नफेखोरी करणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करा - मुंबईच्या पालकमंत्र्यांचं मनपा आयुक्तांना पत्र

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. दिवसभरात काय घडलं?

    कोरोना,

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

    नमस्कार मंडळी,

    कोरोनासंदर्भातील महाराष्ट्र, भारत तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अपडेट्स बीबीसी मराठी दररोज लाईव्ह पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतं. आजही आपण महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेतल्या. आता आपली भेट उद्या होईल. पण त्यापूर्वी आज दिवसभरात काय घडलं यावर एक नजर टाकूया.

    1.राज्यात 1165 रुग्णांची नोंद झाली तर 48 जणांचा मृत्यू झाला. 330 रुग्ण बरे होऊन घरी परतले.राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 20,228 इतका झाला आहे.

    2.मुंबईत कंटेनमेंट झोन्सची संख्या 2646 एवढी झाली आहे .मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी धारावीला भेट दिली.

    3.अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे. प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत निर्णय घेऊन नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

    4. राज्यात विविध शहरं तसंच गावांमध्ये अडकलेल्या माणसांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरू होईल.

    5. नफेखोर करणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.

    6. बांगलादेशात अडकलेल्या भारतीयांना घेऊन विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं. या विमानात 129 प्रवासी होते.

    शुभ रात्री, उद्या भेटूयात.

  3. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या चाळीस लाखांपर्यंत

    जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली असून, 2 लाख 75 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

    अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 12 लाख इतकी आहे. आतापर्यंत 187 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी दिली आहे.

  4. मुंबईत कंटेनमेंट झोन्स वाढले

    कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने मुंबई शहरात कंटेनमेंट झोन्सची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबईत आता 2646 कंटेनमेंट झोन आहेत.

    राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत 12864 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 489 जणांचा मृत्यू झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. मुंबई लोकलमध्ये पूर्वीसारखा गर्दीतून प्रवास होणं कठीण – नितीन गडकरी

  6. कोरोनामुळे आधीच आरोग्याला धोका, त्यात अंधश्रद्धांचा अडथळा

  7. राज्यात 1165 रुग्णांची नोंद; 48 मृत्यू

    राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शनिवारी राज्यात 1165 रुग्णांची नोंद झाली तर 48 जणांचा मृत्यू झाला. 330 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

    राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 20,228 इतका झाला आहे.

    शनिवारी झालेल्या मृत्यूंपैकी, मुंबईत 27, पुण्यात 9, मालेगाव शहरात 8, पुणे जिल्ह्यात 1, अकोला शहरात 1, नांदेड शहरात 1 आणि अमरावती शहरात एकाचा मृत्यू झाला आहे.

    48 मृतांपैकी 60 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या रुग्णांची संख्या 27 आहे तर 18 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आहेत. 3 जण 40 वर्षांखालील आहेत.

    रुग्णांना असणाऱ्या आजाराबाबत नऊ जणांसंदर्भात माहिती उपलब्ध नाही. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांमध्ये म्हणजेच 72 टक्के रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 779 जणांचा मृत्यू झाला आहे.

  8. #CoronaPodcast: आज काय घडलं?

    भारतात आणि महाराष्ट्रात आकडे का वाढतायत? भारतात पीक कधी येऊ शकतो? हा पीक कसा ठरवला जातो? एसटीनं घरी जाण्यासाठी काय काय करावं लागेल? याबद्दलची माहिती जाणून घ्या बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पॉडकास्टमध्ये

  9. लॉकडाऊनमध्ये एसटीने प्रवास करण्यासाठी हे करावं लागणार

    राज्यातील विविध जिल्ह्यात लाॅकडाऊनमुळे ठिकाणी अडकलेले लोक, प्रवासी, वैद्यकीय कारणांसाठी गेल्यामुळे अडकलेले लोकांसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एसटी बसने प्रवास करण्यासाठी काय करावं लागणार सांगताहेत मंत्री अनिल परब.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  10. 'नफेखोरी करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा'

    नफेखोरी करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा असं पत्र मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिलं आहे.

    जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेले असताना काही रुग्णालयाकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.

    अस्लम शेख यांनी पत्रात लिहिलं आहे की, लोकहिताचा विचार करुन शासनाने ३० एप्रिल २०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असताना काही रुग्णालये शासनाच्या अधिसूचनेला केराची टोपली दाखवत आहेत. दिवसेंदिवस अशा स्वरुपाच्या तक्रांरीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे तफेखोरी करणाऱ्या या रुग्णालयांवर कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

    खाजगी रुगणालयांनी मृत रुग्णांचे पार्थिव बिलासाठी अडविण्यात येऊ नये, रुग्णालयाचे दर वेबसाईटवर व रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावेत, रुग्ण हक्क व जबाबदाऱ्यांची सनद दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी व खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने विहित केलेल्या दरांचे पालन करण्याची हमी देण्याबाबत सूचित करण्यात यावे असे निर्देश शेख यांनी पालिका आयुक्तांना दिलेले आहेत.

  11. लॉकडाऊननंतर भारतात 12 कोटींपेक्षा जास्त लोक बेरोजगार - CMIE

  12. अंतिम वर्षाच्या परीक्षाही रद्द कराव्यात अशी युवासेनेची मागणी

    अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे.

    प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेबाबत निर्णय घेऊन नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

    परीक्षा कशा पद्धतीने होणार, कोणत्या वातावरणात होणार याचं दडपण विद्यार्थी आणि पालकांवर आहे. ही बाब निदर्शनास येताच शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार अंतिम सत्राच्या परीक्षादेखील रद्द करण्याची मागणी युवासेना करत आहे असं या पत्रात म्हटलं आहे.

  13. मुंबई महापालिका आयुक्तांची धारावीला भेट

    बृहन्मुंबई महानगर पालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी धारावी परिसराला भेट दिली. गच्च लोकवस्ती असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. काही तासांपूर्वीच चहल यांनी प्रवीण परदेशी यांच्याकडून आयुक्तपदाची सूत्रं स्वीकारली होती.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. स्थलांतरित कामगारांसाठी शरद पवारांचा पुढाकार

    कोरोना, स्थलांतरित

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, स्थलांतरित कामगार

    राज्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाता यावं खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.

    पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोएल यांच्याशी स्थलांतरित कामगारांसंदर्भात संवाद साधला.

    "विविध राज्यात परत जाण्यासाठी प्रयत्नशील कामगारांना त्यांच्या गावी जाता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिलं आहे. एसटी बसेसद्वारेही त्यांना पाठवण्यात येईल. या कामगारांना आपापल्या राज्यात परत जाण्याकरता पुरेशा ट्रेन्सची व्यवस्था केली जाईल", असं आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलं आहे.

    आपापल्या राज्यातील कामगारांना परत घेण्यास तयार नसलेल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. माझी प्रकृती उत्तम- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

    माझी प्रकृती उत्तम असून, मला काहीही झालेलं नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शहा यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर शहा यांनी ट्वीट करून अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

    "गेल्या काही दिवसात माझ्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट अफवा पसरल्या आहेत. देश सध्या कोरोना विषाणूविरुद्धची लढाई लढत आहे. देशाचा गृहमंत्री या नात्याने दिवसरात्र काम सुरू आहे. त्यामुळे या अफवांकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही.

    अनेकजण काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेऊन व्यक्त होत आहेत. माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, हितचिंतकांनी गेल्या दोन दिवसात माझी विचारपूस केली. त्यांची काळजी मी समजू शकतो. माझी प्रकृती उत्तम असून, मला कोणताही आजार नाही.

    हिंदू मान्यतांनुसार, अशा पद्धतीच्या अफवा प्रकृती चांगली व्हायला बळ मिळतं. अफवांसारख्या व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करा, मलाही माझं काम करु द्या.

    अफवा पसरवणाऱ्यांप्रति माझ्या मनात कोणताही द्वेषभाव नाही. तुमचेही धन्यवाद", असं शहा यांनी म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. रशियात 24 तासात दहा हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद

    रशियात कोरोनाचं संकट तीव्र होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात रशियात 10,817 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रशियात कोरोना रुग्णांची संख्या 198, 676 एवढी झाली आहे.

    रशियातील टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 104 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात कोरोनामुळे आतापर्यंत 1,827 जणांचा मृत्यू झाला आहे.

    रशियात दिवसाला दहा हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होते आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या बाबतीत रशिया आता जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

    रशिया, कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, रशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.
  17. ढाक्यातल्या भारतीयांना घेऊन येणारं विमान दिल्लीत दाखल

    बांगलादेशची राजधानी ढाक्यात अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणारं विमान राजधानी दिल्लीत दाखल झालं आहे. या विमानात 129 प्रवासी आहेत. काही तासांपूर्वीच मध्य पूर्व देशातून एक विमान केरळमधील कोची इथं दाखल झालं. वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणलं जात आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. गृहमंत्री अनिल देशमुखांचा डीपी झाला पोलिसमय

    कोरोना, महाराष्ट्र

    फोटो स्रोत, social media

    फोटो कॅप्शन, राज्य पोलीस खात्याचं बोधचिन्ह

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन काळात काम करणाऱ्या पोलिसांप्रति आदर म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावर हँडल्सवर पोलीस खात्याचं बोधचिन्ह ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनीही पोलीस खात्याचा डीपी ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

    "२६/११ चा आतंकवादी हल्ला असो, २००५ चा मुंबईतील महापूर असो किंवा सध्याची कोरोनाची साथ, अग्रेसरपणे नागरिकांना आधार देणारे पोलीसच असतात. प्रसंगी स्वत:ला धोक्यात घालूनही हे पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात", असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

    ते पुढे म्हणतात, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सर्वश्रुत आहे की कैक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला व त्यापैकी चार जणांना आपला जीवही गमवावा लागला. आपल्या कुटुंबाची, मुलाबाळांची पर्वा न करता हे पोलीस जीव मुठीत धरून सलग २ महिन्यांपासून बिन विश्रांती लोकांसाठी सज्ज आहेत. अशा या माझ्या पोलीस परिवारातील बांधव एकटे नाहीत हे अधोरेखित करण्याची नितांत गरज आहे. त्यांची काळजी गृहमंत्री म्हणून माझी जितकी आहे तितकीच प्रत्येक नागरिकाचीही आहे".

    "आपल्या बहाद्दर पोलिसांच्या सन्मानार्थ फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माझ्या सोशल मीडियातील अकाउंट्सला डी.पी. म्हणून आज मी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही असा लोगो लावून पोलिस बांधवांच्या सन्मानात मोठ्या संख्येने सामील व्हाल अशी आशा करतो.जय हिंद! जय महाराष्ट्र! जय महाराष्ट्र पोलीस!!"

  19. राज्यात अडकलेल्या नागरिकांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा

    कोरोना, एसटी

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, एसटी मोफत सेवा पुरवणार

    राज्यात विविध शहरं तसंच गावांमध्ये अडकलेल्या माणसांसाठी सोमवारपासून मोफत एसटी सेवा सुरू होईल. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे.

    -लॉकडाऊन काळात, गावी जाणाऱ्या लोकांसाठी पोर्टल तयार करण्यात आलं आहे. त्यावर नोंदणी करावी लागेल.

    -प्रत्येक एसटी बस प्रवासाला जाण्याआधी सॅनिटाईझ केलं जाईल. प्रवासानंतरही बस सॅनिटाईझ केली जाईल.

    -22 माणसांनी एकत्रित जाण्याचा अर्ज दिला तर त्यानुसार एसटी सोडण्यात येईल. मेसेजद्वारे बसबाबतचा मेसेज कळवण्यात येईल.

    -वैयक्तिक म्हणजेच एकटं जाणाऱ्यांसाठी पोर्टलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. त्यांचीही गावी जाण्याची व्यवस्था करण्यात येईल.

    -ही एसटी सेवा थेट सेवा असेल. ही बस रस्त्यात कुठेही थांबणार नाही. मध्ये कुठेही गाडीतून चढता-उतरता येणार नाही.

    -नोडल ऑफिसर प्रवाशांची काळजी घेईल.

    -प्रत्येक प्रवाशाने मास्क घालणे बंधनकारक

    -एसटीचे पोर्टल सोमवारपासून सुरू होणार

    -नागरिकांनी शिस्त पाळणं आवश्यक

    -एका सीटवर एकालाच परवानगी

    -खाण्यापिण्याची सुविधा प्रवाशांनी स्वत:ची स्वत: केल्यास बरं होईल.

  20. रोगप्रतिकारशक्ती वाढवायला व्हिटामिन्स, हस्तमैथुन, ग्रीनटी: काय करावं, काय करू नये?, जारिया गोवेट, बीबीसी फ्युचर

    Corona

    फोटो स्रोत, Getty Images

    कोरोना व्हायरसमुळे होणारा कोव्हिड-19 कोणत्या औषधाने बरा होईल, याचा शोध जगभरातले संशोधक घेत आहेत.

    ज्या लोकांची प्रतिकारक्षमता चांगली असते, त्यांच्यावर कोव्हिड-19चा प्रघात जास्त मोठा होत नाही, इतकंच कायतेआतापर्यंत लक्षात आलं आहे. याचंच भांडवल आता आपली बाजारपेठसुद्धा करू पाहात आहे.

    प्रतिकारक्षमता वाढवण्याचे उपाय वेगवेगळ्या माध्यमांमधून आणि सोशल मीडियावरून सुचवले जात आहेत.

    अर्थात हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. जेव्हा अशा साथी किंवा आरोग्य संकटं येतात, तेव्हा अशा गोष्टीही दिसून येतात. 1918 साली जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता तेव्हा सुद्धा अशाच प्रकारच्या घटना, चर्चा होत होत्या. आणि आता 2020मध्येही तेच दिसून येत आहे.

    संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- अफवा आणि रोगप्रतिकारक्षमता