आजच्या प्रमुख घडामोडींचा थोडक्यात आढावा
नमस्कार मंडळी,
बीबीसी मराठीचं कोरोना व्हायरसबाबतचं आजचं लाईव्ह कव्हरेज इथेच थांबवत आहोत.
जाता जाता एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर -
- लघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणार - निर्मला सीतारामन
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची कुमक पाठवा, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी
- आज राज्यात 1495 नवे कोरोनाग्रस्त, तर 54 रुग्णांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 25922 वर
- गावांतील ग्रामसभांना तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
- कोरोना व्हायरसची लस लोकांपर्यंत पोहोचण्यास लागू शकतात अडीच वर्षं- WHO
कोरोना व्हायरससंदर्भात प्रत्येक अपडेटसाठी बीबीसी मराठीच्या वेबसाईटला उद्या पुन्हा भेट द्या.
शुभरात्री, धन्यवाद.

फोटो स्रोत, Getty Images




