You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

कोरोना: राज्यात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 33,053

आज महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 33,053 वर गेली आहे. आज राज्यात 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

लाईव्ह कव्हरेज

  1. अमेरिकेत 24 तासात 1,237 मृत्यू

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1,237 जणांचा मृत्यू झाला आहे.

  2. कोरोना अपडेट्स

    गुड मॉर्निंग मंडळी,

    कसे आहात? घरी आहात ना? तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. कोरोना संदर्भातील राज्यात, देश तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सगळे अपडेट्स तुम्हाला इथं वाचायला मिळतील.

    राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 30,706 एवढा झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 3,970 रुग्ण आढळले असून, 103 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 2,752 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 46 लाखाच्या जवळ पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या तीन लाखांच्या पलीकडे गेली आहे.