लॉकडाऊन नसता तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढली असती -उद्धव ठाकरे
लॉकडाऊन काढला तर आपली स्थिती इटलीसारखी झाली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लाईव्ह कव्हरेज
मृतदेहापासूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठल्या सेवा सुरू? कुठल्या गोष्टी बंद?
मी जगण्याची शक्यता फक्त 30 टक्केच होती: जितेंद्र आव्हाडांची पहिली मुलाखत
आज दिवसभरात काय झालं?
नमस्कार,
आज दिवसभरात राज्यात नवे 2033 रुग्ण आढळले आहेत.
आज महाराष्ट्रात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला.
पावसाळ्यापुर्वी हे संकट संपलं पाहिजे असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज्यातल्या स्थलांतरित कामगारांसाठीही प्रयत्न करणार, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
आजचं कार्टून

कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं?
व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? | #सोपीगोष्ट 79 राज्यांतर्गत वाहतुकीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय केलं आवाहन? महाराष्ट्रात येणाऱ्या नवीन उद्योगांसाठी उद्धव ठाकरेंच्या विशेष घोषणा. कोरोनाचा लढा जितेंद्र आव्हाडांनी कसा जिंकला?
कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स'
व्हीडिओ कॅप्शन, कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स' महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार: उद्धव ठाकरे
औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या इतक्या झपाट्यानं का वाढली?
मुंबई महापालिकेने बददला कंटेनमेंट प्रोटोकॉल
आता सोसायटीत रुग्ण आढळल्यास संपूर्ण सोसायटी सील न करता रुग्ण आढळून आलेला मजला सील करण्यात येईल.
लक्षणं असलेल्या रुग्णांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये नेणार लक्षण नसलेल्यांना होम क्वॉरेंन्टाईन.
घरी स्वच्छतागृह आणि जागा असल्यास रुग्ण आढळून आल्यानंतर सोसायटीत निर्जंतुकीकरण करावं.
खासगी संस्था किंवा पालिकेकडून करून घ्यावं मजला किंवा विंग सील केल्यानंतर पालिका सोसायटीला पत्र देईल.
सोसायटीसाठी मार्गदर्शक सूचना घरकाम करणारे व्यक्ती, विक्रित्यांना परवानगी नाही सोसायटीने विक्रेत्यांनी टाय-अप करावं.
भाजी, मेडिकल या गोष्टी सोसायटीच्या बाउंड्रीपर्यंत आणून देतील लक्षणं नसलेले रुग्ण असल्यास त्यांना सर्व गोष्टी मिळतील याची खबरदारी घ्यावी.
राज्यात नवे 2033 रुग्ण
आज दिवसभरात राज्यात नवे 2033 रुग्ण आढळले आहेत.
आज महाराष्ट्रात 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचंय - मुख्यमंत्री
"कोरोनासोबत जगायला शिका म्हणतात. कसं जगायचं? घराबाहेर राहताना सावध राहा"
अजूनही कारण नसताना लोक बाहेर पडत आहेत. धार्मिक सणांना परवानगी नाही.
शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ शकत नाहीशाळांबद्दल विचार सुरू आहे.
हे संकट आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपवायचंयआता जनजीवन आता रुळावर आणायचंय.
मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे - उद्धव ठाकरे
जर लॉकडाऊन उठवलं तर अमेरिका, इटलीसारखी स्थिती होईल. रेड झोनमध्ये उद्योग सुरू केले आणि उद्योगांमध्ये साथ पसरली तर कामगार निघून जातील आणि सगळं बंद करावं लागेल.
राज्यातल्या स्थलांतरित कामगारांसाठीही प्रयत्न करणार.
5 लाख मजुरांना ट्रेन आणि बसने अत्यंत नियंत्रित पद्धतीने पाठवलं आहे.
कोरोना पॉडकास्ट आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर
"कोरोनावर अजूनही औषध नाही. धोका कायम आहे"
सगळ्या ठिकाणी ICU बेड्सची सोयही करत आहोत.
2.5 लाख बेड्स ऑक्सिजनसह तयार करत आहोत.
"भूमिपुत्रांनो पुढे या. आपला महाराष्ट्र आपल्या पायांवर उभा करू".
मोदीजींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करू.-मोदीजींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करू.
कामगारांची उणीव आहे कारण परराज्यांमधले अनेक मजूर गेले आहेत.
ग्रीन झोनमधल्या मराठी तरुणांनी आता घराबाहेर पडावं आणि उद्योगांना मनुष्यबळ पुरवावं.
रेड झोनमध्ये निर्बंध शिथिल करणं परवडणारं नाही.- मुख्यमंत्री
प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांना आमंत्रण दिलं आहे.
नव्या उद्योगांसाठी 40 हजार एकर जागा राखीव
नव्या उद्योगांना भाडेतत्वावर जागा देऊ.
ग्रीन झोनमधले निर्बंध आणखी शिथिल करत आहोत-मुख्यमंत्री
कुणालाही घरी डांबून ठेवण्यासारखी शिक्षा नाही. हा चक्रव्यूह कधी भेदणार, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही.
कोरोनाच्या वाढीमध्ये आपण गतिरोधक नक्कीच निर्माण केला आहे .
राज्यात 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत.
