प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 वरील खात्रीशीर उपचार नाही- ICMR

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई

    नागपूरमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. बाजारात फक्त 10 वाहनांना परवागनी होती. पण इथं जास्त वाहने जमा झाली होती. ती हटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक विजय अकोट यांनी दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  2. काल दिवसभरात काय घडलं?

    काल ( 27 एप्रिल रोजी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची व्हीडिओ काँफरन्सिंगद्वारे बैठक पार पडली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 9 एप्रिल 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती.

    याव्यतिरिक्त काल दिवसभरात जे घडलं ते तुम्ही बीबीसी मराठीच्या कालच्या लाइव्ह पेजवर पाहू शकता.

  3. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मंडळी,

    कसे आहात? घरीच आहात ना? कोरोनाला पळवून लावण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. राज्य, देश तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत राहतील. काळजी घ्या.

    महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 8 हजार 68 रुग्ण, 342 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात गेल्या 24तासांत1,396 नवे रुग्ण, एकूण 27,892बाधित झाले आहेत.

    जगभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 185 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.

    अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक 9 लाख 54 हजार 182 रुग्ण आढळले असून 54 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेटवर 11 मे पर्यंत बंदी असणार आहे.

    उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी मंत्रिमंडळाची पुन्हा राज्यपालांना विनंती राज्य सरकार व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणार.

    आज दिवसभरातील ताज्या घडामोडी बीबीसीच्या लाइव्ह ब्लॉगवर पाहता येतील.