कोरोना: राज्यात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 33,053

आज महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 33,053 वर गेली आहे. आज राज्यात 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

लाईव्ह कव्हरेज

  1. चलनी नोटा छापून लोकांना वाटल्या म्हणजे आर्थिक प्रश्न सुटतील का?

  2. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  3. चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरू, काय बंद राहणार?

  4. लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठल्या सेवा सुरू? कुठल्या गोष्टी बंद?

  5. वादग्रस्त आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणं आता सक्तीचं नाही का?

  6. आजच्या ठळक घडामोडी

    आज महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण आढळले आहेत.

    राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 33,053 वर गेली आहे. आज राज्यात 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मनरेगासाठी 40 हजार कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवल्याचे सांगितले.

    आता महाराष्ट्रासह अनेक राज्यं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहेत.

    आजचे लाइव्ह पेज येथेच थांबवत आहोत.

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

  7. चीन 10 दिवसात करणार 1 कोटी लोकांची कोरोना चाचणी

  8. तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीनेच शरीरावर हल्ला केला तर?

  9. रोगप्रतिकारशक्ती वाढवायला व्हिटामिन्स, हस्तमैथुन, ग्रीनटी: काय करावं, काय करू नये?, जारिया गोवेट, बीबीसी फ्युचर

    Vegetables

    फोटो स्रोत, Getty Images

    ज्या लोकांचीप्रतिकारक्षमताचांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच कायतेआतापर्यंत लक्षात आलं आहे. याचंच भांडवल आता आपलीबाजारपेठसुद्धाकरू पाहात आहे.

    प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.

    अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात. 1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हासुद्धा अशाचप्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- अफवा आणि रोगप्रतिकारक्षमता

  10. शिवसेनेत अलगीकरण कक्षासाठी मैदानं वापरण्यावरून मतभेद

  11. लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

    Food

    फोटो स्रोत, Getty Images

    लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.

    लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.

    तुम्हीसुद्धा सध्या तेलकट, चमचमीत पदार्थ खात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा- लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

  12. कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं?

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस कधी नष्ट होणार नाही तर मग जगायचं कसं? | #सोपीगोष्ट 79
  13. ब्रेकिंग, राज्यात कोरोनाचे 2347 नवे रुग्ण

    आज महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 33,053 वर गेली आहे. आज राज्यात 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  14. #CoronaPodcast 59: महाराष्ट्रात लॉकडाऊन 4 कसं असणार? काय सुरु राहाणार तर काय होणार बंद? निर्मला सीतारमण यांनी मनरेगासाठी दिलं 40 हजार कोटींचं विशेष पॅकेज, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत कोणाला नेमकं काय मिळणार? औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण का वाढतायत?

  15. कोरोना व्हायरसनंतर जगभरात हुकुमशाही अस्तित्वात येईल का?

    गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणुच्या संकटात सापडलेलं जग पुढच्या सहा महिन्यांनंतर, वर्षभरानंतर, दहा वर्षांनंतर आजच्या तुलनेत कसं असेल?

    माझ्या प्रियजनांसाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? माझ्या कुटुंबीयांचं, मित्रमंडळींचं काय होणार? या विचारांनी मला रात्र-रात्र झोप येत नाही.

    माझ्या मनात विचार येतो, माझ्या नोकरीचं काय होणार? खरंतर मी त्या काही मोजक्या नशीबवान लोकांपैकी एक आहे ज्यांना उत्तम पगार आहे, जे ऑफिसच्या बाहेर राहूनही काम करू शकतात.

    मी इथे यूकेमध्ये बसून लिहितोय. इथे माझ्या अनेक सेल्फ-एम्प्लॉईड मित्रांना पुढचे अनेक महिने पैसे मिळणार नाही, याची चिंता सतावते आहे. माझ्या अनेक मित्रांची नोकरी गेली आहे.

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

  16. कोरोना संकटात भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना संकटात भारतीय मजूर अजूनही अडकलेत आखाती देशांमध्ये
  17. लॉकडाऊन 4 मध्ये प्रवेश करताना भारताने जगाकडून काय शिकावं?

  18. Lockdown 4 साठी केंद्रीय गृह मंत्रालयाची नवी नियमावली

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    गृहमंत्रालयाने पाठवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारपुढील सेवा बंद राहातील :देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत एअर अॅंब्युलन्स आणि सुरक्षेसंबंधी हवाई वाहतूक या सेवा वगळता इतर सर्व हवाई वाहतूक बंद राहील.मेट्रो रेल्वे सेवा बंद राहील.शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक/प्रशिक्षण/कोचिंग संस्था इत्यादी बंद राहतील. मात्र, ऑनलाईन लर्निंगला प्रोत्साहन दिलं जाईल आणि ते सुरूही राहील.हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील. मात्र, आरोग्य, पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना राहण्यासाठी असलेले हॉटेल सुरू राहतील, तसेच, क्वारंटाईनसाठीचे आणि लॉकडाऊनमुळं अडकलेल्या पर्यटकांसाठीचे हॉटेल सुरू राहतील. होम डिलिव्हरी करण्यासाठी रेस्टॉरंट सुरू राहतील.चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, मनोरंजन उद्यानं, बार, सभागृह इत्यादी ठिकाणंही बंद राहतील.सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, जिथं गर्दीची शक्यता आहे, अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.सर्व धार्मिक ठिकाणं बंद राहतील.

  19. केंद्राच्या पॅकेजमुळे गरजूंना तातडीची मदत नाही- अशोक चव्हाण

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. 8 कोटी कामगार परतले नाही तर मुंबई, दिल्ली ठप्प होईल का?