You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, देशातली संख्या 50 हजारहून अधिक
कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स
लाईव्ह कव्हरेज
हे LIVE पेज आता बंद करण्यात आलं आहे, यापुढचे सर्व अपडेट्स पाहाण्यासाठी इथं क्लिक करा.
राज्यात कोरोनाचे 1216 नवीन रुग्ण, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 17974
मुंबईसाठी संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील बेड्स मिळणार
दिवसभरातले कोरोना अपडेट्स
दिवसभरात कोरोनासंदर्भातील राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अपडेट्स तुम्ही या पेजवर वाचत होतात. पण आता इथं थांबत आहोत. उद्या पुन्हा सकाळी नवीन घडामोडींसह येऊच. पण आता गुड नाईट म्हणून निरोप घेण्यापूर्वी दिवसभरातल्या घडामोडी थोडक्यात पाहू-
- देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा पन्नास हजाराच्या पुढे गेला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1700हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
- मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, बीकेसीमध्ये 1000 बेड्सचं हॉस्पिटल उभं राहतं आहे. त्याचवेळी लष्कर तसंच रेल्वे हॉस्पिटलमध्येही रुग्णांची व्यवस्था केली जाऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
- राज्यात बुधवारी 1233 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 34 जणांचा मृत्यू झाला. 275 रुग्णांना घरी सोडण्यात आलं. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतोच आहे.
- लॉकडाऊन काळात 95 हजार गुन्ह्यांची नोंद झाली असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांसाठी 10000 एसटी बसेस धावणार असल्याचं मंत्री विजय वडेवट्टीवार यांनी सांगितलं.
- कोरोना रुग्णांना बरं करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल क्षेत्रातील कार्यरत 548 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 649 जणांचा मृत्यू
ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची लक्षणं नाहीत. बुधवारी कोरोनामुळे 649 जणांचा मृत्यू झाला आहे.
आजच्या नोंदींंनंतर ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या तीस हजारच्या पुढे गेली आहे.
युरोपात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.
जर्मनीत प्रेक्षकांविना रंगणार फुटबॉल लीग
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जर्मनीत आता रिकाम्या मैदानात, प्रेक्षकांविना फुटबॉल लीगच्या मॅचेस आयोजित केल्या जाणार आहेत.
कोरोना काळात सुरू होणारी बुंडेसलिगा ही पहिलीच फुटबॉल स्पर्धा असणार आहे. 16-17 मे पासून स्पर्धांचे सामने सुरू होण्याची शक्यता आहे.
जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी या आयोजनाला मंजुरी दिली आहे.
इंग्लंड आणि स्पॅनिश फुटबॉल लीगच्या मॅचेस पुढच्या महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
चाहत्यांच्या प्रचंड जल्लोषात, समर्थकांच्या ताफ्यानिशी खेळण्याची या संघांना सवय आहे मात्र कोरोनामुळे आता रिकाम्या मैदानात त्यांना खेळावे लागणार आहे.
मंगळवारी दक्षिण कोरियात बेसबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते.
कोरोना पॉडकास्ट: आज दिवसभरात काय काय घडलं?
कोरोनासंदर्भात राज्यात, देशात तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर काय काय घडलं? याचा आढावा घेतलाय बीबीसी मराठीच्या आशिष दीक्षित आणि विनायक गायकवाड यांनी.
मुंबईला मिळणार संरक्षण आणि रेल्वे हॉस्पिटलमधील बेड्स
मुंबईसाठी संरक्षण विभाग, रेल्वेशी संबंधित रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोना उपाययोजनांचा आढवा घेतला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे, आरोग्य विभगाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. महाराष्ट्रातील रेड झोन मधील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त देखील यावेळी सहभागी झाले होते.
जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत मात्र ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना रेल्वेने खास तयार केलेल्या रेल्वे डब्यातील विलगीकरण कक्षात ठेवले जाण्याबाबत यावेळी चर्चा झाली. गरज भासल्यास त्याचा वापर करावा या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी चर्चा केली जाईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत जो प्रोटोकॉल आहे तो बदलण्याचा विचार आयसीएमआरच्या स्तरावर सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. कोरोना सोबतच अन्य आजारांच्या रुग्णांनाही वेळेवर उपचार मिळाले पाहिजेत यासाठी राज्यात प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात आज 1233 नव्या रुग्णांची नोंद; 34 मृत्यू
राज्यात आज कोरोनाच्या 1233 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे बुधवारी 34 जणांचा मृत्यू झाला. बरं झालेल्या 275 रुग्णांना घरी सोडण्यात आलं.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16,758 एवढी झाली आहे. आतापर्यंत 3094 रुग्ण कोरोनाच्या संसर्गातून बरे होऊन घरी परतले आहेत.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी, मुंबईत 25 तर पुण्यात आणि अकोल्यात प्रत्येकी 3, जळगाव आणि सोलापुरात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा मुंबईत मृत्यू झाला आहे.
34 मृत्यूंपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिगंभीर आजार होते. कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 651 जणांचा मृत्यू झाला आहे.
माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
इकॉनॉमिक डिस्टन्सिंगची गोष्ट- आजचं कार्टून
रशियात कोरोनाच्या दहा हजार नव्या रुग्णांची नोंद
रशियात सलग चौथ्या दिवशी दहा हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. रशियात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 165,000 पेक्षाही जास्त झाला आहे.
कोरोनामुळे रशियात आतापर्यंत 1537 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 86 लोकांचा मृत्यू झाला आहे.
रशियाने कोरोनाला थोपवण्यात यश मिळवलं आहे असा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला होता. मात्र गेल्या काही दिवसात तिथे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.
मुंबईत उभं राहतंय हजार बेड्सचं हॉस्पिटल
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये 1000 बेड्सची व्यवस्था असलेलं हॉस्पिटल उभारलं जात आहे. पाहा हा व्हीडिओ
मोलकरणी येऊ लागल्या तर कोरोनाचा धोका आहे?
राज्य सरकारने काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत दिलेल्या यादीत मोलकरणीचा समावेश नसल्याने त्या घरकामारसाठी जाऊ शकतात की नाही, याबाबत जरा संभ्रम आहे.
पण कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन वगळता इतर ठिकाणी घरकामासाठी जाण्यासाठी खरंच मोलकरणींना परवानगीची आवश्यकता आहे? पाहा व्हीडिओ
लॉकडाऊन काळात 95 हजार गुन्ह्यांची नोंद- गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोव्हिड संदर्भातील 95 हजार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या 184 घटना घडल्या. त्यात 663 व्यक्तींना ताब्यात घेतले गेले अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील 3 व पुणे येथील 1 अशा 4 पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 42 पोलीस अधिकारी व 414 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. लॉकडाऊन मध्ये थोडीशी शिथिलता म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे".
नेपाळमध्येही 18 मे पर्यंत लॉकडाऊन
नेपाळ सरकारनेही 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये आतापर्यंत 82 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
ब्रिटनहून नेपाळला आलेल्या एका महिलेला पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला होता. भारताने नेपाळला 23 टन औषधांचा पुरवठा केला आहे.
राज्यभरात अडकलेल्या लोकांसाठी 10 हजार एसटी बसेस धावणार
कोरोना वीरांनाच होतोय विषाणूचा संसर्ग
देशभरात आतापर्यंत डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ मिळून 548 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
रुग्णांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यात वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींची भूमिका मोलाची असते. देशभरात पाचशेहून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोना रुग्णांची अवाजवी लूट होऊ नये यासाठी उपाययोजना -राजेश टोपे
सगळ्या प्रगत देशांच्या तुलनेत, आपल्या देशाचा मृत्यूदर नियंत्रण राखला आहे. हा आकडा कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणं अत्यावश्यक आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
टोपे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
-महाराष्ट्रात 943 कंटेनमेंट झोन आहेत. त्यामध्ये 11,629 लोक काम करत आहेत. 50 लाख लोकांचं सर्वेक्षण केलं आहे. लोकांना 100,99,582 होम क्वारंटीन केलं आहे.
-खाजगी हॉस्पिटल अवाजवी दर आकारत होते. पाच कायद्यांचा आधार- एपिडेमिक, डिझॅस्टर, इसेन्शियस, बॉम्बे चॅरिटेबल, बॉम्बे नर्सिंग या कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन काम करण्यात आलं आहे. कोणालाही आर्थिक फटका बसू नये. जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन ही संस्था काम करते आहे. पेशंट्सची अवाजवी लूट होणार नाही यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
-महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना- सर्व नागरिकांना या योजनेचा फायदा मिळेल. विनाकारण पैसे खर्च करू नका. शासनाची फ्लॅगशिप योजना आहे. नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा.
-मुंबईत अतिगंभीर रुग्णांसाठी लागणारे बेड्स आणि डॉक्टरांची आवश्यकता आहे. त्यासंदर्भात मदत पुरवावी असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना सांगितलं आहे. लष्कर, नौदल, हवाई दल यांची हॉस्पिटल्स आहेत. तिथे बेड्सची व्यवस्था होऊ शकेल तसंच डॉक्टरांची सेवा मिळू शकेल.
-रेल्वेच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची सोय करता येईल. डॉ. हर्षवर्धन यांनी रेल्वे हॉस्पिटल्ससंदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत.
-खाजगी दवाखाने बंद केलेल्या डॉक्टर्सना मुंबईच्या दृष्टिकोनातून 15,000 डॉक्टर्सना आवाहन केलं आहे. त्यांना शासनातर्फे वेतन देण्यात येईल. जे डॉक्टर्स 55 वयाच्या आतील डॉक्टरांनी सेवा द्यावी. वेळेची गरज आहे. अतिगंभीर रुग्णांसाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे.
-रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात. बढतीही देण्यात यावी.