नफेखोरी करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करा - मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मनपा आयुक्तांना पत्र

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोना व्हायरसनंतर जगभरात हुकूमशाही अस्तित्वात येईल का?

    गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणुच्या संकटात सापडलेलं जग पुढच्या सहा महिन्यांनंतर, वर्षभरानंतर, दहा वर्षांनंतर आजच्या तुलनेत कसं असेल? माझ्या प्रियजनांसाठी भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? माझ्या कुटुंबीयांचं, मित्रमंडळींचं काय होणार? या विचारांनी मला रात्र-रात्र झोप येत नाही.

    माझ्या मनात विचार येतो, माझ्या नोकरीचं काय होणार? खरंतर मी त्या काही मोजक्या नशीबवान लोकांपैकी एक आहे ज्यांना उत्तम पगार आहे, जे ऑफिसच्या बाहेर राहूनही काम करू शकतात. मी इथे यूकेमध्ये बसून लिहितोय. इथे माझ्या अनेक सेल्फ-एम्प्लॉईड मित्रांना पुढचे अनेक महिने पैसे मिळणार नाही, याची चिंता सतावते आहे. माझ्या अनेक मित्रांची नोकरी गेली आहे.

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

  2. तुर्कस्तानातले डाॅक्टर 24 दिवस घरीच गेले नाहीत

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना योद्धे : टर्कीतले डॉक्टर 24 दिवस घरीही नाही गेले
  3. लोकांना उठाबशा काढायला लावणं बेकायदेशीर - हायकोर्ट #5मोठ्याबातम्या

  4. गेल्या 24 तासांमध्ये 95 मृत्युमुखी

    देशात गेल्या 24 तासांमध्ये 65 जणांचे कोव्हिडमुळे प्राण गेले आहेत. या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 3320 नवे रुग्ण आढळले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. हे 98 वर्षांचे डॉक्टर आजोबा कोरोनाग्रस्तांची काळजी घेतात

  6. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातला बेरोजगाराची दर 23 टक्क्यांवर पोहोचला

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारतातला बेरोजगाराची दर 23 टक्क्यांवर पोहोचला
  7. हे नियम लक्षात आहेत ना?

    Corona
  8. दारूच्या दुकानाबाहेर रांगेत नंबर लावण्यासाठी नवी शक्कल

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

    लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं. ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही.

    लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे. त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे. घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.

    तुम्हीसुद्धा सध्या तेलकट, चमचमीत पदार्थ खात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा- लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

  10. BBC EXCLUSIVE : इराणमधली खासगी विमान कंपनी अशी ठरली कोरोना उद्रेकाला कारणीभूत #CornaVirus

  11. 177 भारतीय परतले

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवाण परदेशींची बदली, इक्बाल चहल नवे आयुक्त, अंतिम परीक्षा वगळता महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा रद्द

    #CoronaPodcast : महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढण्याचे उद्धव ठाकरेंनी संकेत दिलेत का? मुंबई लष्कराच्या ताब्यात नाही पण पोलिसांवरील ताण कमी करायला केंद्रीय यंत्रणांची मदत घेणार. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवाण परदेशींची बदली, इक्बाल चहल नवे आयुक्त, अंतिम परीक्षा वगळता महाविद्यालयाच्या सर्व परीक्षा रद्द. औरंगाबादजवळ १५ मजुरांचा मालगाडीखाली येऊन मृत्यू. याबद्दल सांगतायत विनायक आणि आशिष

  13. औरंगाबादमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांचे देह विशेष रेल्वेने रवाना

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. घरातलं अन्न संपलं म्हणून तिच्यावर मुलांसाठी दगड शिजवण्याची वेळ आली

    CAROLINE MWAWASI/TUKO

    फोटो स्रोत, CAROLINE MWAWASI/TUKO

    कोरोना व्हायरसमुळे केनियातल्या एका महिलेवर अतिशय बिकट प्रसंग ओढवला.

    मुलांना खायला घालण्यासाठी काहीच नसल्यामुळे या महिलेला मुलांच्या समाधानासाठी दगडं शिजवण्याचं नाटक करावं लागलं. आठ मुलांची आई असलेल्या या महिलेचं नाव आहे पेनिना बहाती कित्साओ.

    पेनिना निरक्षर आणि विधवा आहेत. त्या लोकांचे कपडे धुतात आणि त्याद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पण, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे त्यांचं काम थांबलं.

    पेनिना यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली की मुलांना खाऊ घालायला त्यांच्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे मग मुलांच्या समाधानासाठी त्यांनी दगडं शिजवायला सुरुवात केली.

    CAROLINE MWAWASI/TUKO

    फोटो स्रोत, CAROLINE MWAWASI/TUKO

  15. दारू विक्री, सलून, बांधकाम - कोणत्या झोनमध्ये काय सुरू राहणार?

    Mumbai corona hair cut

    फोटो स्रोत, Getty Images

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने राज्यात नेमक्या कोणत्या गोष्टी कुठे सुरू राहतील यासंदर्भात सरकारने नियम जाहीर केले आहेत.

    नागरिकांना रोजच्या जगण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भाजीपाला, दूध, किराणा यांचा पुरवठा ग्रीन, ऑरेंज, रेड, कंटेनमेंट तसंच महापालिका क्षेत्रात सुरू राहील. सर्व झोनमध्ये औषधांची दुकानं, दवाखाने नागरिकांसाठी सुरू राहतील.

    ग्रीन झोनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने तिथे बऱ्याच आस्थापनांना कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    या संदर्भात विस्तृत माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा-

  16. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या 1,089 नव्या रुग्णांची नोंद

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

    नमस्कार,

    गेला महिनाभर आपण Live Page च्या माध्यमातून महाराष्ट्र, देश आणि जगातील घडमोडी जाणून घेेत आहोत.

    1.महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या 1,089 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे शुक्रवारी 37 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 19,063 एवढी झाली आहे.

    2.भारतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,390 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 56,342 वर पोहोचली आहे.

    3.जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर आतापर्यंत 2 लाख 70 हजार जणांचा मृत्यू झालाआहे.

    4."मुंबई लष्कराच्या ताब्यात देणार ही मुंबईत अफवा पसरवली जातआहे. पण, सगळी सरकारी यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. केंद्र सरकारला विनंती करतो की,पोलिसांना विश्रांती देण्यासाठी अधिकचं मनुष्यबळ हवं आहे. त्यासाठी केंद्राकडे मनुष्यबळाची मागणी करणार आहोत." – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

    5.एप्रिल महिन्यात अमेरिकेतल्या 2.05 कोटी नागरिकांना नोकरी गमवावी लागली आहे.

    6.CBSEच्या 10 वी आणि12 वीच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान होणार आहे.

    7."अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता फक्त थर्ड इअरची अंतिम परीक्षा होणारआहे. इतरांच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्यात येईल." - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री

    शुक्रवारी रात्रीपर्यंत घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.