेक्स डॉलप्रमाणे वाटत होत्या. एफसी सोलने याकरता माफी मागितली आहे.

    प्लॅस्टिक बाहुल्या बनवणारी कंपनी फॅशन उत्पादनं बनवणारी होती आणि हे अडल्ट म्हणजे प्रौढांसाठीचं प्रॉडक्ट नव्हतं असं एफसी सोलने म्हटलं आहे.

  15. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नाकर मतकरींना श्रद्धांजली

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली.

    रत्नाकर मतकरी यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दांत उद्धव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी यांचं निधन

  17. सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

    सोमवारी बाँबे स्टॉक एक्सचेंज उघडल्यापासून निर्देशांक सेन्सेक्समध्ये 800 अंकांपर्यंतची पडझड झाली.

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पॅकेजची पाच दिवस तपशीलवार घोषणा केल्यानंतर आज प्रथमच शेअर बाजार उघडले आहेत.

    Sensex

    फोटो स्रोत, Google

  18. कोरोना पॉडकास्ट: लॉकडाऊन ४ कसा असणार?

    महाराष्ट्रात लॉकडाऊन 4 कसं असणार?

    काय सुरु राहाणार तर काय होणार बंद?

    निर्मला सीतारमण यांनी मनरेगासाठी दिलं 40 हजार कोटींचं विशेष पॅकेज, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कोणाला नेमकं काय मिळणार?

    औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण का वाढतायत?

    वानखेडेवरून ट्विटरवर संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे. याबाबत सांगतायत विनायक आणि आशिष

  19. जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात बैठक

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात बैठक होत आहे.

    जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात निर्णय घेणाऱ्या वर्ल्ड हेल्थ एजन्सी या संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. जिनेव्हात होणाऱ्या या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे संलग्न देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील.

    या बैठकीत कोरोना विषाणूसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीपूर्वीच कोरोनाच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तैवानकडे निरीक्षकाची भूमिका देण्यात येण्याची चर्चा आहे. तैवानने कोरोनाला दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे. मात्र तैवान देश म्हणून संघटनेचा सदस्य नाही. तैवान आमचाच एक भाग असल्याचं चीननं म्हणणं आहे.

    जगातील 15 देशांनी तैवानला चर्चेत सहभागी करून घ्यावं अशी विनंती केली आहे. मात्र तरीही तैवानला बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही.

  20. देशात 24 तासात 5242 रुग्ण; 157 मृत्यू

    देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5242 नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात झालेली ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. या काळात कोरोनामुळे 157 जणांचा मृत्यू झाला.

    देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 96169 झाली आहे. बरं झालेल्या 36824 रुग्णांना घरी सोडण्यात आलं.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली.