मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नियमांचं पालन करावं - राज्यपालांचं पत्र
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नियमांचं पालन करावं, असा असं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
महानगरपालिकेच्या नोटिफिकेशन संदर्भात मागितलेली माहिती मिळवण्यासाठी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी कलम 167 चा वापर करण्याचा निर्णय घेतला.
मुख्य सचिवांनी संबंधित माहिती उपलब्ध करुन न दिल्याने राज्यपालानं एक पत्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पाठवले आहे.
मुख्य़मंत्री घटनेचे पालन करतील असा मला विश्वास वाटतो असं राज्यपालांनी या पत्रात लिहिलं आहे.