लोकांवर नजर ठेवण्यासाठी आरोग्य सेतू अॅपचा आग्रह - राहुल गांधी

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 35 हजार 365 वर पोहोचली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. मुंबई-पुण्यातून बाहेर जाण्यायेण्यास परवानगी नाही-गृहखातं

    मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा राज्याच्या गृह मंत्रालयाने केला आहे.

    1. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.

    2. असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.

    3. मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे.

    4.अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

    कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे.

  2. चीनने उडवली अमेरिकेची खिल्ली

    कोरोना

    फोटो स्रोत, xinhua news agency

    फोटो कॅप्शन, चीनने अमेरिकेवर व्हीडिओच्या माध्यमातून टीका केली आहे.

    जगाला विळखा घातलेल्या कोरोना संसर्गाच्या निमित्ताने जागतिक महासत्तांमधील संघर्षही समोर येतो आहे.

    चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने अॅनिमेशनद्वारे अमेरिकेवर प्रतीकात्मक टीका केली आहे.

    वन्स अपॉन अ व्हायरस नावाचा अॅनिमेशन व्हीडिओ आहे. यामध्ये लिगो कॅरेक्टर दाखवण्यात आले आहेत. अमेरिकेतर्फे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसत आहे तर चीनच्या वतीने कोरोना वॉरियर्स दिसत आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळ्याला आजारपणामुळे सलाईन लावल्याचं दिसत आहे. दुसरीकडे चीनमध्ये कोरोना वॉरियर्सची फौज उभी असल्याचं दिसतं आहे. कोरोनाने अमेरिकेची ओळख असलेल्या या स्वातंत्र्यदेवतेला जर्जर केल्याचं चीनला सुचवायचं आहे.

    कोरोना विषाणूचा संसर्ग कसा झाला याबाबत चीनने योग्य वेळेत समाधानकारक माहिती दिली नाही असा अमेरिकेचा आरोप आहे. चीनने हे आरोप फेटाळून लावत सर्व माहिती उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं आहे.

    जागतिक पातळीवरील हा संघर्ष व्हीडिओतील पात्रांच्या तोंडी आहे. सोशल मीडियावर या व्हीडिओची चर्चा आहे.

  3. आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करण्याचं सरकारचं आवाहन

    कोरोना

    फोटो स्रोत, MYGOV.IN

    फोटो कॅप्शन, आरोग्यसेतू अॅप

    केंद्र सरकारने सार्वजनिक तसंच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती आसपास असेल तर हे अॅप सूचित करतं. देशात 37,000 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 1200 हून अधिकजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    ऑस्ट्रेलियात एबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 40 लाखांहून अधिक नागरिकांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप डाऊनलोड केलं आहे. मात्र याद्वारे संकलित करण्यात आलेली माहिती जाहीरपणे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. गोपनीयतेच्या नियमांसंदर्भात अॅपची चाचणी सुरू आहे.

    सिंगापूरने लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणली आहे. 12 मे पासून हेअरड्रेसर आणि लाँड्री ही आस्थापनं सुरू होतील. 102 वर्षीय रुग्णाला घरी सोडण्यात आलं. सिंगापूरमध्ये 17,500 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

    थायलंडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2,996 झाली असून, 54जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  4. बेल्जियममध्ये कोरोनाचं एवढं थैमान का?

    कोरोना

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, बेल्जियममध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे.

    कोरोनाच्या संसर्गाने होणाऱ्या मृत्यूदरांमध्ये बेल्जियमचा दुसरा क्रमांक लागतो. एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांना संसर्ग झाला आहे यानुसार ही आकडेवारी काढली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी बेल्जियमच्या आकडेवारीचा उल्लेख केला होता.

    बेल्जियमची लोकसंख्या 1 कोटी 15 लाख आहे. प्रति लाख लोकसंख्येमागे बेल्जियममध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण 66 आहे. अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत मृत्यूचं प्रमाण 19 इतकं आहे.

    बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची तुलना करणं योग्य नाही. आमची पद्धती वेगळी आहे. केअर होममध्ये होणाऱ्या मृत्यूंचीही आम्ही नोंद करत आहोत. यापैकी काहीजण कोरोना संशयित होते. त्यांना संसर्ग झाला आहे याबाबत पुष्टी मिळाली नाही.

    बेल्जियमच्या नवीन आकडेवारीनुसार, 7703 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 53 टक्के मृत्यू केअरहोममध्ये झाले आहेत. केअरहोममध्ये झालेल्या मृत्यूंपैकी केवळ 16 टक्के लोकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला होता असं स्पष्ट झालं आहे. म्हणजेच उर्वरित 3500 जणांच्या मृत्यूचं कारण कोरोना हे नव्हतं यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

  5. नांदेडहून होशियारपूरला परतलेले 37जण कोरोना पॉझिटिव्ह

    नांदेडहून पंजाबमधील होशियारपूरला परतलेल्या 37 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जिल्हाधिकारी अपनीत रियाईत यांनी ही माहिती दिली. पंजाबमधील अनेक भाविक नांदेड इथं लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यांना बसद्वारे पंजाबमध्ये आणण्यात आलं. मात्र यापैकी अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट होतं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. दिल्लीत एकाच इमारतीत तब्बल 41 जणांना कोरोना व्हायरसची लागण

    ल्लीत एकाच इमारतीत तब्बल 41 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या कापाशेरा भागातील ठेकेवाली गल्लीतील हा प्रकार आहे. संबंधित इमारतीत 19 एप्रिल रोजी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर ही इमारत सीलबंद करण्यात आली होती. पण आता याच इमारतीत तब्बल 41 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. कोरोना व्हायरसचा संसर्ग दुसऱ्यांदा होऊ शकतो का?

  8. गोव्यात 17 मेपर्यंत पर्यटनास परवानगी नाही – डॉ. प्रमोद सावंत

    गोव्यामध्ये 3 एप्रिलनंतर कोव्हिड-19 चा एकही रुग्ण आढळलेला नाही. आधी सापडलेल्या रुग्णआंना 17 एप्रिलपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला. सध्यातरी 17 मेपर्यंत गोव्यात पर्यटनास परवानगी नाही, असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. भारताकडे आता एक मोठी संधी – प्रकाश जावडेकर

    भारताकडे आता एक मोठी संधी आहे. या संधीचं सोनं करण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्या मोठ्या कंपन्यांचं भारतात स्वागत आहे, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. युद्धनौका, पाणबुड्यांमध्ये कोरोना रुग्ण नाही – भारतीय नौदल

    देशाच्या नौदलातील युद्धनौका आणि पाणबुड्यांवर एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. मुंबईच्या आएनएस आंग्रेच्या डेपोमधल्या 38 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यापैकी 12 जण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 26 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहे, अशी माहिती भारतीय नौदलाचे चीफ व्हाईस अडमिरल जी. अशोक कुमार यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. आंध्र प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1525 वर

    आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासांत 62 नवे कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोव्हिडग्रस्तांची एकूण संख्या 1525 वर पोहोचली आहे. तर, आंध्र प्रदेशात आतापर्यंत 33 रुग्णांचा मृत्य़ू झाल्याची माहिती आंध्र प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. भारतातील कोव्हिड-19 व्यवस्थापन इतर देशांपेक्षा चांगलं - प्रकाश जावडेकर

    कोव्हिड-19 महामारीचं व्यवस्थापन इतर देशांच्या तुलनेत चांगलं आहे. विविध झोन हे योग्य पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. लस येईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि दोन मीटरचं अंतर ठेवण्याची संकल्पना उपयोगी ठरेल, असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. आणखी एक श्रमिक स्पेशल रेल्वे नाशिकहून लखनऊकडे रवाना

    लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अड़कलेल्या स्थलांतरित मजुरांसाठीची आणखी एक श्रमिक स्पेशल रेल्वे आज सकाळी नाशिकमधून रवाना झाली.

    ही रेल्वे उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपर्यंत धावेल. या रेल्वेमध्ये 839 प्रवासी आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. नांदेडच्या गुरूद्वारामध्ये 20 जण कोरोना पॉझिटिव्ह

    नांदेडच्या गुरूद्वारामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले 20 रुग्ण आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात गेलेले 7 मजूर कोरोना पॉझिटिव्ह

    महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात गेलेले 7 मजूर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे मजूर झाशी मार्गे सरकारी बसमधून बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते, अशी माहिती बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. अमेरिकेत कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर देण्यास परवानगी

    कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर हे औषध देण्यास परवानगी मिळाली आहे.

    रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं, असं अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांनी स्पष्ट केलं आहे.

  17. राजस्थानातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2678 वर

    राजस्थानातील कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या 2678 वर पोहोचली आहे. आज सकाळी 12 नवे रुग्ण आढळून आले तर 3 जणांचा मृत्यू झाला.

    राजस्थानात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झालेला आहे. इथं 1116 रुग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी 714 जणांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे, अशी माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. कोट्यातील विद्यार्थी महाराष्ट्रात दाखल

    राजस्थानातील कोटा शहरात आयआयटीच्या क्लासमध्ये शिकणारे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. इथं शिकत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना 74 बसमधून परत आणण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची वैद्कीय तपासणी केली असून खबरदारी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 37 हजार 336 वर, गेल्या 24 तासांत 2293 नवे रुग्ण

    देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसची लागण झालेले 2293 नवे रुग्ण आढळून आले. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना व्हायरसग्रस्तांची एकूण संख्या 37 हजार 336 वर पोहोचली आहे.

    याचसोबत गेल्या 24 तासांत 71 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत एकूण 1218 जणांचा मृत्यू झाला आहे.

    याशिवाय 9 हजार 950 रुग्ण कोव्हिडमधून बरे झाले असून 26 हजार 167 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. कोरोना व्हायरसवर Remdesivir औषध रामबाण ठरेल?