राज्यातील रुग्णांची संख्या 25,922 च्यावर, दिवसभरात 54 मृत्यू

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख कोटी रुपयांची कर्ज योजना जाहीर केली.

लाईव्ह कव्हरेज

  1. निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद - या ठिकाणी पाहा लाइव्ह

    आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सकल राष्ट्रीय उत्पनाच्या 10 टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसंच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे.

    अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासंदर्भात विस्तृत माहिती देतील, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या घोषणेच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  2. प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 11 सूचना

    कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 11 सूचना दिल्या आहेत.

    लोनचा हप्ता घेऊ नये, विज बिल माफ करावं, शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते माफ करावे यांसारख्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  3. कामगार कायदे बदलून उद्योगांना चालना मिळणार? #सोपीगोष्ट 76

  4. परदेशात अडकलेल्या 30 हजार भारतीयांना परत आणण्याची तयारी

    लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या सुमारे 30 हजार भारतीयांना परत आणण्याची तयारी करण्यात आली आहे.

    वंदे भारत मिशनच्या पहिल्या टप्प्यात 64 विमानांतून 14800 भारतीयांना परत आणण्याचं नियोजन होतं. यापैकी 8500 लोकांना परत आणण्यात आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यात हा आकडा दुपटीने वाढवण्यात आला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. 'आई आजूबाजूला कुठेच नाहीये, मी शोकही करू शकले नाही'

  6. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॅन्टीनमध्ये आता स्वदेशीचा मंत्र

    1 जून, 2020 पासून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कँटीनमध्ये देशात तयार झालेल्या वस्तूंचीच विक्री होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे १० लाख कर्मचाऱ्यांचे मिळून 50 लाख कुटुंबीय, नातेवाईक या स्वदेशी वस्तूंचा उपयोग करतील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत संकल्पनेची मांडणी केली होती. स्वदेशी वस्तूंचा उपयोग करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं होतं. त्या अनुषंगाने शहा यांनी गृह मंत्रालयाच्या या निर्णयाची माहिती दिली.

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    X पोस्टवरून पुढे जा, 2

    X पोस्ट समाप्त, 2

  7. परदेशात अडकलेले आणखी भारतीय मायदेशी परतणार

    वंदे भारत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 16 ते 22 मे या कालावधीत परदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परत येतील.

    अर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, बेलारुस, कॅनडा, फ्रान्स, जॉर्जिया, जर्मनी, इंडोनेशिया, आयर्लंड, इटली, जपान, कझाकिस्तान, किर्झगिस्तान, नेपाळ, नायजेरिया, रशिया, ताजिकिस्तान, थायलंड आणि युक्रेन या देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणलं जाईल असं हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. महाराष्ट्राची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल केंद्राकडे कुमकेसाठी विनंती

    "राज्यात कोरोनामुळे पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. याखेरीज रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली", अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

    ते पुढे म्हणाले, "राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात", अशी मागणी केली असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. ट्वीटरने दिला कर्मचाऱ्यांना सदैव वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ट्वीटर

    ट्वीटरने आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होमचा पर्याय देऊ केला आहे. तुम्ही फिट असाल आणि सर्वोत्तम काम करू शकत असाल तर वर्क फ्रॉम होम सुरू ठेवू शकता असं ट्वीटरने म्हटलं आहे. ट्वीटरच्या या निर्णयाची टेक्नॉलॉजी तसंच उद्योगविश्वात चांगलीच चर्चा आहे.

    टेक्नॉलॉजीची साथ असेल तर घरूनही काम होऊ शकतं हे कोरोना काळात सिद्ध होतं आहे असं काहींचं म्हणणं आहे. काहींच्या मते बॉसला समोरासमोर भेटण्यावाचून टाळायचं असेल तर वर्क फ्रॉम होम उपयुक्त पर्याय आहे. काहींनी वर्क फ्रॉम होममध्ये मान मोडून काम करत असल्याचं म्हटलं आहे. वर्क फ्रॉम होम अधिक दमवणारं असतं असंही काहींचं म्हणणं आहे.

  10. सिगारेट पिणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, सिगारेट

    अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, सिगारेट पिणाऱ्या किंवा कधीकाळी सिगारेट पिणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

    सिगारेट पिणाऱ्या मंडळींचा कोरोनामुळे मृत्यूही होऊ शकतो असं या अभ्यासात म्हटलं आहे.

    युसीएसएफच्या सेंटर फॉर टोबॅको कंट्रोल रिसर्च अँड एज्युकेशनचे प्राध्यापक स्टॅनन ग्लांज यांच्या मते, सिगारेट पिण्यामुळे कोरोनाची जोखीम वाढते.

    या संशोधनासाठी चीन, दक्षिण कोरिया तसंच अमेरिकेतून रिव्ह्यूसाठी आलेल्या 19 रिसर्च पेपर्सचा सखोल अभ्यास करण्यात आला. सिगारेट पिणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 30 टक्के असते. सिगारेट न ओढणाऱ्या लोकांमध्ये हे प्रमाण घटून 17 टक्क्यांपर्यंत जातं.

  11. मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमुळे अर्थव्यवस्था किती 'आत्मनिर्भर' होणार?

  12. मुंबईहून निघालेली ट्रेन दिल्लीत दाखल

    लॉकडाऊन काळात प्रायोगिक तत्वावर काही ट्रेन्स सुरू करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मंगळवारी मुंबई सेंट्रल इथून राजधानी दिल्लीकरता ट्रेन सोडण्यात आलेली ट्रेन दिल्लीत दाखल झाली.

    सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करून प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला होता. ट्रेन सुरू झाल्यामुळे घरी पोहोचू शकलो असं अनेक प्रवाशांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. 113 वर्षांच्या आजीने अशी केली कोरोनावर मात

  14. 24 तासात कोरोनाचे 3525 नवे रुग्ण; 122 जणांचा मृत्यू

    गेल्या 24 तासात, देशात कोरोनाच्या 3525 रुग्णांची नोंद झाली तर 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

    देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 74,281 इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 2415 जणांचा मृत्यू झाला आहे. 24,386 लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. अमेरिका चीनवर बंदी आणणार?

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

    AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी अशा कायद्याची मागणी केली. यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या चीनवर बंदी आणण्याच्या भूमिकेला बळ मिळू शकतं.

    "कोरोनाच्या संकटासाठी चीन कारणीभूत आहे. कोरोना पसरवण्यात त्यांचा वाटा आहे. चीनने कोरोना संकटाविषयी जगाला सतर्क केलं नाही आणि म्हणूनच जगभरात कोरोनाचा संसर्ग झाला", असं खासदार जिम इन्होफ म्हणाले.

    चीनवरील बंदीच्या प्रस्तावित कायद्याचं नाव 'कोविड-19 अकाउंटिबिलिटी बिल' असं आहे. प्रस्तावित कायद्यानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांना 60 दिवसांच्या आत चीनने कोरोनासंदर्भात सगळी माहिती दिली आहे असं सभागृहाला सांगावं लागेल. त्यानुसार संयुक्त राष्ट्र तसंच जागतिक आरोग्य संघटना चौकशी सुरू करू शकते.

    चीनने वेट मार्केट अर्थात पशुबाजार बंद केले आहेत असं स्पष्ट व्हायला हवं. हाँगकाँगमधील लोकशाही समर्थकांची सुटका करायला हवी. यापैकी काहीही सिद्ध होऊ शकलं नाही तर ट्रंप यांना चीनवर विविध स्वरुपाची बंदी घालण्याचा अधिकार प्राप्त होईल. संपत्ती गोठवणे, प्रवासावर बंदी तसंच चीनच्या कंपन्यांना अमेरिकच्या मार्केटमध्ये बंदी अशा पद्धतीने कारवाई होऊ शकते.

  16. जगभरात 4,247,709 जणांना कोरोना

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोनामुळे 2 लाख 90 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4,247,709 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

    अनेक देशांमध्ये पुरेशा प्रमाणात टेस्टिंग झालेलं नाही तसंच अनेक ठिकाणी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो असंही विद्यापीठाने म्हटलं आहे.

  17. लसीबाबत खात्री नाही-अँथनी फाऊची

    कोरोना, अमेरिका

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ट्रंप प्रशासनाला लॉकडाऊन शिथिल करायचा आहे.

    अमेरिकेत कोरोनाचा बीमोड करू शकेल अशी लस तयार करण्याचं काम सुरू आहे. मात्र ही लस परिणामकारक ठरेलच याची खात्री देता येणार नाही असं अमेरिकेतील साथीच्या रोगांचे जाणकार डॉ. अँथनी फाऊची यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान लॉकडाऊन शिथिल करण्यासंदर्भात त्यांनी इशारा दिला आहे. लॉकडाऊन शिथिल करण्याची घाई केल्याल कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण 82,000 पेक्षा जास्त असेल असं त्यांनी म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यामुळे हुशारीने या विषाणूचा सामना करावा लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.

    यूनिवर्सिटी ऑफ वॉशिंगटन इंस्टिट्यूट फोर हेल्थ मेट्रिक्स एंड इवैल्युशन (आईएचएमई) का कहना है कि अमरीका में कोरोना वायरस के संक्रमण से अगस्त महीने की शुरुआत तक एक लाख 47 हज़ार से ज़्यादा लोगों की मौत हो सकती है.

    युनिर्व्हिसिटी ऑफ वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन संस्थेने अमेरिकेत कोरोनामुळे ऑगस्टपर्यंत एक लाख 47 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो असं अनुमान वर्तवलं आहे. मंगळवारी हा अभ्यास प्रकाशित झाला. लॉकडाऊन शिथिल करणं धोकादायक ठरू शकतं असंही या अभ्यासात म्हटलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 82,246 जणांचा मृत्यू झाला आहे.

  18. सामनातून राज्य सरकारवर टीका, शिवसेनेला नेमकं काय साध्य करायचं आहे?

  19. मलेशियाहून मुंबईत विमान दाखल

    वंदे भारत अभियानाअंतर्गत मलेशियात अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणारं विमान मुंबईत दाखल झालं.

    एअर इंडियाच्या AI-337 या विमानाने 225 प्रवाशांना मुंबईत आणलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. कोरोना अपडेट्स

    नमस्कार मंडळी,

    गुड मॉर्निंग. घरीच आहात ना? कोरोनाला हरवण्यासाठी घरी थांबणं आवश्यक आहे. तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या. कोरोनाबाबतच्या राज्यातल्या, देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जनतेशी संवाद साधला. 18 मे पासून लॉकडाऊन 4 लागू होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र आधीच्या लॉकडाऊनच्या तुलनेत, याचे नियम वेगळे असतील आणि त्याची माहिती 18 तारखेआधी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा त्यांनी केली.

    दरम्यान देशभरात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या 70,756 एवढी झाली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 2293 जणांचा मृत्यू झाला आहे.

    ब्रिटनमध्ये मंगळवारी कोरोनामुळे 627 तर फ्रान्समध्ये 348 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृत्यू यादीत अमेरिका, ब्रिटन, इटलीनंतर आता फ्रान्समध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. फ्रान्समध्ये आतापर्यंत 26,991 जणांचा मृत्यू झाला आहे.