You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नफेखोरी करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करा - मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मनपा आयुक्तांना पत्र
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
इक्बाल चहल यांनी दिली नायर रुग्णालयाला भेट
मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त इक्बाल चहल यांनी नायर रुग्णालयाला भेट देऊन उपचारांबद्दल माहिती घेतली.
कोरोनामुळे भारतीयांचं अमेरिकेत स्थायिक होण्याचं स्वप्नं भंगणार का?
गुजरातमध्ये कामगारांची पुन्हा निदर्शने
आपापल्या राज्यात पाठवण्याची सोय करा अशी मागणी घेऊन गुजरातमधील कामगार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले.
कोव्हिड-19 वर हे औषध उपयोगी पडेल?
कोरोना व्हायरसची लागण झाली असेल तर या औषधानं तुम्ही बरे होऊ शकाल असा ठोस पुरावा असल्याचं मत अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
रेमडेसिवियर या औषधाची चाचणी घेतल्यानंतर या औषधामुळे कोरोनाची लक्षणं दिसण्याचा काळ 15 दिवसांच्या ऐवजी 11 दिवसांवर आल्याचं दिसून आलं आहे.
अजूनही याची सर्व माहिती प्रसिद्ध झाली नसली तरी या औषधं कमालीच उपयोगी असल्याचं दिसून आलं आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र हे काही जादूचं औषध किंवा रामबाण उपाय असल्याचं मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
याबदद्ल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
'ही' गोळी निर्णायक ठरू शकते का असा प्रश्न विचारला जात आहे
R0 म्हणजे काय? कोरोना लॉकडाऊन उठवण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा का?, जेम्स गॅलागर, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी एक आकडा अतिशय महत्त्वाचा आहे.
जगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत.
हा आकडा आहे - बेसिक रिप्रॉडक्शन नंबर. म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा. याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट (0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- R0 म्हणजे काय?
कोरोनाचं जपानमधील वास्तव
कोरोनाग्रस्तांच्या संख्येत जून-जुलैमध्ये खूप वाढ होईल का?
ब्रेकिंग, भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 3.3 टक्के
भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 3.3 टक्के असल्याचं तसेच बरे होण्याचं प्रमाण 29.9 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
किरीट सोमय्यांची सरकारवर टीका
सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 5500 डाॅक्टरांनी सरकारकडे केली नोंदणी
- सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 5500 डाॅक्टरांनी सरकारकडे केली नोंदणी
- कोव्हिड-१९ वाॅर्डमध्ये काम करण्यासाठी डाॅक्टर आले
- पुढे या डाॅक्टरांचं वर्गीकरण केल्यानंतर त्यांना ड्यूटी दिली जाईल
- दोन-तीन दिवसात डाॅक्टर सरकारी आणि पालिका रुग्णालयात ड्यूटी जाॅइन करतील ,असं डाॅ तात्याराव लहाने (अतिरिक्त संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालय) यांनी सांगितलं आहे.
'या' 6 ठिकाणी होतायत कोरोना व्हायरसवरच्या लशीच्या चाचण्या
महाराष्ट्रात 714 पोलिसांना कोरोनाची लागण
आयुष्य 'नॉर्मल' करण्यासाठी वेगवेगळे देश काय करत आहेत?
कोरोना व्हायरसमुळे सध्या जगातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. काही देशांमध्ये हा लॉकडाऊन उठवण्याची तयारी करत आहेत, तर अनेक देशांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतलीय.
लॉकडाऊन उठवताना नेमकं नॉमर्ल आय़ुष्याकडे कसं जायचं यासाठीचा एक ठराविक फॉर्म्युला कोणत्याही देशाकडे नाही.
पण यासाठी अनेक देशांमध्ये लढवण्यात काही भन्नाट कल्पना लढवण्यात आल्या आहेत.
त्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. -आयुष्य 'नॉर्मल' करण्यासाठी वेगवेगळे देश काय करत आहेत?
सीरिया, इराणमध्ये विस्थापितांच्या छावणीत कसं पाळायचं सोशल डिस्टन्सिंग?
ब्रेकिंग, गेल्या 24 तासांमध्ये 95 मृत्युमुखी
देशात गेल्या 24 तासांमध्ये 95 जणांचे कोव्हिडमुळे प्राण गेले आहेत. या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 3320 नवे रुग्ण आढळले आहेत.
दिल्लीजवळील परिसरामध्ये कडक तपासणी
दिल्ली गाझीपूर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या गाड्यांची कडक तपासणी केली जात असून. वाहनचालकांची ओळखपत्रेही तपासली जात आहेत.
कोरोना व्हायरससंबंधी संशोधन करणाऱ्या चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या एका चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. या मृत्यूवरून जगभरात 'कॉन्स्पिरसी थेअरीज' म्हणजेच षड् यंत्राच्या कहाण्यांचं पेव फुटलं आहे.
37 वर्षांचे प्रा. बिंग ली शनिवारी (2 मे) अमेरिकेतल्या पीट्सबर्ग शहरातल्या आपल्या घरात मृतावस्थेत आढळले. ते युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्गमधल्या स्कूल ऑफ मेडिसीन विभागात सहप्राध्यापक होते.
प्रा. बिंग ली कोव्हिड-19 आजारासंबंधी एक महत्त्वाचं संशोधन पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, असं त्यांच्या सहकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा खून झाल्याची बातमी आली. या प्रकरणात दोघांचा जीव गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. एकाची हत्या झाली तर दुसऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.-कोरोना व्हायरससंबंधी संशोधन करणाऱ्या चिनी प्राध्यापकाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू
इस्रायलने शोधलेल्या 'अँटीबॉडी' काय आहेत?