निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद - या ठिकाणी पाहा लाइव्ह
आत्मनिर्भर भारत' या अभियानासाठी पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज सकल राष्ट्रीय उत्पनाच्या 10 टक्के असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसंच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासंदर्भात विस्तृत माहिती देतील, असं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या घोषणेच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण आज पत्रकार परिषद घेणार आहेत.